नग्नता, तरुणींचा हस्तमैथुन आणि शरीर प्रदर्शन; टिकटॉकवरचं लाईव्ह स्ट्रिमिंगचं जग

रिंग लाईट, मोबाईल आणि ब्लर फोटो
    • Author, नलिनी शिवथासन, पॅट्रिक क्लाहेन आणि देबुला केमोली
    • Role, बीबीसी न्यूज आणि आफ्रिका आय

टिकटॉक 15 वर्षे वयाच्या किशोरवयीन मुलांनी केलेल्या लैंगिक लाईव्ह स्ट्रीम्समधून नफा मिळवत असल्याचं बीबीसीला सांगण्यात आलं आहे.

आम्ही याबाबत केनियामधील तीन महिलांशी बोललो. या महिलांनी किशोरवयीन असतानाच हे सुरू केलं होतं, असं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, त्यांनी इतर मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे पाठवल्या जाणाऱ्या जास्तीच्या कंटेंटसाठी, उघडपणानं जाहिरातीसाठी आणि पेमेंटसाठी चर्चा करण्यासाठी टिकटॉकचा वापर केला.

टिकटॉकनं रिक्वेस्टवर बंदी घातली आहे. परंतु, हे घडतंय याची कंपनीलाही माहिती आहे, असं मॉडरेटरनं बीबीसीला सांगितलं. टिकटॉक सर्व लाइव्हस्ट्रीम व्यवहारांमधून सुमारे 70% हिस्सा घेतं, हे यापूर्वी आम्हाला आढळून आलं आहे.

"झिरो टॉलरन्स फॉर एक्सप्लॉयटेशन म्हणजेच शोषणासाठी शून्य सहनशीलता" हे धोरण असल्याचं टिकटॉकनं बीबीसीला सांगितलं आहे.

केनियातील लाईव्हस्ट्रीम टिकटॉकवर लोकप्रिय आहेत. आठवड्याभरात प्रत्येक रात्री, आम्हाला डझनभर असे लाईव्हस्ट्रीम्स आढळले.

ज्यामध्ये महिला कंटेट क्रिएटर्सने आकर्षक नृत्य केलं. जगभरातील शेकडो लोकांनी हे स्ट्रीम पाहिले.

इशारा: यामध्ये लैंगिक स्वरूपाच्या माहितीचा समावेश आहे.

नैरोबीत पहाटेचे दोन वाजले आहेत आणि अजूनही टिकटॉक लाईव्ह पूर्ण उत्साहात सुरू आहे.

मोठ्या आवाजात संगीत सुरू आहे. युजर्स एकमेकांशी गप्पा मारत आहेत. त्यातच एक महिला तिचा कॅमेरा चालू करुन तिरकसपणे नाचते आणि समोरच्याला उत्तेजित प्रयत्न करते. त्यानंतर इमोजीचे "गिफ्ट्स" स्क्रीनवर ओसंडून वाहतात.

"किनेम्बेसाठी मला इनबॉक्स करा, मुलांनो. टॅप, टॅप," परफॉर्मर सातत्यानं हेच रिपीट करत होता.

'टॅप, टॅप,' हे एक वाक्य आहे, ज्याचा वापर टिकटॉकवर केला जातो. 'लाईक' करा असा याचा अर्थ होतो. म्हणजेच लाईव्हस्ट्रीमला पसंती द्या, अशी आर्जव तो परफॉर्मर सातत्यानं करत आहे.

