लाईटहाऊसच्या या फोटोने पटकावलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस

व्हाइटफोर्ड पॉईंट लाईटहाऊस

फोटो स्रोत, Steve Liddiard

फोटो कॅप्शन, व्हाइटफोर्ड पॉईंट लाईटहाऊस

वेल्सच्या गोवर बेटांवरील व्हाईटफोर्ड पॉईंट लाईटहाऊसच्या एका फोटोकरिता छायाचित्रकार स्टीव्ह लिडियार्ड यांना हिस्टॉरिक फोटोग्राफर ऑफ द ईयर 2021 चा पुरस्कार देण्यात आला आहे.

लिडियार्ड याविषयी बोलताना म्हणाले, "जॉन बोवेन यांनी बनवलेल्या डिझाईननुसार 1865 मध्ये हे लाईटहाऊस बांधण्यात आलं होतं. याठिकाणी 1854 मध्येही एक इमारत होती. पण त्याचे अवशेष उरलेले नव्हते. या आकाराचा हा ब्रिटनमधील एकमेव कास्ट आयरन टॉवर आहे. लाटांचा मार खाऊनही आज ही इमारत याठिकाणी दिमाखात उभी आहे."

या स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या फोटोंचं मूल्यांकन त्याचं महत्त्व, तांत्रिक उपयोग, तसंच या फोटोच्या मागील कहाणी आणि त्याचा ऐतिहासिक प्रभाव या बाबींवर करण्यात आलं.

या स्पर्धेत इतिहासकार डॅन स्नो यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. ते म्हणाले, "हा पुरस्कार स्पर्धकांच्या एका परफेक्ट फोटो क्लिक करण्याच्या इच्छा आणि प्रयत्नांना अधोरेखित करतो. एका चांगल्या फोटोसाठी फोटोग्राफर अख्खी रात्र जागून काढू शकतात, पर्वतांवर चढाई करतात, दुर्गम ठिकाणांचाही प्रवास करतात."

क्लिफ्टन ब्रिज

फोटो स्रोत, Sam Binding

फोटो कॅप्शन, क्लिफ्टन ब्रिज

या स्पर्धेत हिस्टोरिक इंग्लंड गटात सॅम बायडिंग यांनी काढलेला ब्रिस्टलच्या क्लिफ्टन सस्पेन्शन ब्रिजचा फोटो अव्वल आला आहे.

बायडिंग म्हणतात, "मी नियमितपणे माझ्या श्वानाला फिरवण्यासाठी क्लिफ्टन ब्रिजला जात असतो. हा ब्रिज शहराचं प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. त्यादिवशी धुक्यांमुळे ब्रिजच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली होती."

बुडालेली दोन जहाजं

फोटो स्रोत, Iain McCallum

फोटो कॅप्शन, बुडालेली दोन जहाजं

या स्पर्धेत इयान मॅक्कलम यांनी ड्रोननी क्लिक केलेला फोटो 'जिथं इतिहास घडला' गटात निवडण्यात आला. त्यांनी 1960 मध्ये सेवर्न नदीत बुडालेल्या वेस्टेल एच आणि आर्कनडेल एच जहाजांचा एक फोटो घेतला. ही दोन्ही जहाजं एकमेकांत धडक होऊन बुडाली होती.

या स्पर्धेत नामांकन मिळालेले इतर काही फोटो आपण पाहू.

द शँबेल्स, यॉर्क इंग्लंड.

छायाचित्र - डेव्हिड ऑक्सटेबी.

यॉर्क येथील शँबल्स स्ट्रीट

फोटो स्रोत, David Oxtaby

फोटो कॅप्शन, यॉर्क येथील शँबल्स स्ट्रीट

इंग्लंडचं हेअरफोर्ड कॅथेड्रल.

छायाचित्र - जो बोर्जसोनी

हेअरफोर्ड कॅथेड्रल

फोटो स्रोत, Jo Borzsony

फोटो कॅप्शन, हेअरफोर्ड कॅथेड्रल

संकनकर्क, लेक डिस्ट्रिक्ट, इंग्लंड.

छायाचित्र - मॅथ्यू टर्नर

संकनकर्क, लेक डिस्ट्रिक्ट, इंग्लंड

फोटो स्रोत, Matthew James Turner

फोटो कॅप्शन, संकनकर्क, लेक डिस्ट्रिक्ट, इंग्लंड

माऊंट नेमरूत, टर्की.

छायाचित्र - मेहमत मासूम

माऊंट नेमरूत, टर्की

फोटो स्रोत, Mehmet Masum Suer

फोटो कॅप्शन, माऊंट नेमरूत, टर्की

नॉश्वान्सटाईन कॅसल, बावारिया, जर्मनी.

छायाचित्र - मायकल वेल्श.

नॉश्वान्सटाईन कॅसल

फोटो स्रोत, Michael Welch

फोटो कॅप्शन, नॉश्वान्सटाईन कॅसल

बॅटरसी पॉवर स्टेशन, लंडन.

छायाचित्र - पीट एडमंड्स.

बॅटरसी पॉवर स्टेशन, लंडन

फोटो स्रोत, Pete Edmunds

फोटो कॅप्शन, बॅटरसी पॉवर स्टेशन, लंडन

कोर्फ कॅसल, इंग्लंड.

छायाचित्र - सॅम बायडिंग.

कोर्फ कॅसल, इंग्लंड

फोटो स्रोत, Sam Binding

फोटो कॅप्शन, कोर्फ कॅसल, इंग्लंड

बॉमबर्ग कॅसल, इंग्लंड.

छायाचित्र - स्कॉट अँटक्लिफ

बॉमबर्ग कॅसल, इंग्लंड

फोटो स्रोत, Scott Antcliffe

फोटो कॅप्शन, बॉमबर्ग कॅसल, इंग्लंड

ब्रिव्हरी शाफ्ट, इंग्लंड.

छायाचित्र - टॉम मॅकनेली

ब्रिव्हरी शाफ्ट, इंग्लंड

फोटो स्रोत, Tom McNally

फोटो कॅप्शन, ब्रिव्हरी शाफ्ट, इंग्लंड

द अॅटोमिक बॉम्ब डोम, हिरोशिमा, जपान.

छायाचित्र - व्हेयन बझ

द अॅटोमिक बॉम्ब डोम

फोटो स्रोत, Wayne Budge

फोटो कॅप्शन, द अॅटोमिक बॉम्ब डोम

1973 अमेरिकन नेव्हीचं सी-117 डी.

छायाचित्र - येव्हेन सामूशेंको

1973 अमेरिकन नेव्हीचं सी-117डी, आइसलैंड

फोटो स्रोत, Yevhen Samuchenko

फोटो कॅप्शन, 1973 अमेरिकन नेव्हीचं सी-117डी, आइसलैंड

हॅडरियन वॉल, इंग्लंड.

छायाचित्र - केले ब्लेअर.

हॅडरियन वॉल, इंग्लंड

फोटो स्रोत, Kayleigh Blair

फोटो कॅप्शन, हॅडरियन वॉल, इंग्लंड

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)