रशिया-युक्रेन संघर्ष टाळण्यात अमेरिकेला यश येईल का?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन हे सध्या युरोपमध्ये दाखल झालं आहे. ते युरोपात तीन प्रमुख गोष्टींवर भूमिका मांडताना दिसत आहेत.
रशियन सैन्याच्या आक्रमणाविरुद्ध अमेरिकेचा युक्रेनला पाठिंबा असेल, गरज पडल्यास सहयोगी देशांना एकत्रित आणण्यासाठी तसच कूटनितीक तोडगा काढण्यासाठी रशियासोबत बैठका घेणं या गोष्टींवर त्यांची नजर असणार आहे.
ब्लिंकन यांचा हा दौरा अचानक जाहीर करण्यात आला, त्यामागचं कारण स्पष्ट आहे.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी तसंच परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी फक्त दोन दिवसांपूर्वीच निवेदन पाठवलं होतं. या प्रक्रियेदरम्यान ब्लिंकन यांनी एकच संदेश त्यांना पाठवला.
ते म्हणाले, अमेरिका युक्रेनच्या सोबत आहे. रशियाकडे एका बाजूला कूटनितीक चर्चा आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष आणि परिणाम यांचा पर्याय आहे.
या प्रकरणात अमेरिकेने आघाडी घेतल्याचं सुरुवातीला दिसत होतं. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं एक वक्तव्य समोर आलं.
सुमारे दोन तास चाललेल्या एका पत्रकार परिषदेत बायडन म्हणाले, "अमेरिका यासंदर्भात निश्चितपणे आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करेल. रशियाकडून युक्रेनवर होत असलेल्या घुसखोरीचं उत्तर कसं द्यावं, यावर चर्चा केली जाईल."
रशिया युक्रेनच्या आतमध्ये प्रवेश करेल, ही भितीही बायडन यांनी व्यक्त केली.
क्वाडचा हेतू
पुढच्याच दिवशी परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांनी अमेरिकेच्या क्वाड सहयोगी देशांची भेट घेतली. बर्लिनमध्ये जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्सच्या अधिकाऱ्यांना ते भेटत होते.
पण यादरम्यान रशियन घुसखोरीवर एकत्रित भूमिका मांडण्याऐवजी राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यात त्यांचा जास्त वेळ गेला.
नॉर्ड-स्ट्रीम-2 गॅस पाईपलाईन
यादरम्यान, युक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की नाराजीचा सूर दर्शवणारे ट्वीट करत होते. जो बायडन यांनी आपल्या आपल्या वक्तव्यातून रशियन आक्रमणाला एक प्रकारे हिरवा झेंडाच दाखवला आहे, अशी चर्चा इतर सरकारी अधिकाऱ्यांच्या बोलण्यात सुरू होती.

फोटो स्रोत, EPA
जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अनालेना बेयरबॉक यांच्यासोबत ब्लिंकन यांची संयुक्त पत्रकार परिषदही ठेवण्यात आली होती.
रशियाने हल्ला चढवला तर कशा प्रकारे निर्बंध लावण्यात येतील, यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.
पण यावेळी रशियापासून ते जर्मनीपर्यंतच्या नॉर्ड स्ट्रीम - 2 या गॅस पाईपलाईनचं काम स्थगित करण्यात येईल की नाही, याबाबत स्पष्ट उल्लेख झाला नाही.
ऊर्जा क्षेत्रात निर्बंध
ऊर्जा क्षेत्रात निर्बंध लावल्यानंतरच रशियाला त्याचे परिणाम सर्वात ठळकपणे दिसू शकतात. पण सध्या तरी तशी शक्यता दिसून येत नाही.
कारण युरोप हा रशियन नैसर्गिक वायूवर अवलंबून आहे. त्यामुळे अमेरिकेत पेट्रोलचे दर वाढल्यास त्याचा परिणाम तिथल्या राजकारणावरही पडेल, त्यामुळे बायडन यांना ते नको आहे.
त्याव्यतिरिक्त क्वाड समूहातही अनेक समस्या असल्याचं जाणवतं.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत एक वेगळी कूटनितीक रणनिती बनवण्यास इच्छूक आहेत.
अमेरिका आणि त्यांचे सहयोगी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
द्विपक्षीय बैठक
ब्लिंकन आणि रशियाचे सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यादरम्यान शुक्रवारी (21 जानेवारी) द्विपक्षीय बैठक झाली. स्वीत्झर्लंडच्या जिनेव्हामध्ये ऐतिहासिक प्रेसिडेंट विल्सन हॉटेलमध्ये अमेरिकन आणि रशियन पत्रकारांची गर्दी होती.