टिकटॉक स्क्रीनच्या डाव्या बाजूला एक डान्सर आणि स्क्रीनच्या उजव्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये लाईव्हस्ट्रीम पाहणारे - गोपनीयतेच्या कारणास्तव सर्व अस्पष्ट केले आहेत.
फोटो कॅप्शन, टिकटॉक लाईव्हस्ट्रीमचा अस्पष्ट स्क्रीनशॉट - काही कलाकार (उजवीकडे) आळीपाळीने मुख्य स्क्रीनवर (डावीकडे) अश्लील नृत्य करतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'किनेम्बे' म्हणजे स्वाहिलीमध्ये 'क्लिटोरिस'. 'इनबॉक्स मी' म्हणजे प्रेक्षकाला टिकटॉकवर एक खास संदेश पाठवण्यास सांगणं. जसं की परफॉर्मरला हस्तमैथुन करताना, कपडे काढताना किंवा इतर महिलांसोबत लैंगिक क्रिया (Sexual Activities) करताना पाहणं.

केनियाच्या लाईव्हस्ट्रीम्स टिकटॉकवर लोकप्रिय आहेत. आठवडाभरात प्रत्येक रात्री, आम्हाला सुमारे एक डझन लाईव्हस्ट्रीम्स सापडले.

ज्यात महिला परफॉर्मर्सनी आकर्षक आणि उत्तेजित करणारे नृत्य केले, ज्याला जगभरातील शेकडो लोकांनी पाहिलं. काहींनी लैंगिक सेवांची जाहिरात करण्यासाठी कोडेड लैंगिक अपशब्दांचा वापर केला.

इमोजी गिफ्ट्स टिकटॉकच्या लाईव्हस्ट्रीमसाठी पेमेंट म्हणून काम करतात. कारण टिकटॉक कोणतीही स्पष्टपणे दिसणारी लैंगिक कृत्ये आणि नग्नता असलेला कंटेंट काढून टाकतो. त्यामुळं इतर प्लॅटफॉर्मवर नंतर पाठवलेल्या अधिक स्पष्ट कंटेंटचा देखील यात समावेश होतो. या गिफ्ट्स कुपन्सचं नंतर पैशात रूपांतर केलं जाऊ शकतं.

"सेक्सच्या मागणीवर नियंत्रण ठेवणं टिकटॉकच्या हिताचं नाही. जितके जास्त लोक लाईव्हस्ट्रीमवर गिफ्ट्स देतात, तितकाच टिकटॉकला अधिक महसूल मिळतो," असं केनियाच्या एका माजी मॉडरेटरनं सांगितलं.

या मॉडरेटरला आम्ही 'जो' म्हणतो. टिकटॉकनं जागतिक स्तरावर 40,000 हून अधिक मॉडरेटर नेमल्याचं जो नं सांगितलं.

आम्हाला आढळलं की, टिकटॉक अजूनही लाईव्हस्ट्रीम गिफ्ट्समधून सुमारे 70% हिस्सा घेत आहे. 2022 ला आम्ही जेव्हा तपास सुरू केला तेव्हा कंपनीनं इतक्या मोठ्या प्रमाणात कमिशन घेत असल्याचं नाकारलं होतं.

टिकटॉकला त्यांच्या लाइव्हस्ट्रीममधून बाल किंवा लहान मुलांच्या शोषणाबद्दल फार पूर्वीपासून माहिती आहे. 2022 मध्ये त्यांनी या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली होती.

परंतु यातून मोठा आर्थिक फायदा होत असल्यानं याकडे दुर्लक्ष केलं गेलं, असा दावा अमेरिकेतील युटा राज्यानं गेल्या वर्षी दाखल केलेल्या खटल्यात केला आहे.

या खटल्यानं सुरक्षितता सुधारण्यासाठी "सक्रिय उपाययोजनां"कडे दुर्लक्ष केलं, असं उत्तर टिकाटॉकनं दिलं.

केनिया या दुरुपयोगासाठी एक हॉटस्पॉट आहे, असं चॅरिटी चाइल्डफंड केनियाचं म्हणणं आहे. तरुण लोकसंख्या आणि व्यापक इंटरनेट वापरामुळे पश्चिमी देशांच्या तुलनेत आफ्रिकन खंडात ऑनलाइन मॉडरेशनही कमी आहे, असंही चॅरिटीनं पुढे म्हटलं.

