मंगळावरून नासाच्या पर्सिव्हिअरन्स रोव्हरने 100 दिवसांत पाठवलेले भन्नाट फोटो पाहिलेत का?

नासाचा पर्सिव्हिअरन्स रोव्हर मंगळ ग्रहावर उतरून 100 दिवस पूर्ण झाले आहेत. मंगळावर यापूर्वी कधी जीवसृष्टी होती का, या ग्रहाचा भूगोल कसा आहे, वातावरण कसं होतं आणि आता कसं आहे, या सगळ्याचा शोध हा रोव्हर घेतोय.

18 फेब्रुवारीला मंगळावर उतरल्यापासून या रोबोने त्याच्या आजूबाजूच्या परिसराचे फोटो काढायला सुरुवात केली. रोव्हर जिथे उतरला ते येझरो विवर (Jezero Crater) या ग्रहाच्या विषुववृत्ताच्या उत्तरेला असून ते 49 किलोमीटर्स व्यासाचं आहे.

या रोव्हरवर असणाऱ्या इंजेन्युईटी (Ingenuity) या लहानशा हेलिकॉप्टरनेही हवेतून काही फोटो काढले आहेत. या ग्रहावर उडवण्यात आलेलं हे पहिलं हेलिकॉप्टर आहे.

नासाच्या या मंगळ मोहिमेदरम्यान पाठवण्यात आलेल्या छायाचित्रांपैकी ही काही निवडक छायाचित्रं.

पर्सिव्हिअरन्स रोव्हर मंगळावरचं एक वर्ष म्हणजे पृथ्वीवरची साधारण दोन वर्षं काम करेल इतक्या निधीची तरतूद सध्या या मोहिमेसाठी करण्यात आलेली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)