महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो लोक जमा

महाराणी एलिझाबेथ द्वितीय निधन

फोटो स्रोत, PA Media

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव वेस्टमिन्स्टर येथील राजमहालात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या प्रथेला राजघराण्यातील परंपरेनुसार 'लाइंग इन स्टेट' असे म्हणतात.

रविवारी त्यांचे पार्थिव बालमोरल येथून एडिनबराला आणण्यात आले त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोक उभे होते आणि त्यांना अभिवादन करत होते.

महाराणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो लोक जमा झाले आहेत. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागणार असून त्यासाठी काही तासांचा आणि प्रसंगी रात्रीहून अधिक वेळ लागू शकतो, असे सांगण्यात आले आहे.

त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कशी प्रक्रिया असेल याबाबत माहिती देण्यात आली आहे.

लोकांनी आपल्यासोबत अल्पोपहार आणि पेयं आणावी, त्याच बरोबर प्रसंगानुरूप कपडे आणावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बुधवारी सायंकाळी 5.00 पासून ते 19 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत महाराणींचे पार्थिव वेस्टमिन्स्टर येथे राहील. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

या काळात पार्थिवाचे अंत्यदर्शन 24 तास घेता येणार आहे.

2002 साली राजमाता राणी एलिझाबेथ यांचे निधन झाले होते तेव्हा त्यांचे पार्थिव वेस्टमिन्स्टर येथील सभागृहात ठेवण्यात आले होते. तेव्हा दोन लाखांहून अधिक लोकांनी रांगेत उभे राहून त्यांचे अंत्यदर्शन घेतले होते. त्या सभागृहात 'लाइंग इन स्टेट'मध्ये राहिलेल्या राजघराण्यातील शेवटच्या व्यक्ती या महाराणी एलिझाबेथ यांच्या माताच होत्या.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय निधन

फोटो स्रोत, PA Media

महाराणींवरील अंत्यसंस्कार म्हणजे 'परंपरेचे सजीव दर्शनच' म्हणावे लागेल, या शब्दांत वेस्टमिन्स्टरच्या डीन यांनी अंत्यसंस्काराचे वर्णन केले.

रेव्हरंड डॉ. हॉयल म्हणाले, "एका अभूतपूर्व व्यक्तिमत्त्वाला, एकामेवाद्वितीय जीवनाप्रती आभार व्यक्त करण्याची संधी आहे. आम्हाला आमचे दुःख हलके करण्याची ही संधी आहे."

महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाल्यापासून आतापर्यंत हजारो जणांनी त्यांना पुष्पांजली वाहिली आहे. बकिंगहम पॅलेस, सॅंड्रिनघम पॅलेस आणि विंडसर कॅसल येथे हजारोंच्या संख्येनी लोकांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

रविवारी त्यांचे पार्थिव बालमोरल येथून एडिनबराला आणण्यात आले त्यावेळी देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोक उभे होते आणि त्यांना अभिवादन करत होते.

सोमवारी महाराणींचे पार्थिव एडिनबर्ग येथील सेंट गाइल्स कॅथेड्रल याठिकाणी नेण्यात येईल त्यावेळी राजघराण्यातील लोकही उपस्थित राहतील. या ठिकाणी पार्थिव 24 तासांसाठी ठेवण्यात येईल.

या ठिकाणी देखील लोकांना पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल.

लाइंग इन स्टेट या काळात महाराणींची बंद शवपेटिका वेस्टमिन्स्टर येथील संसदेच्या सभागृहात ठेवण्यात येईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)