युक्रेन-रशिया तणाव : अमेरिका युरोपातील सैन्याची तैनाती वाढवणार

युक्रेन सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे या आठवड्यात युरोपला आणखी 2000 सैनिक पाठवत आहेत. रशिया युक्रेनवर हल्ला करण्याची शक्यता असल्यानं हे सैनिक पाठवले जाणार असल्याचं व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

फोर्ट ब्रॅग, नॉर्थ कॅरोलिनामधून पोलंड आणि जर्मनीमध्ये हे सैन्य पाठवलं जाणार आहे. तसंच आधीच जर्मनीत असलेले 1000 सैनिक रोमानियाला जाणार आहेत.

रशियानं हल्ला करण्याची कोणतीही शक्यता फेटाळली आहे. पण तरीही रशियानं जवळपास 10 हजार सैनिक युक्रेन जवळच्या सीमेवर तैनात केले आहेत.

रशियानं युक्रेनला अमेरिकेच्या नेतृत्वातील नेटो लष्करी आघाडीमध्ये सहभागी होण्यास तीव्र विरोध केला आहे.

रशियानं युक्रेनच्या दक्षिणेला असलेल्या क्रिमियावर ताबा मिळवल्यानंतर आणि पूर्व डोनबास भागातील रक्तरंजित बंडाला पाठिंबा दिल्यानंतर आठ वर्षांनी हे संकट निर्माण झालं आहे.

मॉस्कोनं युक्रेनच्या सरकारवर पूर्व भागात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.

याठिकाणी रशिया समर्थित बंडखोरांनी भूभागावर नियंत्रण मिळवलं आहे. याठिकाणी 2014 पासून किमान 14000 लोक मारले गेले आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)