प्रेषित मोहम्मद पैगंबर अवमान प्रकरण : भारत सरकारविरोधात कुवेतच्या खासदारांचं दबावतंत्र

कुवैत संसद (प्रातिनिधिक छायाचित्र)

फोटो स्रोत, YASSER AL-ZAYYAT/AFP VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, कुवैत संसद (प्रातिनिधिक छायाचित्र)

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि दिल्ली भाजपचे नवीन कुमार जिंदाल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं.

या वक्तव्याचा निषेध देशभरातून तर झालाचं पण आखाती देशांनी ही या वक्तव्यांवर तिखट प्रतिक्रिया दिली. एवढं होऊनही हा वाद अजून काही थांबलेला नाही.

कुवेत सरकारने भारतावर सर्वतोपरी दबाव आणावा अशी मागणी तेथील संसद सदस्यांनी गुरुवारी केली आहे.

कुवेत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल असेंब्लीच्या सदस्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवेदनानुसार, भारतातील मुस्लीम आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई निषेधार्ह आहे. या निवेदनावर असेंम्बलीच्या 50 पैकी 30 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कुवेतची इंग्रजी न्यूज वेबसाईट अरब टाईम्सने तर या बातमीला मुख्य स्थान दिलं आहे.

अरब टाइम्सने लिहिलयं की, "एकूण 30 संसद सदस्यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून मोहम्मद पैगंबरांवरील अपमानास्पद वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. या सदस्यांनी कुवेत आणि इतर इस्लामिक देशांच्या सरकारांनी भारत सरकारवर राजकीय, राजनैतिक आणि आर्थिक दबाव आणावा असं आवाहनही केलंय."

भारतीय मुस्लिमांच्या शांततापूर्ण आंदोलनांना पाठिंबा द्यायला हवा, असं ही या निवेदनात म्हटलं आहे. 30 सदस्यांच्या वतीने बोलताना सदस्य असलेले ओसामा अल-साहीन म्हणाले की, संसदेतील सर्व सदस्यांनी हे निवेदन एकमताने मंजूर करायला हवं होतं."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

या 30 सदस्यांनी स्वाक्षरी केलेलं निवेदन कुवेत इन्स्टिट्यूट आणि लीगल स्टडीजच्या सदस्यांनी ट्वीट केलं आहे.

कुवेत टाइम्सने लिहिलंय की, आखाती देशांमध्ये जे 80 लाख भारतीय राहतात त्यातल्या हिंदुत्ववाद्यांना भारतात परत पाठवण्याची मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे. मोहम्मद पैगंबरांच्या अपमानाचा बदला घ्यायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे.

या 30 सदस्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलयं की, "भारत सरकार, पक्ष आणि माध्यमांच्या वतीने मोहम्मद पैगंबरांचा जो काही अपमान झालाय तो कुवैत नॅशनल असेंब्ली सदस्यांना मान्य नाही. त्याचप्रमाणे भारतीय मुस्लिमांवरील पोलिस कारवाईचाही आम्ही निषेध करतो."

यापूर्वी कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांना बोलावून निषेधाचं पत्र सादर केलं होतं. कुवेतच्या आशियाई प्रकरणांच्या सहाय्यक परराष्ट्र सचिवांनी या पत्रात नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध केला होता.

परदेशी आंदोलकांना बाहेर काढण्याची चर्चा

13 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, मोहम्मद पैगंबर यांच्यावर भाजपच्या माजी प्रवक्त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कुवेत मध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांनी आंदोलन केलं होतं.

आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

अरब टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आंदोलकांवर कडक कारवाई करण्याच्या हेतूने कुवेत प्रशासनाने त्यांना अटक करून त्यांच्या देशात परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. पुढे कुवेत सरकारने या वादावर नवे निर्देश जाहीर केले होते. या निर्देशांनुसार ज्यांनी या वक्तव्याबाबत निदर्शने केली, त्यांना त्यांच्या देशांमध्ये परत पाठवण्यात येईल.

"सर्व परदेशी नागरिकांनी स्थानिक कायद्याचा करावा. तसेच कोणत्याही प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये." असं ही सरकारने आपल्या निर्देशांमध्ये नमूद केलं होतं.

या आंदोलकांमध्ये पाकिस्तानी, बांग्लादेशी आणि अरब देशांतील नागरिक तसेच भारतीयांचा ही समावेश असल्याचा अंदाज होता. 10 जून रोजी, शुक्रवारच्या नमाजानंतर, 40-50 परदेशी नागरिकांनी कुवेतच्या फहेल भागात आंदोलन करायला सुरुवात केली, तसेच घोषणाबाजीही केली.

कुवेतमध्ये परदेशी नागरिकांकडून करण्यात आलेली निदर्शने आणि आंदोलने हा गंभीर गुन्हा मानला जातो. भविष्यात अशाप्रकारे कायद्याचं उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासनालाही या प्रकरणात मापदंड घालून द्यायचा होता. कुवेत सरकार या आंदोलनात सहभागी झालेल्या स्थानिक नागरिकांवर ही योग्य ती कारवाई करू शकते.

कुवेत हा आखाती भागातला भारताचा सर्वात जुना मित्र देश आहे. कुवेतच्या राजघराण्याचे भारताशी ऐतिहासिक संबंध आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुवेतने भारताला मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केला होता.

भारतीय वस्तूंवर बहिष्कार

वृत्तसंस्था एएफपीनुसार, मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर कुवेतमधील एका सुपरमार्केटने भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकला.

अल-अर्दिया को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्टोअरच्या लोकांनी भारतीय चहा आणि इतर उत्पादने ट्रॉलीमधून बाहेर काढून निषेध नोंदवला.

नुपूर शर्मा

फोटो स्रोत, NUPURSHARMABJP

फोटो कॅप्शन, नुपूर शर्मा

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सौदी अरेबिया, कतार आणि इतर अनेक अरब देशांसह कैरोच्या अल अझहर विद्यापीठानेही निषेध नोंदवला होता.

अरब न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कुवेत बाहेरील सुपरमार्केटमध्ये ठेवलेल्या भारतीय तांदूळ, मसाले आणि मिरच्यांच्या पिशव्या प्लास्टिक शीटने झाकल्या होत्या. यासोबतच आम्ही भारतीय उत्पादने काढून टाकली आहेत असं ही त्या शीटवर लिहिण्यात आलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

स्टोअरचे सीईओ नासेर अल मुतारी एएफपीशी बोलताना म्हणाले की, "कुवेती मुस्लिम पैगंबराचा अपमान सहन करू शकत नाही."

स्टोअर चेनच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, भारतीय उत्पादनांवर मोठ्या प्रमाणावर बहिष्कार घालण्याचा विचार सुरू आहे.

पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भारताने माफी मागावी, अशी मागणी रविवारीच्या दिवशी कतारने केली. यानंतर इराण आणि कतारने भारतीय राजदूतांना बोलावणं धाडलं. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटशो दरम्यान मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यानंतर मुस्लिम देशांमध्ये संतापाची लाट उसळली.

मात्र, त्यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं तर दुसरीकडे दिल्ली भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)