जो, हा टेलिपरफॉर्मन्ससाठी काम करत होता. टिकटॉकनं जो ला कंटेंट मॉडरेशनसाठी करारबद्ध केलं होतं.

तो म्हणतो की, मॉडरेटरला प्रतिबंधित लैंगिक शब्दांची किंवा कृतींची संदर्भ मार्गदर्शिका दिली जाते. परंतु जो म्हणतो की, ही मार्गदर्शिका मर्यादित आहे. ती स्लँग किंवा अपशब्द तसेच इतर उत्तेजक/प्रक्षोभक हावभाव विचारात घेत नाही.

"तुम्ही पाहू शकता की ते कसं पोझ देत आहेत, कॅमेरा त्यांच्या छाती आणि मांड्यांवर आहे (उदाहरणार्थ). त्यावरुन तुम्ही पाहू शकता की ते सेक्ससाठी आमंत्रण देत आहेत. ते काहीही बोलत नसले तरी, तुम्हाला दिसतं की ते त्यांच्या (इतर प्लॅटफॉर्म) अकाऊंट्सकडे इशारा करत आहेत. पण मी याबाबत काहीही करू शकत नाही."

टिकटॉक

फोटो स्रोत, GETTY / GOOGLE PLAYSTORE

टेलिपरफॉर्मन्ससाठी एक आणखी कंटेंट मॉडरेटर, ज्याला आम्ही केल्विन म्हणतो, तो म्हणतो की मॉडरेशन हे टिकटॉकच्या वाढत्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) अवलंबून असल्यामुळंही मर्यादित आहे. ज्यामुळं स्थानिक लैंगिक अपशब्द (Slang) ओळखण्यात ते पुरेसे संवेदनशील नाहीत.

जो आणि केल्विन हे सात विद्यमान आणि माजी कंटेंट मॉडरेटर्सपैकी आहेत जे टिकटॉकच्या कंटेंटवर काम करतात, त्यांनी आम्हाला याबाबतच्या त्यांच्या चिंता किंवा याविषयी अधिकची माहिती आम्हाला सांगितली.

जो म्हणतो की, कंटेंट मॉडरेटरच्या फीडमध्ये प्रसिद्ध झालेल्या 80% लाईव्हस्ट्रीम्स लैंगिक संबंधाच्या किंवा लैंगिक सेवा जाहिराती करणाऱ्या होत्या, आणि विशेष म्हणजे टीकटॉकला या समस्येचं प्रमाण माहीत आहे.

चाइल्डफंड केनिया आणि इतर चॅरिटीजने बीबीसीला सांगितलं की, नऊ वर्षांची लहान मुलंही अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.

आम्ही याबाबत किशोरवयीन मुली आणि तरुण महिलांशी बोललो. त्या म्हणतात की, त्या रात्री सहा किंवा सात तास या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतात आणि सरासरी 30 युरो कमावतात. हे पैसे त्यांच्या एका आठवड्याच्या अन्न आणि वाहतुकीसाठी पुरेसे आहेत.

टिकटॉकवर दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंची उदाहरणं
फोटो कॅप्शन, टिकटॉकवर, सहसा मेक-अप ट्युटोरियलसारख्या व्हीडिओसाठी इमोजीद्वारे पैसे दिले जातात हे व्हर्च्युअल पैसे खऱ्या पैश्यांमध्ये बदलता येऊ शकतात.

"मी टिकटॉकवर स्वतःला विकते. मी नग्न होऊन नाचते. मी हे करते कारण तिथं मला स्वतःसाठी पैसे कमवता येतात," असं 17 वर्षीय एस्थर म्हणते.

ती नैरोबीच्या एका गरीब वस्तीत राहते, जिथं 3,000 रहिवासी सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात.

ती म्हणाली की, या पैशातून तिला तिच्या बाळासाठी अन्न खरेदी करता येतं, तिच्या आईलाही आर्थिक आधार देता येतो. एस्थरच्या आईला तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर घर भाडं देण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागत आहे.

