एअर फ्रायर की मायक्रोवेव्ह ओव्हन, कोणत्या उपकरणातील स्वयंपाक आरोग्यदायी?

फोटो स्रोत, Getty Images
एअर फ्रायरच्या विक्रीत 2021 या वर्षात ब्रिटनमध्ये 400 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
एअर फ्रायरमध्ये तेल अत्यंत कमी प्रमाणात वापरले जाते. असे असेल तर स्वयंपाकाच्या दुसऱ्या पद्धतींच्या तुलनेने हा पर्याय अधिक आरोग्यदायी आहे, असे म्हणता येईल का?
सध्याच्या घडीला जीवनावश्यक खर्चात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत एअर फ्रायरमुळे किती वीज खर्च होते आणि त्याचा खिशावर काय परिणाम होतो, हाही प्रश्न विचारला गेला पाहिजे.
ग्रेग फूट, बीबीसी रेडियो 4 चे स्लाइस्ड-ब्रे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत. त्या या संदर्भात तज्ज्ञांशी चर्चा केली आणि एअरफ्रायर्सची वैशिष्ट्ये व मर्यादा या बद्दल समजून घेण्याचा प्रयत्न केला.
1. स्वयंपाक कसा तयार होतो?
पदार्थांच्या चारही बाजूला गरम हवेचा प्रवाह तयार करून एअरफ्रायर एअर फ्रायरमधील अन्न शिजवलं जातं.
एअर फ्रायर हा साधारण ब्रेड-मशीनच्या आकाराचा असतो. तो किचन काउंटमध्ये व्यवस्थित बसतो. यातील पदार्थाच्या चारही बाजूने गरम हवा अत्यंत वेगाने फिरते.
जेकब रॅड्झिकोवस्की हे लंडनमधील इम्पिरिअर महाविद्यालयात कलिनरी एज्युकेशन डिझायनर आहेत. ते म्हणतात, "ही हवा मुळातच अत्यंत वेग असलेली आणि गरम असते. तुम्ही याचा वापर हेअर ड्रायरसारखाही करू शकता."
"हे यंत्र फॅन-ओव्हनसारखे असते. पण हे आकाराने लहान असते आणि त्यातील पंखा अत्यंत वेगाने फिरतो."
2. एअर फ्रायर हा पारंपरिक ओव्हनपेक्षा जलद अन्न शिजवतो
जेकक म्हणतात की, "एअर फ्रायरचा फॅन अत्यंत शक्तिशाली असतो आणि त्याचा कम्पार्टमेंट आकाराने लहान असतो आणि ते संपूर्ण उपकरणच अत्यंत कार्यक्षम असते."
ते म्हणतात, "एअर फ्रायरमध्ये चिकन लेग पीस तयार होण्यासाठी 20 मिनिटे लागतात, ओव्हनमध्ये यासाठी थोडा अधिक वेळ लागू शकतो."

फोटो स्रोत, Getty Images
त्याचप्रमाणे, यालाच जर एका मोठ्या प्रमाणात शिजवायचे असेल तर याला प्रीहिट करण्यासाठी खूप वेळ लागतो.
पण ज्या जागी ठेवून खाद्यपदार्थ शिजवायचा असतो, ती जागा इतकी लहान असते की, अत्यंत कमी प्रमाणातच अन्न शिजवले जाऊ शकते.
अन्न आणि आहार शास्त्रज्ञांनुसार, "तुम्हाला चार किंवा सहा व्यक्तींसाठी स्वयंपाक करायचा असेल तर हे उपकरण तुमचा वेळ वाचवणार नाही, कारण तुम्हाला फ्रायरमध्ये पदार्थ कमी मात्रेने अनेक वेळा ठेवावे लागतील.
3. कुरकुरीत पदार्थ तयार करण्यासाठी एअर फ्रायरचा वापर केला जातो
एअर फ्रायरच्या जाहिरातींमधील मॉडेल आपल्याला बहुधा चिकन वा फ्राइज तयार करताना दिसतात, कारण काहीही कुरकुरीत खाण्यासाठी हे उपकरण तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
जेकब यांच्या म्हणण्यानुसार, "हे उपकरण तुमच्या पदार्थाला क्रिस्पी, कुरकुरीत करते. त्यामुळे तुम्हाला कुरकुरीत पदार्थ आवडत असतील तर हे उपकरण तुमच्या पदार्थाला कुरकुरीत करते."
4. आरोग्याच्या दृष्टीने हे उपकरण चांगले आहे का?
जेकब म्हणतात की, "भरपूर गरम तेलात पदार्थ तळण्याऐवजी एअर फ्रायरमध्ये पदार्थ तयार करत असाल तर हा निश्चितच एक आरोग्यदायी पर्याय आहे."
पण ओव्हनमध्ये स्वयंपाक करण्याच्या तुलनेनेही एअर फ्रायरमधील स्वयंपाक अधिक आरोग्यदायी असतो.

