You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंडोनेशिया : क्षमतेपेक्षा जास्त कैदी भरलेल्या तुरुंगात आग, 41 जणांचा होरपळून मृत्यू
इंडोनिशियातची राजधानी जकार्ताच्या एका तुरुंगात आग लागल्यामुळे 41 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी भरलेले होते.
बुधवार, 8 सप्टेंबरला पहाटे जकार्तातल्या तांगेरांग या तुरुंगात आग भडकली. यावेळी बहुतांश कैदी झोपेत हेते.
तुरुंगाच्या ब्लॉक-C मध्ये 122 कैदी होते. या ब्लॉकची क्षमता 40 कैद्यांची आहे. याच ब्लॉकमध्ये सर्वाधिक हानी झाली.
मृतांमध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. यात पोर्तुगाल आणि दक्षिण आफ्रिकेतले नागरिक जे या तुरुंगात कैदी होते, त्यांचाही मृत्यू झाला आहे.
इंडोनेशियाचे कायदा आणि मानवी हक्क मंत्री यासोन्ना लाओली यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, या देशांच्या दुतावासांना घटनेची माहिती देण्यात आलेली आहे.
लाओली यांनी म्हटलं की, या ब्लॉकमधल्या अनेक खोल्या बंद होत्या आणि आग भडकली तेव्हा उघडता आल्या नाहीत.
तांगेरांग तुरुंगाच्या ब्लॉक C मध्ये ते कैदी होते जे ड्रग्ससंबधित गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत होते. मृतांपैकी एक कैदी खूनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत होता तर एकाला दहशतवादाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती.
अनेक कैदी जखमी झाल्याचं म्हटलं जातंय, यातले काही अतिदक्षता विभागात आहेत.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं म्हटलं जातंय. पण इंडोनेशियाच्या तुरुंग व्यवस्थेचे प्रवक्ते म्हणाले की आग शॉर्टसर्किटमुळे लागली याला अजून दुजोरा दिला जाऊ शकत नाही. याबद्दल अधिक तपास सुरू आहे.
या तुरुंगाची क्षमता 600 कैद्यांची आहे पण इथे 2000 कैदी ठेवलेत. संपूर्ण इमारतीत फक्त 15 गार्ड ड्युटीवर होते. क्षमतेपेक्षा जास्त भरलेले तुरुंग हा इंडोनेशियातला मोठा प्रश्न आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)