You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'विल स्मिथने ख्रिस रॉकला थोबाडीत मारल्याच्या प्रकरणावर हॉलिवुडमधील सेलिब्रिटींना काय वाटतं?
अभिनेता विल स्मिथने सूत्रसंचालक ख्रिस रॉकला थोबाडीत लगावल्याचं प्रकरण विविध पातळ्यांवर गाजत आहे. रॉक यांनी केलेली खोचक कोटी, त्याला विल स्मिथला दिलेलं शारीरिक प्रत्युत्तर, या वादंगानंतरही ऑस्कर सोहळा नीट पार पडणं या सगळ्याकडे या क्षेत्रातील विविध व्यक्तींनी मतं मांडली.
महिलांचं संरक्षण कसं करावं, अमेरिकेच्या समाजात हिंसेकडे बघण्याची वृत्ती हे सगळं यानिमित्ताने उफाळून निघालं आहे.
ब्रेकनंतर वातावरण हसत खेळवं ठेवावं या उद्देशाने रॉक बोलत होते. यावेळी त्यांच्या तोडून विल स्मिथच्या पत्नीसंदर्भात उद्गार निघाले. विल यांना हे उद्गार आक्षेपार्ह वाटले आणि त्यांनी व्यासपीठावर जाऊन रॉक यांच्या कानशिलात लगावली. या घटनेने सगळं वातावरण पालटलं. याचा फटका केवळ रॉकला बसला असं नाही, असं कॉमेडिअन अमी शूमर यांनी म्हटलं आहे.
"मेथड अक्टिंग म्हणजे शास्त्रोक्त अभिनयाला स्मिथने गांभीर्याने घेतलं. माईक लोरे नावाचं शीघ्रकोपी असं एक पात्र विल स्मिथ यांनी रंगवलं होतं. त्यांचं वर्तन माईक जसं वागेल तसं होतं. बाकी मंडळींना जे घडलं ते आगामी काळासाठी धोकादायक आहे असं वाटतं."
दिग्दर्शक ज्युड अपटाऊ यांनी त्यांचं ट्वीट डिलिट केलं पण त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "विल स्मिथ यांच्या रागाचं परिवर्तन ख्रिस रॉकचा जीव जाण्यात होऊ शकलं असतं. स्मिथ यांनी सारासार विवेकबुद्धी दाखवली नाही," असं अपटाऊ यांना वाटतं.
विल स्मिथ यांना अटक व्हायला हवी आणि त्यांच्यावर शारीरिक मारहाणाची कलमं लागू करण्यात यावी असं काहींना वाटतं.
अभिनेत्री तिफानी हाडिश यांनी विल यांनी बायकोसाठी जे केलं ते योग्यच होतं असं वाटतं. रॉक यांच्या बोलण्यानंतर विल स्मिथ यांनी जे केलं ते कदाचित तुम्हाला पटणार नाही. पण माझ्यासाठी ही अतिशय सुंदर गोष्ट आहे असं त्यांनी पीपल मासिकाला सांगितलं.
हाडिश यांनी पिंकेट स्मिथ यांच्याबरोबर गर्ल्स ट्रिप नावाच्या चित्रपटात काम केलं होतं. कृष्णवर्णीय महिलांना उद्देशून विनोद केले जातात, त्यांची खिल्ली उडवली जाते. त्यामुळे कृष्णवर्णीय पुरुषाने कृष्णवर्णीय महिलेसाठी ठामपणे उभं राहणं माझ्यासाठी आशयघन आहे.
अनेकांनी रॉक यांची निर्मिती असलेल्या एका गोष्टीकडे लक्ष वेधलं. 'गुड हेअर' नावाच्या माहितीपटाची निर्मिती रॉक यांनीच केली होती.
कृष्णवर्णीय संस्कृतीत केसांना असलेलं महत्त्व हा त्या माहितीपटाचा विषय होता. या संस्कृतीची, माणसांची पुरेशी माहिती असतानाही रॉक यांनी विल स्मिथ यांच्या पत्नीसंदर्भात अशी टिप्पणी करणं धक्कादायक होतं.
अॅलोपेशिया या आजारामुळे केस जातात यासंदर्भात पिंकेट स्मिथ यांनी जाहीर भूमिका घेतली होती.
विल स्मिथ यांनी रॉकला थोबाडीत लगावलं. या प्रसंगानंतर थोड्या वेळात विल यांना किंग रिचर्ड चित्रपटातील रिचर्ड विल्यम्स यांच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना विल भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला रॉक यांची माफी मागायला नकार दिला होता.
लोकांवर प्रेम करावं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहावं हा माझ्या आयुष्याचा मंत्र आहे. कलेत जीवनाचं प्रतिबिंब दिसतं असं विल म्हणाले होते.
