You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आरोग्य-आहार : फूड डिलिव्हरी अॅप्समुळे वाढतोय लठ्ठपणा- WHO
घरबसल्या खाणंपिणं उपलब्ध करून देणाऱ्या फूड डिलिव्हरी अॅप्समुळे तसंच ऑनलाईन गेमिंगच्या लोकप्रियतेमुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
लहान मुलांमध्ये लठ्ठपणा कमी व्हावा यासाठी युरोपातील कोणताही देश उपाययोजना करत नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
प्रौढ जनतेपैकी 60 टक्के लोक तर लहान मुलांपैकी एक तृतीयांश मुलं लठ्ठ आहेत. कोव्हिड काळात हे प्रमाण आणखी वाढलं आहे.
तब्येत बिघडवतील अशा पदार्थांचं विपणन, आरोग्य चांगलं राखायला मदत करतील अशा पदार्थांची किंमत कमी करणं, सर्वांनी थोडा तरी का होईना व्यायाम करणं हे लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनं युरोपियन रिजनल ओबेसिटी रिपोर्ट 2022 मध्ये यासंदर्भात विस्तृतपणे लिहिलं आहे. अतिरिक्त वजन तसंच लठ्ठपणा यांचं प्रमाण साथीच्या रोगाप्रमाणे वाढलं आहे. अमेरिकेत लठ्ठ लोकांचं प्रमाण युरोपमध्ये जास्त आहे.
लठ्ठपणामुळे युरोपात दरवर्षी 1.2 दशलक्ष जणांचा मृत्यू होत आहे. एकूण मृत्यूच्या प्रमाणापैकी 13 टक्के मृत्यू हे लठ्ठपणामुळे होत आहेत. 200,000 कॅन्सर केस समोर येत आहेत.
शरीरात अतिरिक्त चरबी साठल्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळतं. अतिरिक्त वजनामुळे 13 विविध प्रकारचे कॅन्सर, टाईप 2 डायबेटिस, हृदयविकार, फुप्फुसांचे विकार हे बळावतात. लठ्ठपणामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं व्यंगत्वही येतं.
लठ्ठपणा हा गुंतागुंतीचा आजार आहे. आरोग्याला अपायकारक खाणंपिणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही लठ्ठपणा वाढीस लागण्याची प्रमुख कारणं आहेत.
लठ्ठपणाला कोणत्याही मर्यादा नाहीत. तो जगात सगळीकडे सर्व स्तरांमध्ये पसरणारा आजार आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचं युरोप विभागाचे प्रादेशिक संचालक डॉ. हान्स क्लुग यांनी सांगितलं.
युरोपातील देशांमध्ये वैविध्य आहे पण प्रत्येकासमोर लठ्ठपणाने नवं आव्हान उभं केलं आहे.
खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयींमुळे आपण लठ्ठपणाला कमी करू शकतो असं त्यांनी सांगितलं.
खाणंपिण्याच्या सवयींवर तंत्रज्ञानाने मोठा परिणाम केला आहे. लोकांनी स्वत:च्या खाण्यापिण्याच्या सवयींवर काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं असं हा अहवाल सांगतो.
फूड डिलिव्हरी अप्सच्या वाढत्या वापरामुळे अतिरिक्त चरबी निर्माण होईल तसंच साखरेचं प्रमाण अधिक असलेल्या अशा खाद्यपदार्थांचं सेवन वाढलं आहे.
युकेमधील अहवालानुसार टेकअवे पद्धतीतून खाणंपिणं घेणं म्हणजे दिवसाला 200 कॅलरीचा भार शरीरावर टाकण्यासारखं आहे. आठवडाभराचा अंदाज काढला तर लहान मुलं आठवड्याला एक अख्ख्या दिवसात शरीरात जाईल एवढी चरबी अतिरिक्त खात असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ऑनलाईन फूड डिलिव्हिरी अप्सचा सकारात्मक पद्धतीने उपयोग करून घेतला तर आरोग्यदायी खाता येऊ शकतं आणि वजन नियंत्रणात राखता येईल असं लठ्ठपणावरच्या युरोपियन काँग्रेसमध्ये सूर पाहायला मिळाला.
लहान मुलांमध्ये ऑनलाईन गेमिंग प्रचंड लोकप्रिय आहे. लहान मुलं दिवसभर गेमिंगमध्ये व्यग्र असल्यामुळे आरोग्य बिघडवणाऱ्या सवयी लागतात. लहान मुलं बराच वेळ बसून राहतात, त्यांच्या शरीराचं चलनवलन होत नाही.
फूड डिलिव्हरी अप्ससाठी जे तंत्रज्ञान वापरलं जातं त्याचा उपयोग लहान मुलांचं आरोग्य सुधारावं यासाठी करता येऊ शकतो असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
युरोपात विशेषत: युकेत दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लठ्ठ जनता आहे.
लठ्ठपणाला आळा घालण्यासाठी युकेत काही योजना आखण्यात आल्या आहेत. मोठी हॉटेलं आणि कॅफेंना खाद्यपदार्थात किती कॅलरी आहेत याची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
बाय वन गेट वन फ्री अशा योजना विपणनासाठी अमलात आणल्या जातात. लोक गरजेपेक्षा अधिक खाद्यपदार्थ घेत असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे अशा योजना रद्दबातल करण्यात येणार आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)