फोटो स्रोत, Reuters
लाव्हरोव्ह यांच्या मते, त्यांना ठोस प्रस्तावांसोबतच ठोस उत्तराची अपेक्षा आहे. ज्यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे नाटो कधीच युक्रेनसारख्या पूर्वीच्या सोव्हिएत देशांमध्ये आपला विस्तार वाढवणार नाही.
तर ब्लिंकन यांनी यावर प्रतिक्रिया देताना युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा अमेरिका आणि त्यांचे सहयोगी देश एकत्रितपणे चोख प्रत्युत्तर देतील, अशा शब्दात पुनरूच्चार केला.
बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी म्हटलं , "चर्चेत खूपच कमी प्रगती झाली, अपेक्षाही कमीच होती."
युक्रेनच्या सीमेवरसध्या 1 लाखांपेक्षा जास्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. पण आपली युक्रेनवर हल्ला करण्याची कोणतीही योजना नसल्याचं लाव्हारोव्ह यांनी स्पष्ट केलं.
ब्लिंकन म्हणाले, "अमेरिका आणि युरोपीय देशांसाठी नाटोचं ओपन डोअर धोरण कायम असेल. त्याशिवाय रशियाच्या समस्यांचा आपण लिखीत उत्तर पुढच्या आठवड्यात देऊ."
पण युक्रेन हा नाटो सदस्य देश नाही, ही बाब युक्रेनच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे.
रशियाचा फायदा काय?
दोन्ही पक्षांनी यावर चर्चा सुरू ठेवण्याचं म्हटलं आहे. तसंच यावरून बायडन आणि पुतीन यांच्यात भविष्यात बैठक होण्याची शक्यताही आहे. पण या समस्येवर तोडगा काहीही निघो, रशियासाठी हा सगळा प्रकार म्हणजे विजयाप्रमाणेच आहे.

फोटो स्रोत, EPA
या सर्व गोष्टींमुळे जगाचं लक्ष पुन्हा एकदा रशियाकडे वेधलं गेलं आहे. एकीकडे अमेरिका आणि चीनविरुद्ध स्पर्धा करत असताना त्यांनी अमेरिका आणि त्यांच्या सहयोगी देशांना उचकवणं ही मोठी गोष्ट आहे.
ब्लिंकन यांनी बर्लिनमध्ये गुरुवारी दिलेल्या भाषणात रशियाला जुन्या दिवसांची आठवण करून दिली.
रशियाला पुन्हा जगात शीतयुद्ध सुरू करायचं आहे, असा आरोप त्यांनी केला. शिवाय व्लादिमीर पुतीन तसं होऊ देणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दोन्ही पक्ष या मुद्द्यावर अजूनही चर्चा करत आहेत. पण कोणत्याही निष्कर्षाशिवाय चर्चा थांबते, अशी परिस्थिती आहे.
पुढच्या आठवड्यात अमेरिका याचं लिखीत उत्तर देणार आहे. त्याचा वापर रशिया पुढील चर्चेकरिता करू शकतो. युक्रेनमध्ये अमेरिकेच्या उच्चायुक्त कार्यालयातील अधिकारीही संभ्रमावस्थेत आहेत. या परिस्थितीमुळे कोणत्या शक्यता निर्माण होऊ शकतात, याकडे त्यांचं लक्ष असणं स्वाभाविक आहे.
त्यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत काहीही होऊ शकतं. अमेरिका रशियासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न पुढेही सुरू ठेवेल की नाही. तसंच तिथे पुतीन यांच्या डोक्यात काय विचार सुरू आहेत, हे पाहणं महत्त्वांचं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








