युक्रेनमधून परत या; अमेरिका-युकेचा दूतावासातील कर्मचाऱ्यांना आदेश

युक्रेन, रशिया, अमेरिका, युके

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युक्रेन-रशिया यांच्यातला संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.

युक्रेनमध्ये रशियाकडून आक्रमणाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर युकेने युक्रेनमधल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना परत बोलावलं आहे.

ब्रिटिश अधिकाऱ्यांना धमक्या मिळालेल्या नाहीत पण किव्ह इथल्या दूतावास कार्यालयातील निम्म्याहून अधिक मंडळी मायदेशी परतत आहेत.

रशियाकडून कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो या शक्यतेमुळे अमेरिकेने युक्रेनमधल्या आपल्या दूतावासातील नातेवाईकांना मायदेशी परतण्याचा आदेश दिला आहे.

रशियाने युक्रेनमध्ये लष्करी आक्रमण करणार असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. पण युक्रेन-रशियाच्या सीमेवर रशियाच्या हजारो सैनिकांच्या तुकड्या सज्ज आहेत.

युकेच्या युक्रेनमधील दूतावासाने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावलं आहे. त्यांना गेल्या 24 तासात कोणतीही धमकी किंवा इशारा मिळालेलं नाही.

युरोपियन युनियनच्या कार्यालयातील कर्मचारी तूर्तास युक्रेनमध्ये असतील. युरोपियन युनियनचे परराष्ट्र सचिव जोसेप बोरेल यांनी परिस्थिती निर्णायक झाली नसल्याचं सांगितलं.

नाटो देशांपैकी डेन्मार्क, स्पेन, बल्गेरिया तसंच नेदरलँड्स या देशांनी बचावाचा भाग म्हणून या भागासाठी फायटर जेट्स विमानं पाठवायला सुरुवात केली आहे.

युक्रेनच्या सीमेवर रशियाचे लाखभर सैनिक सज्ज आहेत. नाटोच्या प्रमुखांनी युरोपात नवा संघर्ष पेटू शकतो असा इशारा दिला आहे.

संबंधित देशातली परिस्थिती नाजूक अथवा संवेदनशील असेल तर दूतावासात कार्यरत कर्मचाऱ्यांचे नातेवाईक, घरचे यांना मायदेशी पाचारण केलं जातं अशी अमेरिकेची पद्धत आहे असं बीबीसीच्या बार्बरा प्लेट अशर यांनी सांगितलं.

प्रवासासंदर्भात जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार परिस्थिती अनपेक्षित वळण घेऊ शकते. रशिया मोठ्या कुमकेसह युक्रेनमध्ये लष्करी आक्रमण करण्याच्या बेतात आहे.

अमेरिकेने आपल्या नागरिकांना रशिया किंवा युक्रेन या देशांमध्ये जाऊ नका असा सल्ला दिला आहे. या देशांमध्ये अमेरिकेविरुद्धच्या परिस्थितीचा तुम्हाला फटका बसू शकतो असं अमेरिकेने म्हटलं आहे. नॉन इसेन्शियल अर्थात दैनंदिन कामकाजाचा भाग नसलेल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना तसंच युक्रेनमधील अमेरिकेच्या नागरिकांना मायदेशी पाठवण्यात येत आहे.

रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केल्यास आमच्या नागरिकांना इथून बाहेर काढणं कठीण असेल असं अमेरिकेने म्हटलं आहे.

अमेरिकेने दूतावासातील कर्मचारी तसंच नागरिकांना मायदेशी बोलावून घेणं हे अतिकाळजीतून आणि झटपट घेतलेला निर्णय आहे असं युक्रेनने म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)