मंगळावरून नासाच्या पर्सिव्हिअरन्स रोव्हरने 100 दिवसांत पाठवलेले भन्नाट फोटो पाहिलेत का?

नासाच्या पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या उंच खांबावरच्या कॅमेऱ्याने काढलेला फोटो, 27 मार्च 2021

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech/ASU

फोटो कॅप्शन, नासाच्या पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या उंच खांबावरच्या कॅमेऱ्याने काढलेला फोटो, 27 मार्च 2021

नासाचा पर्सिव्हिअरन्स रोव्हर मंगळ ग्रहावर उतरून 100 दिवस पूर्ण झाले आहेत. मंगळावर यापूर्वी कधी जीवसृष्टी होती का, या ग्रहाचा भूगोल कसा आहे, वातावरण कसं होतं आणि आता कसं आहे, या सगळ्याचा शोध हा रोव्हर घेतोय.

18 फेब्रुवारीला मंगळावर उतरल्यापासून या रोबोने त्याच्या आजूबाजूच्या परिसराचे फोटो काढायला सुरुवात केली. रोव्हर जिथे उतरला ते येझरो विवर (Jezero Crater) या ग्रहाच्या विषुववृत्ताच्या उत्तरेला असून ते 49 किलोमीटर्स व्यासाचं आहे.

या रोव्हरवर असणाऱ्या इंजेन्युईटी (Ingenuity) या लहानशा हेलिकॉप्टरनेही हवेतून काही फोटो काढले आहेत. या ग्रहावर उडवण्यात आलेलं हे पहिलं हेलिकॉप्टर आहे.

नासाच्या या मंगळ मोहिमेदरम्यान पाठवण्यात आलेल्या छायाचित्रांपैकी ही काही निवडक छायाचित्रं.

6 एप्रिलला पर्सिव्हिअरन्सने Watson (Wide Angle Topographic Sensor for Operations and Engineering) कॅमेऱ्याने हा सेल्फी फोटो काढला.

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech/MSSS

फोटो कॅप्शन, 6 एप्रिलला पर्सिव्हिअरन्सने Watson (Wide Angle Topographic Sensor for Operations and Engineering) कॅमेऱ्याने हा सेल्फी फोटो काढला. शेजारीच इंजेन्युइटी हेलिकॉप्टरही दिसतंय. पृथ्वीवर पाठवलेले एकूण 62 फोटो एकत्र जोडून हा फोटो तयार करण्यात आलाय.
1px transparent line
पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या खाली चारही पायांवर उभं असणारं इंजेन्युईटी हेलिकॉप्टर, 30 मार्च 2021

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech/MSSS

फोटो कॅप्शन, पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या खाली चारही पायांवर उभं असणारं इंजेन्युईटी हेलिकॉप्टर, 30 मार्च 2021
1px transparent line
या इंजेन्युईटी हेलिकॉप्टरचं वजन आहे 1.8 किलो, मंगळावरच्या विरळ वातावरणामध्ये हेलिकॉप्टर उडवण्याचा हा पहिलाच प्रयत्न असून या हेलिकॉप्टरचं यशस्वी उड्डाण पुढच्या मंगळ मोहिमांसाठी तंत्रज्ञानाच्या नव्या कक्षा खुल्या करणारं ठरणार आहे.

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech/ASU

फोटो कॅप्शन, या इंजेन्युईटी हेलिकॉप्टरचं वजन आहे 1.8 किलो, मंगळावरच्या विरळ वातावरणामध्ये हेलिकॉप्टर उडवण्याचा हा पहिलाच प्रयत्न असून या हेलिकॉप्टरचं यशस्वी उड्डाण पुढच्या मंगळ मोहिमांसाठी तंत्रज्ञानाच्या नव्या कक्षा खुल्या करणारं ठरणार आहे. 5 एप्रिल 2021
1px transparent line
इंजेन्युईटी हेलिकॉप्टरचं पहिलं उड्डाण

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech

फोटो कॅप्शन, एका वेगळ्या ग्रहावर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी उड्डाण करत 19 एप्रिलला इंजेन्युईटीने इतिहास घडवला. या फोटोच्या मध्यभागी हे हेलिकॉप्टर दिसतंय. जमिनीपासून 3 मीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर काही सेकंदं तरंगत राहिलं आणि पुन्हा जमिनीवर टेकलं.
1px transparent line
इंजेन्युईटी हेलिकॉप्टरने काढलेला पहिला फोटो. दुसऱ्या उड्डाणादरम्यान हे हेलिकॉप्टर पृष्ठभागापासून 5 मीटरवर तरंगत 6 फूट पुढे गेलं आणि माघारी आलं. या फोटोत पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या चाकांच्या खुणा आणि हेलिकॉप्टरची सावली दिसतेय. 22 एप्रिल 2021

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech

फोटो कॅप्शन, इंजेन्युईटी हेलिकॉप्टरने काढलेला पहिला फोटो. दुसऱ्या उड्डाणादरम्यान हे हेलिकॉप्टर पृष्ठभागापासून 5 मीटरवर तरंगत 6 फूट पुढे गेलं आणि माघारी आलं. या फोटोत पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या चाकांच्या खुणा आणि हेलिकॉप्टरची सावली दिसतेय. 22 एप्रिल 2021
1px transparent line
तिसऱ्या उड्डाणादरम्यान इंजेन्युइटी हेलिकॉप्टरने काढलेला पर्सिव्हिअरन्सचा फोटो.

