बालमोरल कॅसलः स्कॉटलंडमधील महाल ज्यावर महाराणी एलिझाबेथ यांचं प्रेम होतं...

महाराणी आणि प्रिन्स फिलिप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराणी आणि प्रिन्स फिलिप विवाहाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त बालमोरलमध्ये 1972

बालमोरलच्या शाही निवासस्थानावर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे किती प्रेम होते हे सर्वश्रुतच आहे.

50 हजार एकरांच्या परिसरात असलेल्या याच किल्ल्यात महाराणींनी आपले यजमान फिलिप आणि कुटुंबासमवेत बहुतेक उन्हाळे घालवले होते.

रम्य अशा या परिसरातील किल्ल्यात महाराणी एलिझाबेथ यांनी अनेक सुट्ट्यांचा काळ आनंदाने घालवला. अगदी तिचे आजोबा जॉर्ज पाचवे, महाराणी मेरी यांच्यासोबतही आणि जीवनाच्या अगदी शेवटच्या काळातही त्या इथेच होत्या.

त्यांनी इथे अनेक गार्डन पार्टींचे आयोजन केले तसेच बाएमर हायलँड गेम्सचा शाही कुटुंबासह आनंद घेतला.

शाही कुटुंब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराणी आणि प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस अॅन, प्रिन्स अँड्र्यू बालमोरलमध्ये 1960

प्रिन्स फिलिप यांच्या आयुष्यातील शेवटच्या वर्षातील बराच काळ त्या इथे होत्या. लॉकडाऊनचा काळ त्यांनी इथेच व्यतित केला तसेच त्या दोघांनी विवाहाचा 73 वा वाढदिवस नोव्हेंबर 2020मध्ये इथेच साजरा केला होता.

बालमोरल हे ब्रिटिश शाही कुटुंबाचं 1852 पासूनचं एक निवासस्थान आहे.

बालमोरल कॅसल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बालमोरल कॅसल शाही कुटुंब 1852 पासून वापरत आहे.

महाराणी व्हिक्टोरिया यांचे यजमान प्रिन्स अल्बर्ट यांनी फार्कसन कुटुंबाकडून इथला मूळ किल्ला विकत घेतला होता. त्यानंतर ते निवासस्थान अपुरं पडू लागल्यावर आजच्या बालमोरल किल्ल्याचं काम करण्यात आलं.

हा किल्ला स्कॉटिश बॅरोनियल स्थापत्याचा एक नमुना असून त्याला ऐतिहासिक महत्व आहे. तो 'कॅटेगरी ए' यादीत ठेवण्यात आला आहे. नवा किल्ला 1856 साली पूर्ण झाला आणि जुना किल्ला काही काळातच पाडण्यात आला.

हा परिसर राणीच्या स्वतःच्या खासगी मालमत्तेत येतो, तो शाही मालमत्तेचा भाग नाही.

या परिसरामध्ये शेती, हरणांचे कळप, पाळीव जनावरं तसेच घोडे पाळलेले आहेत.

31 ऑगस्ट 1997 रोजी प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू झाला तेव्हा शाही कुटुंब इथंच होतं.

बालमोरल कॅसलच्या गेटवर प्रिन्सेस डायना यांना पुष्पांजली वाहताना शाही कुटुंब. सप्टेंबर 1997

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बालमोरल कॅसलच्या गेटवर प्रिन्सेस डायना यांना पुष्पांजली वाहताना शाही कुटुंब. सप्टेंबर 1997

डायना यांच्या मृत्यूनंतर प्रिन्स चार्ल्स, विल्यम, हॅरी, महाराणी यांनी इथल्या क्रॅथी कर्कमधील चर्चमध्ये रविवारी प्रार्थनेला हजेरी लावली होती.

त्यांच्या परतीच्या वाटेत लोकांनी शोकसंदेश आणि पुष्पगुच्छ ठेवण्यात आले होते.

महाराणी, शाही कुटुंबाचे या किल्ल्याशी असणारे संबंध या फोटोंमधून पाहू -

प्रिन्सेस एलिझाबेथ घोडागाडीत आजोबा जॉर्ज पाचवे आणि महाराणी मेरी यांच्यासमवेत चर्चमधून बालमोरलला परतताना (1932 साली)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रिन्सेस एलिझाबेथ घोडागाडीत आजोबा जॉर्ज पाचवे आणि महाराणी मेरी यांच्यासमवेत चर्चमधून बालमोरलला परतताना (1932 साली)
महाराणी आणि प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस अॅन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शाही कुटुंबाची 1951 साली बालमोरल कॅसलला भेट. फोटोत महाराणी आणि प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस अॅन
महाराणी आणि प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस अॅन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराणी प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस अॅनसोबत (1952 साली)
महाराणी आणि प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस अॅन, बालमोरल कॅसलच्या खिडकीमध्ये, 1952

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराणी आणि प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस अॅन, बालमोरल कॅसलच्या खिडकीमध्ये, 1952
महाराणी आणि प्रिन्स चार्ल्स बालमोरल जवळ

फोटो स्रोत, Hulton Deutsch Collection

फोटो कॅप्शन, महाराणी आणि प्रिन्स चार्ल्स बालमोरलजवळ
प्रेसिडेंट आयसेनहॉवर, महाराणी एलिझाबेथ, प्रिन्स फिलिप (सप्टेंबर 1959)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रेसिडेंट आयसेनहॉवर, महाराणी एलिझाबेथ, प्रिन्स फिलिप (सप्टेंबर 1959)
महाराणी आणि प्रिन्स फिलिप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराणी आणि प्रिन्स फिलिप बालमोरलमध्ये
क्वीन रायटिंग डेस्कवर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराणी बालमोरलच्या अभ्यासिकेत 1972
महाराणी आणि प्रिन्स फिलिप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराणी आणि प्रिन्स फिलिप बालमोरलच्या अभ्यासिकेत- 1976 साली
बालमोरल येथे शाही कुटुंब

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, महाराणी एलिझाबेथ, ड्युक ऑफ एडिंबरा, त्यांच्या एडवर्ड, चार्ल्स, अँड्र्यू या तीन मुलांसह आपल्या लग्नाचा 32 वा वाढदिवस साजरा करताना. 20 नोव्हेंबर 1979
महाराणी आणि प्रिन्स फिलिप

फोटो स्रोत, Anwar Hussein Collection/ROTA

फोटो कॅप्शन, महाराणी आणि प्रिन्स फिलिप, 2005
शाही कुटुंब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'टग ऑफ वॉर' खेळ पाहाताना शाही कुटुंब आणि हास्यकल्लोळात बुडालेले कुटुंबीय
गार्डन पार्टी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बालमोरल कॅसल येथे गार्डन पार्टीमध्ये सहभागी होताना, 2012
महाराणी स्वाक्षरी करताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ग्लासगो 2014 राष्ट्रकुल खेळांसाठी संदेश लिहिताना महाराणी
महाराणी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ड्युक आणि डचेस ऑफ केंब्रिजसह क्रॅथी कर्क येथे पोहोचताना, ऑगस्ट 2019
महाराणी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराणी एलिझाबेथ बलाक्लावा कंपनी, 5 बटालियन, रॉयल रेजिमेंट ऑफ स्कॉटिशची बालमोरलमध्ये पाहणी करताना, ऑगस्ट 2021
महाराणी मुलांसह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, क्रॅथी प्राथमिक शाळेतील मुलांनी बालमोरलमध्ये 2021 साली घेतलेली भेट
Queen with Liz Truss

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराणी एलिझाबेथ नव्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचं स्वागत करताना

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)