EngvsNew : आठ वर्षांपूर्वीचं ट्वीट भोवलं, कसोटी पदार्पणात इंग्लंडच्या बॉलरवर बंदी

फोटो स्रोत, Shaun Botterill
इंग्लंडचा क्रिकेटपटू ओली रॉबिन्सनवर आक्षेपार्ह ट्वीटप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे.
27वर्षीय रॉबिन्सनला टेस्ट कॅप देण्यात आल्यानंतर काही तासात सोशल मीडियावर त्याने 8 वर्षांपूर्वी केलेले ट्वीट्स व्हायरल झाले. आक्षेपार्ह ट्वीटसाठी रॉबिन्सनने माफी मागितली.
"मी वर्णद्वेषी तसंच लिंगभेदी नाही. आठ वर्षांपूर्वीच्या या कृतीचा मला पश्चाताप झाला आहे. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. मी कोणताही विचार न करता बेजबाबदार वागले होतो. या गोष्टी समजण्याइतकं माझं वय नव्हतं. मी माफी मागतो," असं रॉबिन्सनने सांगितलं.
मात्र माफीनाम्यानंतरही हे प्रकरण शमलं नाही आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने रॉबिन्सनवर कारवाई केली आहे.
आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने रॉबिन्सनचा या कसोटीत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला होता . जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे या मालिकेत खेळत नाहीये.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रॉबिन्सनच्या नावावर 63 सामन्यात 279 विकेट्स आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि 7 अर्धशतकंही आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिली कसोटी लॉर्ड्स इथे तर दुसरी कसोटी बर्मिंगहॅम इथे होणार आहे.
आयपीएल स्पर्धेचा भाग असलेले बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स, मोईन अली, सॅम करन यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








