Perseverance : मंगळ ग्रहावर उतरला नासाचा 'पर्सव्हिअरन्स' रोव्हर

मंगळावरचं येझरो विवर

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, पर्सव्हिअरन्स रोव्हरने पाठवलेला मंगळाच्या पृष्ठभागाचा पहिला फोटो. यामध्ये या रोव्हरच्या रोबोटिक आर्मची म्हणजे हाताची सावली दिसतेय.
    • Author, जोनाथन अमॉस
    • Role, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी

मंगळावरच्या जमिनीवर आता एक नवीन रोबो वावरतोय.

मंगळाच्या विषुववृत्ताच्या जवळच्या येझरो (Jezero) नावाच्या एका खोल विवरामध्ये 'पर्सव्हिअरन्स' रोव्हर उतरवण्यामध्ये अमेरिकेच्या नासाला यश मिळालंय.

"सगळ्यांत चांगली बातमी म्हणजे हे यान अगदी व्यवस्थित आहे," या मोहिमेचे डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर मॅट वॉलेस यांनी सांगितलं.

या रोव्हरच्या 'टचडाऊन' म्हणजे मंगळावर उतरण्याची खात्री झाल्यानंतर कॅलिफोर्नियामधल्या नासाच्या मिशन कंट्रोल रूममध्ये जल्लोष झाला.

सहा चाकं असणारा हा रोव्हर आता पुढची दोन वर्षं मंगळावरचे दगड आणि पृष्ठभाग खणत इथे पूर्वी कधी जीवसृष्टी होती का, याचा शोध घेईल.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

ज्या जागी हे येझरो (Jezero) विवर आहे तिथे अब्जावधी वर्षांपूर्वी एक तलाव होता असा अंदाज आहे. आणि जिथे पाणी असतं, तिथे जीवसृष्टी असण्याचीही शक्यता असते.

मंगळावर उतरल्यानंतर - लँडिंगनंतरही पर्सव्हिअरन्स सुरक्षित असल्याचा सिग्नल नासाच्या कंट्रोल रूमला मिळालेला आहे. यापूर्वी अशा क्षणांनंतर एकमेकांना मिठ्या मारत, हाय-फाय देत जल्लोष केला जाई. पण कोरोना व्हायरसमुळे पाळण्यात येणाऱ्या सावधगिरीमुळे यावेळी कंट्रोल रूममधल्या इंजिनिर्यसमध्ये पारदर्शक स्क्रीन्स लावण्यात आले होते. परिणामी त्यांना 'फीस्ट - बम्प' वर समाधान मानावं लागलं.

या पर्सव्हिअरन्स यानाकडून पहिले दोन फोटो आल्यावरही या कंट्रोल रूममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. कमी रेझोल्यूशनच्या कॅमेऱ्यांनी हे फोटो काढण्यात आलेले आहेत. या कॅमेऱ्यांची लेन्स कव्हर अजून काढण्यात आलेली नाहीत आणि त्यांच्यावर लँड होताना धूळ बसलेली आहे. पण तरीही या फोटोंमध्ये रोव्हरच्या पुढे आणि पाठी असणारा सपाट पृष्ठभाग दिसतोय.

Perseverance

फोटो स्रोत, NASA/JPL-Caltech

फोटो कॅप्शन, One tonne of high technology: Seven instruments, multiple cameras, microphones and a big drill

नासाची ही मोहीम हाताळणाऱ्या टीमचे प्रमुख अॅलन चेन यांनी सांगितलं, "हा रोव्हर चांगल्या सपाट जागी उतरलाय. ही गाडी फक्त 1.2 अंशांनी झुकलेली आहे. आता हा रोव्हर चांगल्या ठिकाणी आहे आणि सुरक्षित आहे...आणि हे साध्य करणाऱ्या माझ्या टीमचा मला अतिशय अभिमान आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

बाहेरच्या साईट्सवरील मजुकरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

नासाचे कार्यकारी अॅडमिनिस्ट्रेटर स्टीव्ह जर्कझीक यांनी म्हटलंय, "याचं श्रेय या टीमला आहे. या अमेझिंग टीमने मंगळावर हा रोव्हर लँड करण्याच्या मार्गातल्या सगळया अडचणी आणि कठीण परिस्थितीवर मात केली. शिवाय कोव्हिडमुळे निर्माण झालेली आव्हानंही होतीच.

मंगळ मोहीम राबवणाऱ्या नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीचे संचालक माईक वॉटकिन्स म्हणाले, "या मिशनचे पहिले काही दिवस खास असतील कारण आपण पृथ्वी ग्रहाचा एक प्रतिनिधी मंगळ ग्रहावर अशा जागी उतरवलाय जिथे यापूर्वी कोणीही गेलेलं नाही."

मंगळावर यान वा रोव्हर उतरवणं सोप नाही. नासाने यापूर्वी हे केलं असल्याने त्यांच्याकडे यासाठीचा अनुभव असला तरी यासाठी किती काळजी घेण्यात आली हे पर्सव्हिअरन्स टीमने सांगितलंय.

