स्मार्टफोन तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही बरंच काही सांगतो?

मोबाईल हाती घेतलेले लोक.

फोटो स्रोत, Getty Images

स्मार्टफोन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनत आहे. आपल्यातील अनेक जण दररोज मोबाईलवर 5 तासांपेक्षा जास्त वेळा घालवत आहेत. पण आपण कोण आहोत, आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे, याबद्दल आपला फोन काही सांगतो का?

युनिव्हर्सिटी ऑफ लिंकन आणि लॅनकॅस्टर युनिव्हर्सिटीतील काही अभ्यासकांनी अँड्रॉईड आणि आयफोन वापरणाऱ्या 500 जणांचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. आपण ज्या प्रकारचे हँडफोन निवडतो त्यातून काही प्रमाणावर आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश पडतो, असं या अभ्यासकांनी म्हटलं आहेत. उदाहरणात अँड्रॉईड वापरणारे आयफोन वापरणाऱ्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणिक असतात, असं या अभ्यासात दिसून आलं आहे. तसेच अँड्राईड वापरणाऱ्यांच्या तुलनेत आयफोन वापरणारे जास्त तरुण असतात, असंही या अभ्यासाचा दावा आहे.

तसेच तुलनेत महिलांना आयफोन जास्त आवडतात, असं दिसून आलं आहे. महिला आयफोन निवडण्याची शक्यता दुप्पट असते, पण हे असं का होतं हे समजू शकलेलं नाही, असा अभ्यासात म्हटलं आहे.

तर अँड्रॉईड वापरणारे वयस्कर पुरुष असण्याची शक्यता जास्त असते.

पण स्मार्टफोनच्या निवडीवरून व्यक्तिमत्त्व कसं समजतं?

या अभ्यासकांना असं वाटतं की जो मोबाइल निवडतो त्यावरून व्यक्ती स्वतःला व्यक्त करते.

मोबाईल हाती घेतलेली स्त्री

फोटो स्रोत, Getty Images

हा अभ्यास करणाऱ्या टीममधील सहअभ्यासक हीदर शॉ म्हणाले, "स्मार्टफोन संबंधित व्यक्तीची लघू डिजिटल आवृत्ती बनत आहेत. आपला फोन दुसऱ्या कोणी वापरलेला आपल्याला आवडत नाही, याच कारण हा फोन आपल्याबद्दल बरंच काही सागंत असतो."

आयफोनला चिटकून असणारे अधिक श्रीमंत असतात अशी परिस्थिती नसल्याचं या अभ्यासात दिसून आलं आहे. पण स्मार्टफोन आपल्या प्रतिष्ठेचं लक्षण ठरत आहे, याबद्दल आयफोन वापरणाऱ्यांना अधिक चिंता असते, असं या अभ्यासात दिसून आलं असून असे लोक अधिक संवेदनशील असतात.

अभ्यासकांनी या अभ्यासाचा वापर करून कंप्युटर मॉडेल बनवलं आहे, त्या आधारे एखाद्या व्यक्तीकडे कोणता मोबाइल आहे, याचाही अंदाज बांधता येऊ शकतो, असा दावा या संशोधकांचा आहे. संशोधक डेव्हिड एलिस यांनी CNETला मुलाखत दिली आहे. या मुलखतीत ते म्हणाले, " आम्हाला Statistical Model बनण्यात यश आलं आहे. या आधारावर एखाद्या व्यक्तीला काही प्रश्न विचारून त्या उत्तरांवर त्या व्यक्तीकडे कोणात मोबाईल असेल याचा अंदाज बांधता येतो. याची अचुकता 70 टक्के आहे."

मोबाईल हाती घेतलेले लोक.

फोटो स्रोत, Getty Images

डेटा सुरक्षेसंदर्भात वादविवाद सुरू असताना एलिस आणि त्यांच्या टीमने काढलेले निष्कर्ष नक्कीच लक्षवेधी आहेत, असं म्हणता येईल.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)