टोकियो पॅरालिम्पिक: क्रीडा दिनी भारतीय पॅरालिम्पिकपटूंची पदकांची भेट

निषाद कुमार

फोटो स्रोत, Getty Images

टोकियो इथं सुरू असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी क्रीडादिनी देशवासीयांना तीन पदकांची भेट दिली आहे.

भारतीय खेळाडूंनी दोन रौप्य आणि एक कांस्य अशी मिळून एकूण तीन पदके जिंकली. टेबल टेनिसपटू भाविना पटेलने दिवसाची सुरुवात रौप्यपदकाने केली. तर संध्याकाळ अखेरीस निषाद कुमारने उंच उडीत रौप्य आणि विनोद कुमारने डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक जिंकले.

उंच उडी टी-47 स्पर्धेत सहभागी झालेल्या निषादने 2.06 मीटरसह रौप्यपदक जिंकले. 2019 मध्ये पदार्पण केलेल्या निषादचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याने पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकत आशियाई विक्रमाची बरोबरी केली. निषाद कुमार ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.

भारतीय धावपटू राम पालची कामगिरीही स्तुत्य होती. त्याने 1.94 मीटर उडी घेऊन पाचवे स्थान मिळवले, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

निषादने पदक जिंकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून त्यांचे अभिनंदन केले. "टोकियोहून आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. निषाद कुमारला रौप्यपदक जिंकताना पाहून खूप आनंद झाला. उत्कृष्ट कौशल्य आणि चिकाटी असलेला तो एक उल्लेखनीय खेळाडू आहे. त्याचे अभिनंदन", असे मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. निषादसोबत मोदींनी कांस्यपदक पटकावलेल्या विनोद कुमारचेही अभिनंदन केले.

आज सकाळी भविना पटेलने रौप्यपदकाची कमाई केली होती. टेबल टेनिस (क्लास 4) च्या अंतिम सामन्यात भारताच्या भविना पटेलला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भविनाला या स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या चाओ यिंगने तिला नमवलं.

या स्पर्धेत टेबल टेनिस खेळात अंतिम फेरी गाठणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. क्लास 4 गटाच्या सेमी फायनलमध्ये भविनाने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनच्या मिआओ झांगवर 3-2 (7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8) असा शानदार विजय मिळवला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)