'बेबी, हालचाल करू नकोस'; झोपेतून उठलेल्या महिलेच्या छातीवर भला मोठा अजगर आढळल्यानं खळबळ

रेचल ब्लर यांच्या छातीवर एक मोठा अजगर होता.

फोटो स्रोत, Rachel Bloor

फोटो कॅप्शन, रेचल ब्लर यांच्या छातीवर एक मोठा अजगर होता.
    • Author, टिफनी टर्नबुल
    • Reporting from, सिडनी

एक महिला मध्यरात्री अचानक झोपेतून जागी झाली. तिला छातीवर काहीतरी जड वजन असल्याचं जाणवल्यानं ती जागी झाली. मात्र, झोपेतून उठून छातीवर काय आहे हे पाहिलं तर ती जड वस्तू म्हणजे एक मोठा अजगर होता. यानं एकच खळबळ उडाली.

या महिलेचं नाव रेचल ब्लर असून ही घटना सोमवारी (12 जानेवारी) ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे घडली.

ही महिला झोपेत अंथुरणातील पाळीव कुत्र्याला हात लावण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तिच्या हाताला गुळगुळीत, सरपटणारी गोष्ट लागली.

यामुळे घाबरलेल्या रेचल यांनी चादर डोक्यावर घेतली. तेवढ्यात तिच्या जोडीदाराने बेडजवळील दिवा लावला आणि या दाम्पत्याची भीती खरी ठरली.

"यानंतर तो म्हणाला की, बेबी, हालचाल करू नकोस. तुझ्या अंगावर साधारण 2.5 मीटरचा (8 फूट) अजगर आहे," असं रॅचलनं बीबीसीला सांगितलं.

या घटनेनंतर या महिलेच्या तोंडात सर्वांत आधी शिवीच आली. नंतर तिने म्हटले की आधी कुत्र्याला घराबाहेर घेऊन जा.

"माझ्या डॅल्मेशियनला (कुत्र्याची प्रजाती) जर साप तिथे आहे हे कळले, तर मोठा गोंधळ उडेल, असे मला वाटले," असंही रॅचलनं नमूद केलं.

तो अजगर किती मोठा होता?

कुत्र्याला खोलीबाहेर सुरक्षित ठेवल्यानंतर रेचलच्या पतीला आपणही त्यांच्यासोबत असतो तर बरे झाले असते असे वाटले. यावेळी रेचल यांनी हळूच स्वतःला चादरीखालून स्वतःला दूर केलं.

'मी फक्त चादरीखालून हळूच बाहेर सरकत होते. मनात सतत विचार येत होता की, हे खरंच घडतेय का. सगळं खूप विचित्र होतं," अशी भावना रेचल यांनी व्यक्त केली.

रेचल यांच्यामते हा बिनविषारी 'कार्पेट पायथॉन' खिडकीच्या शटरमधून आत शिरला आणि थेट त्यांच्या पलंगावर आला.

अजगरापासून सुटका झाल्यानंतर रेचल यांनी त्या अजगराला तो जेथून घरात आला तेथूनच त्याला बाहेर ढकलण्यास सुरुवात केली.

"तो अजगर इतका मोठा होता की, तो माझ्यावर अंगावर गुंडाळलेला असतानाही त्याच्या शेपटीचा काही भाग खिडकीच्या शटरबाहेर शिल्लक होता," अशी माहिती रॅचल यांनी दिली.

त्यांनी पुढे सांगितलं, "मी त्या अजगराला पकडले आणि तरीही तो फार घाबरलेला वाटत नव्हता. तो माझ्या हातात थोडासा डुलत होता."

"तो अजगर इतका मोठा होता की, तो माझ्यावर अंगावर गुंडाळलेला असतानाही त्याच्या शेपटीचा काही भाग खिडकीच्या शटरबाहेर शिल्लक होता"

फोटो स्रोत, Rachel Bloor

फोटो कॅप्शन, "तो अजगर इतका मोठा होता की, तो माझ्यावर अंगावर गुंडाळलेला असतानाही त्याच्या शेपटीचा काही भाग खिडकीच्या शटरबाहेर शिल्लक होता"

असं असलं तरी, रेचल यांच्या पतीसाठी हा अनुभव धक्कादायक होता. मात्र, रॅचल फारशा घाबरलेल्या नव्हत्या. कारण त्या लहानपणापासून सापांच्या अवतीभवतीच वाढल्या.

"माझ्यामते, तुम्ही शांत असाल, तर तेही शांत राहतात," असं त्यांनी म्हटलं. मात्र जर तो देशातील अतिशय हानिकारक आणि कीटकांपैकी एक केन प्रजातीचा बेडूक असता, तर परिस्थिती वेगळी असती, असंही त्या नमूद करतात.

रेचल म्हणाल्या, "मला केन बेडूक अजिबात आवडत नाही. ते पाहिले की मळमळ होते. त्यामुळे तो बेडूक असता, तर मी खूप घाबरले असते."

या घटनेत घरातील माणसं आणि प्राणी सर्वजण सुरक्षित राहिले.

कार्पेट अजगर हा गळ्याला वेढा घालून शिकार करणारा साप आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात आढळतो. पक्ष्यांसारखे लहान सस्तन प्राणी हा त्यांचा आहार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)