निकालाआधी मतकेंद्रावर पोलिसांचा लाठीचार्च, माजी महापौरांना मारहाण
निकालाआधी मतकेंद्रावर पोलिसांचा लाठीचार्च, माजी महापौरांना मारहाण
छत्रपती संभाजीनगर येथे मतमोजणी आधी माजी महापौराला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्याआधी अनेक ठिकाणी कार्यकर्ते केंद्रांबाहेर गर्दी करत आहेत.
शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रावर गेटवरून उमेदवारांच्या प्रतिनिधींना आत सोडत असताना झालेल्या गोंधळानंतर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.
यामध्ये माजी महापौर विकास जैन यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप शिंदेसेनेच्या उमेदवार हर्षदा शिरसाट यांनी संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