ती म्हणाली की, मी 15 वर्षांची होती जेव्हा मला एका मित्रानं टिकटॉक लाईव्हचा (TikTok Live) परिचय करून दिला. त्यानं मला वयाच्या मर्यादेचा नियम बायपास करण्यात मदत केली. कारण लाइव्ह हा पर्याय फक्त 18 वर्षांवरील लोकच वापरू शकतात. युजरला लाइव्ह जाण्यासाठी किमान 1,000 फॉलोअर्स असणं आवश्यक आहे.

त्यामुळं भरपूर फॉलोअर असलेले टिकटॉक युजर्स डिजिटल पिंप्स म्हणजेच मध्यस्थ किंवा दलाल म्हणून कार्य करू शकतात. त्याद्वारे ते लैंगिक कंटेंट विकणारे लाईव्हस्ट्रीम आयोजित करतात.

त्यापैकी अनेकांनी बॅक-अप खाती तयार केली आहेत. याचा अर्थ असा आहे की, त्यांच्यावर पूर्वी टीकटॉकने एकतर बंदी घातली होती किंवा त्यांचे अकाऊंट्स निलंबित केलं होतं.

त्यांना टीकटॉकच्या कंटेंट मॉडरेटर्सला चुकवण्याची पद्धत माहीत आहे. ग्राहकांच्या लक्षात येण्यासाठी योग्य प्रमाणात लैंगिक भावना उत्तेजित करणारा कंटेंट तयार करण्याची त्यांची क्षमता आहे.

मॉडरेटर
फोटो कॅप्शन, टिकटॉकला कंटेंट मॉडरेशन करून देणाऱ्या कंपनीतील अनामिक व्हिसलब्लोअर्सनी बीबीसीला ही माहिती सांगितली.

"जेव्हा तुम्ही नाचत असाल, तेव्हा कॅमेरापासून दूर जा, अन्यथा तुम्हाला ब्लॉक केलं जाईल," स्क्रिनवर एक मध्यस्थ एका महिलेवर ओरडतो.

होस्ट केल्याच्या बदल्यात महिला त्यांच्या कमाईतला काही हिस्सा हा या मध्यस्थांना देतात.

एस्थर म्हणते की, तिच्या डिजिटल मध्यस्थाला माहिती होतं की, ती 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे आणि "त्याला तरुण मुलींचा वापर करायला आवडतं".

त्यानं तिच्यावर अधिक कमाई करण्यासाठी दबाव आणला. म्हणजे तिला वारंवार लाइव्हस्ट्रीम करणं आवश्यक होतं. तिच्या कमाईतून त्यानं अपेक्षेपेक्षा मोठा हिस्सा घेतला, असं ती म्हणते.

"जर एक इमोजी पाठवला तर तो 35,000 केनियन शिलिंग (ksh) (213 पाउंड) होतो. तर तो त्यातील 20,000 केएसएच (121 पाउंड) घेतो आणि आम्हाला फक्त 15,000 केएसएच (91 पाउंड) मिळतात."

"त्याच्यासाठी काम करणं म्हणजे स्वतःच्या हातात 'बेड्या' घालण्यासारखं होतं," ती म्हणते. "तुम्हीच दुखावलेले आहात, कारण त्याला सर्वात मोठा हिस्सा मिळतो आणि तरीही तो तुमचा वापर करुन घेतो."

"सोफी", (हे तिचं खरं नाव नाही) म्हणते की ती 15 वर्षांची होती जेव्हा तिने टीकटॉकवर लाईव्हस्ट्रीमिंग सुरू केलं.

ती सांगते की, तिला युरोपमधील पुरुषांकडून थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवर सर्व्हिस देण्यासंबंधी विचारणा होऊ लागली. यात एक जर्मन युजर होता, तो तिला पैसे देऊन तिच्या स्तनांना आणि गुप्तांगांना स्पर्श करण्याची मागणी करत होता.

