नासा आता मंगळावर पाठवणार 1.8 किलोचं हेलिकॉप्टर

नासाचं हेलिकॉप्टर

फोटो स्रोत, NASA / JPL

मार्च 2020मध्ये अमेरिकेची अंतराळ संस्था नासा मंगळावर हेलिकॉप्टर पाठवण्याची तयारी करत आहे.

हेलिकॉप्टरचा आकार सॉफ्टबॉलइतका मर्यादित ठेवण्यासाठी डिझाईन टीमनं चार वर्षांहून अधिक काळ त्यावर काम केलं आहे. या हेलिकॉप्टरचं वजन 1.8 किलो आहे.

मंगळावरच्या वातावरणात उड्डाण भरण्यासाठी हे हेलिकॉप्टर डिझाईन करण्यात आलं आहे. मंगळावर पृथ्वीपेक्षा 100 पट कमी गुरुत्वाकर्षण आहे.

नासानं या हेलिकॉप्टरचं वर्णन वाऱ्यापेक्षा अधिक जड एअरक्राफ्ट असं केलं आहे. कारण त्यांचे इतर काही वाहन त्याहून कमी वजनाचे असतात, जसं की हॉट एअर बलून्स आणि ब्लिंप्स.

1980च्या दशकात सोव्हियत शास्त्रज्ञांनी शुक्रच्या वातावरणात दोन फुगे सोडले होते. पण एखाद्या वाहनाने दुसऱ्या ग्रहावरून आजवर उडाण घेतलेलं नाही.

या हेलिकॉप्टरची दोन पाती प्रति मिनिट 3000 वेळा फिरतील. पृथ्वीवरच्या एखाद्या सामान्य हेलिकॉप्टरपेक्षा हा वेग 10 पटीनं अधिक आहे.

"दुसऱ्या एखाद्या ग्रहावर हेलिकॉप्टर उडवण्याची कल्पना खूपच रोमांचकारी आहे," असं मत नासाचे प्रशासक जिम ब्रेंडेस्टीन यांनी व्यक्त केलं आहे.

"मंगळावरील हेलिकॉप्टर आपल्या भविष्यातील विज्ञान, शोध आणि अन्वेषण मोहिमांसाठी आश्वासक ठरणार आहे," ब्रेंडेस्टीन यांनी पुढे सांगितलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

या छोट्याशा एअरक्राफ्टला ड्रोन न म्हणता हेलिकॉप्टरच म्हटलं जात आहे आणि यात पायलट असणार नाही. ते पृथ्वीपासून जवळजवळ 5.5 कोटी किलोमीटर अंतरावर उडणार आहे, रिमोट कंट्रोल सिग्नल पाठवण्यासाठी हे अंतर खूपच जास्त असेल.

"पृथ्वी या हेलिकॉप्टरपासून अनेक प्रकाश मिनिटं दूर असेल त्यामुळ वास्तविकपणे या मोहीमेला दूरवरून हाताळण्याचा कोणताही मार्ग नाही. या मोहिमेतील हेलिकॉप्टर स्वत:हून उडेल," नासाच्या जेट प्रोपल्सन लॅबोरटरीच्या (JPL) प्रोजेक्ट मॅनेजर मीमी आँग यांनी सांगितलं.

कोणत्याही वातावरणात हेलिकॉप्टरनं तग धरावा म्हणून JPL टीमनं या छोट्याशा हेलिकॉप्टरला शक्य तितकं मजबूत बनवलं आहे.

"पृथ्वीवर उडणाऱ्या हेलिकॉप्टरची उंची सुमारे 40, 000 फूट आहे. जेव्हा आमचं हेलिकॉप्टर मंगळाच्या पृष्ठभागावर असेल तेव्हा ते पृथ्वीच्या जवळपास एक लाख फूट उंचीवर असेल," आँग सांगतात.

याच कारणामुळे मार्स हेलिकॉप्टर मोहिमेला नासा एक हाय रिस्क मोहीम म्हणून पाहत आहे.

"या प्रकल्पात यश मिळालं नाही तर त्यानं मार्स 2020 मोहीम प्रभावित होणार नाही. पण हा प्रकल्प यशस्वी झाल्यास या हेलिकॉप्टरला कमी उंचीवरून मंगळाच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करणं खऱ्या अर्थानं सोपं होईल. तसंच जमिनीवरच्या प्रवासानं जिथे पोहोचता येणार नाही, तिथेही प्रवेश करता येईल," असं नासाच्या पत्रकात म्हटलं आहे.

सध्या मंगळावरच्या वाहनांच्या चाकांना यंत्रं लावण्यात आलेली आहेत, ज्यामुळे ते मार्गातील अडथळ्यांवर मात करू शकतात. तसंच त्यांना मंगळावरच्या पृष्ठभागावरील मोकळ्या जागेवर उतरवण्यात येतं.

असंच एक स्पिरीट रोव्हर नावाचं वाहन बंद पडल्यामुळे 2009 मध्ये मातीत अडकलं होतं.

हा हेलिकॉप्टर आपल्या मार्स 2020 रोव्हर या सहकाऱ्यासह 2020 जुलैमध्ये लाँच करण्यात येणार आहे, आणि ते 2021च्या फेब्रुवारी महिन्यात ते दोघंही या लाल ग्रहावर पोहोचतील.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : मंगळाचं रहस्य उलगडेल हे पृथ्वीवरचं सर्वात तरुण बेट

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)