रशिया - युक्रेन युद्ध : राष्ट्राध्यक्ष पुतिन युद्ध गुन्हेगार, अमेरिकन सिनेटमध्ये ठराव मंजूर

झेलेन्स्की

फोटो स्रोत, Getty Images

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे युद्ध गुन्हेगार (War Criminal) असल्याचा ठराव अमेरिकन सिनेटने एकमताने मंजूर केलाय.

अमेरिकन सिनेटमधल्या प्रत्येक सदस्याने या ठरावाच्या बाजूने मतदान करत पुतिन यांच्या युक्रेनवर हल्ला करण्याच्या निर्णयाचा हेगमधल्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने तपास करावा अशी मागणी केली आहे.

युक्रेनमधल्या अत्याचारांसाठी पुतिन यांना जबाबदार ठरवण्यात यावं असं अमेरिकन डेमोक्रॅट सिनेटर चक शूमर हे या ठरावावरील मतदानाच्या आधी म्णाले.

तर हा ठराव मांडताना रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी म्हटलं, "माझ्यासाठी यापुढची पायरी म्हणजे ब्रिटन आणि इतर सहकाऱ्यांसोबत काम करणं. यातून एक सेल बनवण्यात यावा जो युद्ध अपराध करणाऱ्या रशियन सैन्याच्या तुकड्या आणि कमांडर्सबद्दलची माहिती सार्वजनिक करेल. या अधिकाऱ्यांची नावं जाहीर करत त्यांना लाज वाटावी, यासाठीची मोहीम राबवण्यात येईल"

दरम्यान युद्ध थांबवण्यासाठीच्या रशियासोबतच्या वाटाघाटींमध्ये 'आता खऱ्या चर्चेला' सुरुवात झाली असली तरी तोडगा निघण्यासाठी अजून वेळ आवश्यक असल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

फेसबुकवर त्यांनी एक व्हीडिओ पोस्ट केलाय. रशियावर विजय मिळवण्यासाठी वाटाघाटी करणाऱ्या टीमसकट सगळ्या युक्रेनियन नागरिकांना मेहनत घ्यावी लागणार असल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय.

नाटोमध्ये सहभागी होण्याचा आपला कोणताही इरादा नाही हे युक्रेनने अधिकृतरित्या जाहीर करावं असं दडपण रशियाकडून आणलं जातंय. सोबतच दोनेत्स्क, लुहान्स्क आणि क्रायमिया या फुटीरतावाद्यांच्या ताब्यातल्या भागांना स्वतंत्र मानावं असंही रशियाचं म्हणणं आहे.

बुधवारी (16 मार्च) रशिया - युक्रेनमधल्या वाटाघाटी सुरू राहतील.

युक्रेन नाटोमध्ये सहभागी होणार नसल्याचं झेलेन्स्की यांनी मंगळवारी (15 मार्च) म्हटलं होतं.

वाटाघाटींदरम्यान दोन्ही देशांमध्ये 'पायाभूत मतभेद' होत असले तरी 'तडजोडीसाठी नक्कीच जागा असल्याचं' युक्रेनतर्फे वाटाघाटी करणाऱ्या मिखाईलो पोडोल्याक यांनी म्हटलं होतं.

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज युक्रेनला आणखीन शस्त्रं पाठवण्याविषयीची घोषणा करतील. 1 अब्ज डॉलर्स मूल्याची शस्त्रास्त्रं अमेरिका युक्रेनला पाठवेल असं वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटलंय. यामध्ये चिलखती गाड्या, अँटी एअरक्राफ्ट वेपन्स असतील.

दरम्यान लव्हिह शहरामध्ये अजूनही हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरनचे आवाज घुमतायत. रशिया हवाई हल्ला करणार असल्यास हा सायरन वाजवला जातो आणि नागरिक सुरक्षेसाठी जमिनीखालच्या बंकर्समध्ये आसरा घेतात.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

अमेरिकेच्या फॉक्स न्यूजचे दोन पत्रकार युक्रेनमध्ये मारले गेलेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचं ते वार्तांकन करत होते.

55 वर्षांचे कॅमेरामन पिअर झाक्रझेव्हस्की आणि 24 वर्षांच्या ओलेक्सांड्रा कुव्शिनोव्हा यांचा मृत्यू झालाय. कीव्ह शहराच्या बाहेरच्या भागात त्यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात हे दोघंही ठार झाल्याचं नेटवर्कने म्हटलंय.

त्यांचे एक सहकारी बेंजामिन हॉल जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)