आता 18 वर्षांची झालेली सोफी, तिच्या ऑनलाइन सेक्स वर्कसाठी पश्चात्ताप व्यक्त करते. ती म्हणते की, काही व्हिडिओ जे तिने इतर प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून युजरला पाठवले होते. त्यांनी हे व्हिडिओ नंतर तिच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर अपलोड केले आहेत, असं ती म्हणाली.

तिच्या शेजाऱ्यांना हे कळलं आहे आणि त्यांनी इतर तरुणांना तिच्याशी संबंध न ठेवण्याचा इशारा दिला आहे, असं तिनं बीबीसीला सांगितलं.

"ते मला कळपातून हरवलेली एक कोकरू म्हणून ओळखतात आणि तरुणांना मी त्यांची दिशाभूल करेल असं सांगितलं जातं. बहुतेक वेळा मी एकटीच असते."

आम्ही ज्याच्याशी संवाद साधला त्यातील काही मुली आणि महिलांनी सांगितलं की, त्यांना प्रत्यक्षात टीकटॉक युजर्ससोबत सेक्ससाठी भेटायला पैसे दिले गेले होते, किंवा त्यांना त्यांच्या मध्यस्थ किंवा दलालांबरोबर सेक्स करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.

टीकटॉक आफ्रिकन बाजारपेठेत आपली स्थिती मजबूत करण्यास उत्सुक आहे. परंतु, केनियामधील कंटेंट मॉडरेटर्सनी सांगितलं की, कंटेंटवर प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी ते पुरेसे कर्मचारी नोकरीवर घेत नाहीत.

केनिया सरकारनं ही समस्या ओळखल्याचे संकेत दिले आहेत. 2023 मध्ये राष्ट्राध्यक्ष विल्यम रूटो यांनी टिकटॉकच्या सीईओ शौ झी च्यू यांच्याबरोबर एक बैठक घेतली होती. त्यात या प्लॅटफॉर्मवरील कंटेंट मॉडरेशनसाठी सुधारणा करण्याची त्यांनी मागणी केली होती.

टिकटॉक

सरकारनं सांगितलं की, कंपनीने अधिक कडक नियमन स्वीकारण्यावर सहमती दर्शवली आहे. त्याचबरोबर केनियामध्ये टीकटॉकचे एक कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे, ज्यामुळं कामाचे समन्वय राखण्यास मदत होईल.

परंतु, आम्ही ज्या मॉडरेटर्सशी संवाद साधला त्याचं म्हणणं आहे की, 18 महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला तरी अद्याप यावर काहीच झालेलं नाही. टीकटॉकनं काहीच केलेलं नाही.

टेलिपरफॉर्मन्सने उत्तर दिलं की, त्याचे मॉडरेटर "समुदाय मानक आणि ग्राहक मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर युजर्सनी निर्माण केलेल्या कंटेंटला योग्यरित्या टॅग आणि फ्लॅग करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात"

टेलिपरफॉर्मन्सला आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकण्यासाठी किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याची तक्रार करण्यास अनुमती देण्यासाठीची ग्राहक व्यवस्था अद्याप करण्यात आलेली नाही.

टिकटॉकच्या एका प्रवक्त्यानं बीबीसीला सांगितलं की, "टीकटॉककडे शोषणाबाबत शून्य सहनशीलता आहे. आम्ही मजबूत लाइव्ह कंटेंट नियम, स्वाहिलीसह 70 भाषांमध्ये मॉडरेशन आणि आम्ही स्थानिक तज्ज्ञ आणि निर्मात्यांसोबत भागीदारी करतो. त्यात आमचा सब-सहारा आफ्रिका सुरक्षा सल्लागार परिषदेचा समावेश आहे. जेणेकरुन आम्ही आमच्या दृष्टीकोनाला सतत बळकट करु."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)