फोटो स्रोत, Getty Images
बटाट्यांना तेल लावून ते शिजवले तर ते बटाटे भाजताना बटाटा तेल शोषून घेतो. पण एअर फ्रायरमध्ये सगळे बटाटे 'परफोरेटेड बास्केट'मध्ये पडतात.
"एअर फ्रायरमध्ये जास्त तेल असेल तर ते आपोआप गाळले जाऊन खाली पडते आणि ते तुमच्या पदार्थमध्ये येत नाही."
स्वयंपाकासाठी एअर फ्रायरपेक्षा आरोग्यदायी पर्यायही उपलब्ध आहेत. तुम्ही तेल न वापरता पदार्थ ग्रिल करू शकता किंवा स्टीम म्हणजेच वाफेवरही शिजवू शकता.
पण, "एअर फ्रायरचे इतरही काही उपयोग आहेत. एअर फ्राइंगव्यतिरिक्त गरम करणे, भाजणे व ग्रिल करणे" यासाठीही एअर फ्रायरचा उपयोग होतो," असे बीबीसी गुड फूड मॅगझीनच्या संपादक अॅन्या गिल्बर्ट म्हणतात. या मॅगझीनमध्ये उपकरणांचे परीक्षण केलेले असते.
5. एअर फ्रायरच्या किंमतीची रेंजही जास्त आहे आणि विविध मॉडेलचे उपयोगही वेगवेगळे आहेत.
बाजारात अनेक प्रकारचे एअर फ्रायर उपलब्ध आहेत.
"आता ते अधिकाधिक बहुपयोगी होत चालले आहेत.", असे आन्या म्हणतात. "काही नव्या मॉडेलमध्ये तब्बल 15 फंक्शन आहेत."
अलीकडेच बीबीसीच्या गुड फूड मॅगझीनमध्ये यूकेमध्ये उपलब्ध असलेल्या 2022 मधील सर्वोत्तम 14 एअरफ्रायरची यादी प्रकाशित केली. यात वेगवेगळ्या कॅटेगरींनुसार मॉडेलना रेटिंग दिले.
6. एअर फ्रायरसाठी ओव्हनच्या तुलनेने कमी वीज लागते
याची शहानिशा करण्यासाठी बीबीसीच्या स्लाइस्ड ब्रेड प्रोग्रॅमच्या निर्मात्या सिमॉन हॉबन यांनी चिकन तंगडी आणि बाटाट्याचे पदार्थ करून पाहिले. एक भाग त्यांनी ओव्हनमध्ये केला तर दुसरा भाग एअर फ्रायरमध्ये केला (हे पदार्थ करताना इतर उपकरणे बंद केलेली होती.)

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर वीज किती खर्च झाली हे पाहण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिसिटी मीटर तपासला
प्रोग्रॅम टीमने एअर फ्रायर व इलेक्ट्रिक ओव्हनची तुलना केली.
"ओव्हनमध्ये चिकन शिजायला 35 मिनिटे लागली आणि मीटरनुसार यासाठी 1.05 किलोवॅट-तास वीज वापरली गेली. एअरफ्रायरसाठी 20 मिनिटे लागली आणि मीटरनुसार यासाठी 0.43 किलोवॅट-तास लागले.
बटाटे (सालासकट) शिजायला ओव्हनमध्ये सुमारे तासभर लागला म्हणजे 1.31 किलोवॅट-तास खर्च झाले.
"एअर फ्रायरमध्ये यासाठी कमी वेळ लागला.", असे सिमॉन यांनी सांगितले. '35 मिनिटे" ज्यासाठी 0.55 किलोवॅट-तास खर्च झाले.
निष्कर्ष काय?
"ओव्हनच्या तुलनेने एअर फ्रायरमध्ये निम्म्याहून कमी वीज खर्च झाली. म्हणजे ओव्हनमधील स्वयंपाकाचा खर्च एअर फ्रायरमधील स्वयंपाकापेक्षा दुप्पट असतो.
7. एअर फ्रायर ओव्हनला पूर्णपणे रिप्लेस करू शकणार नाही. पण हा एक उत्तम शोध आहे.
एअर फ्रायर ओव्हनची सगळी कामे करेल, असे जेकब रॅड्झिकोवस्की यांना वाटत नाही. "अर्थातच, तुम्ही एअर फ्रायरमध्ये संपूर्ण चिकन भाजू शकत नाही, टर्की तर सोडूनच द्या.!", असे ते म्हणतात.
पण मला वाटते हा एक उत्तम शोध आहे. माझ्याकडे एक आहे. मी त्याचा खूप वापर करतो. मला वाटते, ज्यांच्याकडे ओव्हन नाही त्यांच्यासाठी हे उपयुक्त उपकरण आहे."
अन्यासुद्धा मान्य करते, "मला वाटते, एअर फ्रायर खूपच मस्त आहेत. किचन स्टोरेज व स्वयंपाकाच्या वेळेचा विचार करता ही एक स्मार्ट गुंतवणूक असू शकते. त्यामुळे मी निश्चितच या उपकरणाची चाहती आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








