You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नोबेल शांतता पुरस्कार अॅलेस बियालत्स्की यांना जाहीर
नोबेल शांतता पुरस्कारांची घोषणा झाली आहे. या वर्षी हा पुरस्कार अॅलेस बियालत्स्की यांना देण्यात आला आहे.
अॅलेस यांनी 1980च्या दशकात बेलारुसमध्ये सुरू झालेल्या लोकशाहीवादी चळवळीत योगदान दिले होते. आपल्या देशात लोकशाही आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांनी काम केले होते.
याबरोबरच द सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टिज या संस्थेलाही शांततेचे नोबेल देण्यात येणार आहे. युक्रेनमधील मानवाधिकार आणि लोकशाहीसाठी या संस्थेची स्थापना झाली होती. युक्रेनमधील लोकांच्या, समाजाच्या बाजूने लढत राहून युक्रेनमध्ये पूर्ण लोकशाही येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. याबरोबरच मॉस्कोमधील मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या मेमोरियल संस्थेलाही 2022 साठीचे शांततेचे नोबेल मिळाले आहे.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता क्षेत्रातल्या कामगिरीसाठी दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. नोबेल पुरस्कार समिती दरवर्षी अर्थशास्त्रातल्या कामगिरीसाठीही पुरस्कार जाहीर करते.
नोबेल मानपत्र, पदक आणि पुरस्कार निधी असं या मानाचं स्वरूप असतं.
अल्फ्रेड नोबेल कोण होते?
21 ऑक्टोबर 1833ला अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म स्वीडनमधल्या स्टॉकहोममध्ये झाला. त्यांचे वडील इमॅन्युएल नोबेल हे पेशाने इंजिनियर आणि संशोधक होते. त्यांनी स्टॉकहोममध्ये अनेक ब्रिज आणि इमारती बांधल्या होत्या.
अल्फ्रेड हे रशियामध्ये लहानाचे मोठे झाले. फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये त्यांनी रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं.
ते कविता रचत आणि नाटकंही लिहीत. साहित्य, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात त्यांना रस होता.
सामाजिक आणि शांततेशी संबंधित घडामोडींमध्ये नोबेल यांना रस होता. आणि त्यांची मत त्या काळासाठी प्रागतिक होती.
डायनामाईटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला होताअल्फ्रेड नोबेल यांचा विविध भाषांमध्ये हातखंडा होता. वयाच्या 17व्या वर्षी त्यांना स्विडीश, रशियन, फ्रेंच, इंग्लिश आणि जर्मन या भाषा येत होत्या.
नोबेल विजेत्यांची निवड कशी केली जाते?
दर वर्षी प्रत्यक्ष क्षेत्रासाठीच्या विजेत्यांची निवड विविध संस्थांद्वारे केली जाते. 6 पैकी 5 पुरस्कार विजेत्यांची निवड स्वीडनमध्ये केली जाते तर नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची निवड नॉर्वेमध्ये केली जाते.
शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठांचे प्राध्यापक, वैज्ञानिक, पूर्वीचे विजेत आणि इतर मिळून नामांकनं (nominations) दाखल करतात. त्यानंतर त्यातून काही नावं शॉर्टलिस्ट केली जातात.
पुरस्कारासाठी विचार करण्यात येत असलेल्या व्यक्तींची यादी नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार पुढची 50 वर्षं प्रसिद्ध केली जाऊ शकत नाही.
पुरस्कार विजेत्यांना Laureates म्हटलं जातं. प्राचीन ग्रीसमध्ये विजेत्यांना Bay Laurel च्या पानांनी गुंफलेली डोक्यावर अडकवायची wreath किंवा शिरपेच दिला जाई. त्यावरुन हा लॉरिएट्स (Laureates) शब्द आलेला आहे.
नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त 3 विजेत्यांची निवड एकाच वर्षी केली जाऊ शकते.
अशीही काही वर्षं होती ज्यावेळी हे पुरस्कार देण्यात आले नाही. पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान हे पुरस्कार देण्यात आले नव्हते.
यासोबतच नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार जर एखाद्या वर्षी, एखाद्या क्षेत्रात कोणीच जर पुरस्कारासाठी पात्र नसेल तर पुरस्कार दिला जात नाही. त्या बक्षीसाचा निधी पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवला जातो.
नोबेल पुरस्काराविषयीच्या रंजक गोष्टी
2014मध्ये शांततेसाठीचं नोबेल मिळालेली मलाला युसुफजाई ही आतापर्यंतची वयाने सर्वांत लहान विजेती आहे. वयाच्या 17व्या वर्षी मलालाला हा पुरस्कार मिळाला.
जॉन गुडइनफ हे वयाने सर्वांत ज्येष्ठ नोबेल विजेते आहेत. 2019मध्ये वयाच्या 97व्या वर्षी त्यांना रसायनशास्त्रासाठीचं नोबेल मिळालं.
1901 ते 2020 या काळात 57 महिलांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
जॉन पॉल सार्त्र आणि ल ड्युक थो या दोघांनी नोबेल पुरस्कार नाकारला.
मेरी क्युरी आणि ए. पॉलिंग या दोघांना दोन वेगवेगळ्या विषयातंली नोबेल मिळाली आहेत.
क्युरी कुटुंब हे नोबेल पुरस्कार विजेत्यांचं कुटुंब म्हणता येईल. मेरी क्युरी, त्यांचे पती पियर क्युरी आणि या जोडप्याची मुलगी आयरिन ज्युलियट क्युरी या सगळ्यांनाच नोबेल मिळालेला आहे.
रेड क्रॉसला आतापर्यंत तीनदा नोबेल पुरस्कार मिळाला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)