ट्रकमध्ये सापडले 46 मृतदेह, 16 जण रुग्णालयात दाखल

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतील टेक्सास राज्यात सॅन अँटोनिया शहराच्या बाहेर एका लॉरीमध्ये 46 मृतदेह सापडले आहेत. 16 लोकांना रुग्णालयात नेण्यात आले आहेत. यात 4 लहान मुलांचाही समावेश आहे.
सेंट अँटोनियाच्या नैऋत्येस रेल्वेरुळाजवळ एका मोठ्या ट्रकमध्ये हे मृतदेह सापडले आहेत.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, या वाहनाचा चालक घटनास्थळावरुन बेपत्ता झाल्याचं पोलिसांनी कळवलं आहे.
सेंट अँटोनियो टेक्ससमध्ये असून ते अमेरिका-मेक्सिको सीमेपासून 250 किमी अतंरावर आहे. मानवी तस्करी करणाऱ्या टोळी या रस्त्याचा वापर अवैध पद्धतीने लोकांना अमेरिकेत आणण्यासाठी करतात.
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबट यांनी घटनेची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दिली आहे. 'सीमा सताड उघड्या ठेवण्याचे परिणाम' असं वर्णन त्यांनी केलं आहे.
मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एबरार्ड म्हणाले, मेक्सिकोचे दूत घटनास्थळी पोहोचत आहे. परंतु त्यांना हे लोक अद्याप कोणच्या देशाचे आहेत हे माहिती नाही.

फोटो स्रोत, Getty Images
हे लोक कसे गेले, हे अद्याप समजलेले नाही आणि पोलिसांनीही खुलासा केलेला नाही.
सोमवारी या शहराचे तापमान 39.4 सेल्सिअस इतके होते.
ड्रायव्हर घटनास्थळावरून गायब
सेंट अटोनियोच्या अग्निशमन दलाचे प्रमुख चार्ल्स हुडने पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर आमची आपत्कालीन टीम स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता घटनास्थळी पोहोचली.

फोटो स्रोत, Reuters
त्यांनी पुढे सांगितलं की, "आपल्यासोबत असं व्हायला नको होतं की आम्ही ट्रकमध्ये पाहावं आणि त्यात मृतदेहांचा खच दिसावा. असा विचार करून आमच्यापैकी कुणीच कामाला येत नाही."
हुड यांच्या म्हणण्यानुसार, ट्रक ड्रायव्हरनं ट्रक असंच सोडून दिलं होतं, त्यात ना एसी होतं, ना पिण्याचं पाणी होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