फोटो स्रोत, NASA/JPL-CALTECH

फोटो कॅप्शन, तिसऱ्या उड्डाणादरम्यान इंजेन्युइटी हेलिकॉप्टरने काढलेला पर्सिव्हिअरन्सचा फोटो.
1px transparent line
7 मे रोजी इंजेन्युईटी हेलिकॉप्टरने 10 मीटर उंच जात 423 फुटांचं अंतर पार केलं आणि एका नवीन जागी ते उतरलं.

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech

फोटो कॅप्शन, 7 मे रोजी इंजेन्युईटी हेलिकॉप्टरने 10 मीटर उंच उडत 423 फुटांचं अंतर पार केलं आणि एका नवीन जागी ते उतरलं.
1px transparent line
येझरो विवरात उतरल्यानंतर पर्सिव्हिअरन्स रोव्हरचा पहिला फेरफटका. एक टन वजनाच्या या रोव्हरवर मंगळाचा पृष्ठभागाचा, वातावरणाचा आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठीची उपकरणं आहेत. 4 मार्च 2021

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech

फोटो कॅप्शन, येझरो विवरात उतरल्यानंतर पर्सिव्हिअरन्स रोव्हरचा पहिला फेरफटका. एक टन वजनाच्या या रोव्हरवर मंगळाचा पृष्ठभागाचा, वातावरणाचा आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठीची उपकरणं आहेत. 4 मार्च 2021
1px transparent line
पर्सिव्हिअरन्स रोव्हरवर असणाऱ्या लेझरच्या मदतीने ग्रहाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात येतो. फोटोतला हा दगड 15 सेंटीमीटरचा आहे आणि रोव्हरच्या उपकरणाने त्याची पाहणी करताना झालेली छिद्रं यात दिसतायत. 28 मार्च 2021

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech/ASU

फोटो कॅप्शन, पर्सिव्हिअरन्स रोव्हरवर असणाऱ्या लेझरच्या मदतीने ग्रहाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात येतो. फोटोतला हा दगड 15 सेंटीमीटरचा आहे आणि रोव्हरच्या उपकरणाने त्याची पाहणी करताना झालेली छिद्रं यात दिसतायत. 28 मार्च 2021
1px transparent line
या रोव्हरवर वेगवेगळे कॅमेरे आहेत. हा फोटो रोव्हरच्या उजव्या डोळ्याने काढलाय. मानवी डोळ्यांना जे दृश्य दिसतं, तसं चित्र पर्सिव्हिअरनच्या उंच खांबावर असणाऱ्या दोन कॅमेऱ्यांच्या मदतीने मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. 13 मे 2021

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech/ASU

फोटो कॅप्शन, या रोव्हरवर वेगवेगळे कॅमेरे आहेत. हा फोटो रोव्हरच्या उजव्या डोळ्याने काढलाय. मानवी डोळ्यांना जे दृश्य दिसतं, तसं चित्र पर्सिव्हिअरनच्या उंच खांबावर असणाऱ्या दोन कॅमेऱ्यांच्या मदतीने मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. 13 मे 2021
1px transparent line
पर्सिव्हिअरन्सच्या डाव्या डोळ्याने म्हणजे डाव्या बाजूच्या कॅमेऱ्याने काढलेला फोटो. 22 मार्च 2021

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech/ASU

फोटो कॅप्शन, पर्सिव्हिअरन्सच्या डाव्या डोळ्याने म्हणजे डाव्या बाजूच्या कॅमेऱ्याने काढलेला फोटो. 22 मार्च 2021
1px transparent line
या फोटोतल्या टेकडीचं नाव आहे सांता क्रूझ. रोव्हरपासून अडीच किलोमीटरवर ही टेकडी होती. हा मंगळावरच्या येझरो विवराचा भाग आहे. या टेकडीपलिकडे दूरवर या विवराचा काठ दिसतोय. 20 एप्रिल 2021

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech/ASU/MSSS

फोटो कॅप्शन, या फोटोतल्या टेकडीचं नाव आहे सांता क्रूझ. रोव्हरपासून अडीच किलोमीटरवर ही टेकडी होती. हा मंगळावरच्या येझरो विवराचा भाग आहे. या टेकडीपलिकडे दूरवर या विवराचा काठ दिसतोय. 20 एप्रिल 2021
1px transparent line

पर्सिव्हिअरन्स रोव्हर मंगळावरचं एक वर्ष म्हणजे पृथ्वीवरची साधारण दोन वर्षं काम करेल इतक्या निधीची तरतूद सध्या या मोहिमेसाठी करण्यात आलेली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)