अफगाणिस्तान भूकंपाने केलेला विनाश समजून घ्या 7 फोटोंमधून

अफगाणिस्तान भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे हजारो लोकांचे प्राण गेले आहेत तर कित्येक जण बेघर झाले आहेत. सध्या या ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अफगाणिस्तानमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ते या फोटोंच्या माध्यमातून तुम्ही समजून घेऊ शकतात.

1. अफगाणिस्तानमध्ये पाक्तिका भागात 22 जूनला पहाटे शक्तिशाली भूकंप झाला असून यामध्ये 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 1500 हून अधिकजण जखमी झाले आहेत, या भूकंपानंतर तालिबानने आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन केले आहे.

2. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदली गेल्याचं अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटलं आहे.

अफगाणिस्तान भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

3. खोस्त नावाच्या शहरापासून साधारण 44 किलोमीटरच्या अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

भूकंपाचे धक्के अफगाणिस्तानच्या बहुतांश भागांसह पाकिस्तान आणि भारतातही जाणवले असं युरोपियन मेडिटेरिअन सेसमोलॉजिकल सेंटरने म्हटलं आहे.

अफगाणिस्तान भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

4. या भूकंपात असंख्य घरं उद्धस्त झाली आहेत असं अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते बिलाल करिमी यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. दुर्घटनाग्रस्त भागाला त्वरित मदत पुरवण्याचं आवाहन संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

पहाटेच्या वेळेस भूकंप झाल्याने अनेकजण झोपेत होते.

अफगाणिस्तान भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

5. अफगाणिस्तानात नेहमीच भूकंप होत असतो, कारण टेक्टोनिक प्लेट्स सक्रिय असणाऱ्या भूमीवर हा देश वसला आहे. अनेक फॉल्ट लाईन्स (भूकंप होती अशा जागा) इथून जातात. यातल्या काही फॉल्ट लाईन्सची नावं आहेत चामान फॉल्ट, हरी रूद फॉल्ट, सेंट्रल बदक्षां फॉल्ट आणि दरवेज फॉल्ट.

गेल्या 10 वर्षांत अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपांमुळे सुमारे 7000 लोकांचे जीव गेलेले आहेत, असं संयुक्त राष्ट्रांच्या एका विभागाचा अहवाल सांगतो.

अफगाणिस्तान भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

6. इथे दरवर्षी सरासरी 560 लोकांचे जीव भूकंपामुळे जातात. तालिबानी अधिकाऱ्यांनी सरकारी यंत्रणांनी मदतीसाठी तत्परतेने धावून जावं असं म्हटलं आहे. कित्येक दशकं सततच्या संघर्षामुळे भूकंपविरोधी यंत्रणा तयार करण्यात या देशाला अपयश आलेलं आहे.

अफगाणिस्तान भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

7. अफगाणिस्तानातल्या संदेशवहनाच्या सुविधांवरही मोठा परिणाम झाला आहे. भूकंपामुळे अनेक मोबाईल टॉवर्स भुईसपाट झाले आहेत. इथल्या एका स्थानिक पत्रकारांनी सांगितलं की मृत्यूचा आकडा आणखी वाढू शकतो.

अफगाणिस्तान भूकंप

फोटो स्रोत, Getty Images

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)