नासाने मंगळावर उतरवलेला एक टन वजनाचा हा दुसरा रोव्हर आहे.

2012मध्ये क्युरिऑसिटी (Curiosity) नावाचा रोव्हर एका वेगळ्या विवरात उतरवण्यात आला होता. या लँडिगसाठी वापरण्यात आलेली रॉकेट क्रेडलची पद्धत पर्सव्हिअरन्ससाठीही वापरण्यात आली.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

बाहेरच्या साईट्सवरील मजुकरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

पुढच्या काही दिवसांमध्ये आता कंट्रोलर्स या पर्सव्हिअरन्सवरील कोणतीही यंत्रणा लँडिंग दरम्यान बिघडली नसल्याची खात्री करतील.

या पर्सव्हिअरन्सच्या शिडावर (Mast) मुख्य कॅमेरा आहे. हे शीडही उंचावण्यात येईल. या रोव्हरला मंगळावर उतरण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरण्यात आलं त्या ऐवजी आता या रोबोला या परिसरामध्ये ड्राईव्ह करण्यासाठी सूचना देणारं सॉफ्टवेअर या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करण्यात येईल.

यासगळ्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या काही दिवसात पर्सव्हिअरन्स भरपूर फोटो काढेल. आजूबाजूची पृष्ठरचना नेमकी कशी आहे याचा अंदाज इंजिनियर्सना या फोटोंवरून घेता येईल.

या पर्सव्हिअरन्समध्ये एक मिनी - हेलिकॉप्टर आहे. दुसऱ्या ग्रहावर उड्डाण करणारं हे पहिलं हेलिकॉप्टर असेल. हे हेलिकॉप्टर उडवून पाहण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यानंतरच हा रोबो त्याच्या मुख्य कामाला लागेल. उपग्रहांनी शोधलेल्या विविध डेल्टांचा (Delta) हा रोबो अभ्यास करेल.

डेल्टा म्हणजे नदीच्या मुखाशी असणारा नदीच्या गाळापासून तयार झालेला त्रिभुज प्रदेश. या येझरो विवराच्या त्रिभुज प्रदेशामध्ये कदाचित इथे अब्जावधी वर्षांपूर्वी असणाऱ्या जीवांचे अवशेष असण्याची संशोधकांना आशा आहे.

पर्सव्हिअरन्स या त्रिभुज प्रदेशातले नमुने गोळा करेल आणि मग नंतर विवराच्या कडेपाशी झाली. इथे कार्बोनेट खडक असल्याचं उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीत समजलंय. पृथ्वीवरच्या अशा खडकांमध्ये अनेकदा जीवसृष्टीचे अंश अडकलेले मिळाले आहेत.

येझरो विवर (Jezero Crater) इतकं वैशिष्ट्यपूर्ण का?

येझरो हे बोस्निया - हर्जेगोविनामधल्या शहराचं नाव आहे. स्लाविक भाषेमध्ये या येझरो शब्दाचा अर्थ होतो - तलाव. 45 किलोमीटर व्यासाच्या या विवराला हे नाव देण्यात आलंय.

पर्सव्हिअरन्स यानाने पाठवलेला मंगळावरच्या येझरो विवराचा दुसरा फोटो

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, पर्सव्हिअरन्स यानाने पाठवलेला मंगळावरच्या येझरो विवराचा दुसरा फोटो

या येझरो विवरामध्ये विविध प्रकारचे दगड आहेत. इथे पूर्वी कधीतरी जीव होते याचे संकेत देऊ शकणारे चिकणमातीचे आणि कार्बोनेट खडकही यात आहेत.

एकेकाळच्या या तलावाच्या काठाशी 'बाथटब रिंग' पाशी असणाऱ्या अंशांमध्ये पर्सव्हिअरन्सला पृथ्वीवर आढणारे स्ट्रोमॅटोलाईट्स (Stromatolites) मिळण्याचा अंदाज आहे.

पर्सव्हिअरन्सने गोळा केलेले सगळ्यांत विशिष्ट दगड हे लहान ट्यूब्समध्ये घालून मंगळाच्या पृष्ठभागावरच ठेवण्यात येतील. या दशकाच्या अखेरपर्यंत या ट्यूब्सपृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने मिळून एक अब्जावधी डॉलर्सची योजना आखली आहे. यामध्ये आणखी एक रोव्हर, मार्स रॉकेट आणि एका मोठ्या उपग्रहाच्या मदतीने या येझरो विवरात गोळा करून ठेवण्यात आलेल्या गोष्टी पृथ्वीर आणल्या जातील.

पर्सव्हिअरन्सला जर जीवसृष्टीचं अस्तित्त्वं खुणावणारे काही अंश मिळाले तर मग याचा पुढे सखोल अभ्यास केला जाईल.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)