विल यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आईला समर्पित केला. माझ्यासाठी हा क्षण भावनिक गुंतागुंतीचा आहे असं विल म्हणाले.
ही शेवटची ओळ रेडिओ निवेदक लेनार्ड मॅककेल्हवे यांना महत्त्वाची वाटते. द ब्रेकफास्ट क्लब या त्यांच्या लोकप्रिय कार्यक्रमादरम्यान त्यांनी यासंदर्भात मनोगत मांडलं. ख्रिस रॉकच्या कोटीवरील विल यांची प्रतिक्रिया हे हिमनगाचं टोक आहे. रॉक यांच्या उद्गारांवर विल यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या मनात चाललेल्या खळबळीचं प्रतीक आहे, ज्याची आपल्याला माहिती नाही असं लेनार्ड यांनी सांगितलं.
घरगुती हिंसाचाराने ग्रस्त अशा घरात विल यांचं बालपण गेलं. त्यांचे वडील आईला मारहाण करत असत. आत्मचरित्रात विल यांनी याबाबत सविस्तर लिहिलं आहे. मारहाणीच्या घटनांनी त्यांचं बालपण ढवळून निघालं आणि त्याचा परिणाम म्हणूनच त्यांनी या क्षेत्रात काम करायचं ठरवलं.
मी आतापर्यंत जे काम केलं आहे त्या सगळ्यामध्ये त्या दिवशी मी न केलेल्या कृतीसाठीची माफी आहे. मी कितीही यशस्वी झालो तरी त्या ढिम्मपणाचा सल आयुष्यभर कायम राहील. माझ्या मनात तेव्हा षंढपणा असल्याची बोच सतत टोचत राहील.
हिंसेचं जग
मानसशास्त्रज्ञ रेव्ह डॉ. जॅक्युई लुईस यांनी स्मिथ यांचं आत्मचरित्र वाचलं आहे. पण त्यांनी विल यांच्यावर उपचार केलेले नाहीत. कुटुंबांचं रक्षण करण्यासाठी विल यांना अन्य पर्याय स्वीकारता आले असते.
काहीतरी असं घडलं जेव्हा विल यांना आपल्या मनाप्रमाणे वागता आलं नाही. ते आपल्या कोणाबाबतीतही घडू शकतं. त्यांच्या वडिलांनी जशी आईला मारहाण केली तशी मारहाण करणारा माणूस व्हावं असं विल यांना नक्कीच वाटत नसेल. पण कालच्या प्रसंगानंतर विल यांची प्रतिमा अशीच काहीशी झाली.
रॉक आणि विल यांच्यात जे झालं ते बहुतांशवेळा सेलिब्रेटींबरोबर घडतं. आपल्या भवतालातलही हिंसा, हिंसक होणं किती सहज मुरलं आहे याची जाणीव करून देणारा तो प्रसंग होता.
शाब्दिक, शारीरिक, भावनिक, भौगोलिक, राजकीय परिप्रेक्ष्यातील हिंसा आणि विनोदही जो हिंसक होतो. रॉक यांचं बोलणंही हिंसक होतं. हे सगळं एकमेकांत गुंफलेलं आहे. याचं इतकं सार्वत्रिकीकरण झालं आहे की हे असंच होतं हे आपण सर्रास बोलू लागलो आहोत.
हिंसेला हिंसेनेच प्रतिकार द्यावा असं आहे का? याचं उत्तर मी तरी नाही असं देईन.
विषारी आणि विध्वंसक
स्मिथ यांनी इन्स्टाग्रामवर टाकलेल्या सविस्तर पोस्टमध्ये रॉकची माफी मागितली. माझं वागणं असमर्थनीय आणि चुकीचं होतं असं विल यांनी म्हटलं आहे. वागणं सुधारण्याचं काम सुरू आहे असं विल यांनी म्हटलं आहे.
कोणत्याही प्रकारातली हिंसा ही विषारी आणि विध्वंसक असते. मला अतिशय खजील वाटतं आहे. मी जसा आहे तसं माझं वागणं नव्हतं. प्रेम आणि दयेच्या जगात हिंसेला काहीच स्थान नाही.
विल यांनी रॉकची जाहीरपणे माफी मागताना लिहिलं- मी मर्यादा ओलांडली आणि ते चूक होतं.
रेडिओ निवेदक मॅककोले यांच्यासह अनेकांनी रॉक यांनी ज्या पद्धतीने हे सगळं हाताळलं त्याचं कौतुक केलं आहे. असा प्रसंग ओढवल्यानंतरही रॉक यांनी कोणताही गोंधळ होऊ न देता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरूच ठेवलं,
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)