'अंतराळातच आहे मानवाचं भविष्य' असं का वाटतं एलन मस्क यांना?

फोटो स्रोत, SPACEX
ज्या ठिकाणावरून चंद्रावर पहिल्या अंतराळवीरानं उड्डान केलं त्याच ठिकाणावरून फॉल्कन हेवी या रॉकेटनं उड्डान केलं. अमेरिकेच्या फ्लोरिडातल्या केनेडी स्पेस सेंटरमधून फॉल्कन हेवी हे रॉकेट मंगळवारी अंतराळात पाठवण्यात आलं.
हे रॉकेट एलन मस्क यांच्या 'स्पेस एक्स' या खाजगी कंपनीचं आहे.
मानवाचं अस्तित्व फक्त पृथ्वीवर न ठेवता त्यापुढे जाऊन इतर ग्रहांवर कसं पोहोचवता येईल यासाठी एलन मस्क यांनी 'स्पेस एक्स' या कंपनीची स्थापना केली आहे.
फॉल्कन हेवी या रॉकेटमध्ये एलन मस्क यांची टेस्ला कार ठेवण्यात आली आहे. अंतराळामध्ये जाणारी ही पहिली कार आहे. चंद्रावर मानवाला पाठवल्यानंतर पहिल्यांदाच सगळ्या जगाचं याकडे लक्ष लागलं आहे.
केनेडी स्पेस सेंटरमधल्या LC-39A प्लॅटफॉर्मवरून याआधीच्या अपोलो मिशनला सुरुवात झाली होती. त्या ठिकाणाहून या मिशनला सुद्धा सुरुवात झाली आहे.
फॉल्कन हेवी हे आतापर्यंतचं सगळ्यात जड रॉकेट आहे. येत्या काळात मंगळ ग्रहावर पोहचण्यासाठी एलन मस्क यांना फॉल्कनचा वापर करायचा आहे.

फोटो स्रोत, SPACEX
70 मीटर लांबीचं फॉल्कन हेवी रॉकेट 11 किमी प्रतिसेकंद वेगानं उड्डान करतं. अंतराळात 64 टन स्थापित करण्याची त्याची क्षमता आहे. हे अंदाजे मुंबईच्या 5 डबल डेकर बस एवढं आहे.
सध्याच्या इतर रॉकेटच्या तुलनेत फॉल्कन हेवी रॉकेटमध्ये दुप्पटीनं भार उचलण्याची क्षमता आहे.
टेस्ला स्पोर्ट कार
स्पेस एक्सचे सिईओ एलन मस्क यांच्या मते या रॉकेटचं पहीलं उड्डाण यशस्वी होण्याची शक्यता केवळ 50 टक्के होती. पण मोहीम यशस्वीरित्या पार पडली.
अंतराळ प्रवासातले धोके लक्षात घेऊन एलन यांनी त्यांची जुनी लाल रंगाची टेस्ला ही स्पोर्ट्स कार यासाठी वापरली. कारच्या ड्राइव्हिंग सीटवर स्पेस सूटची व्यवस्था केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ही मोहीम यशस्वी झाली तर टेस्ला कार आणि त्यामधला अंतराळवीर सूर्याजवळच्या अंडाकार कक्षात पोहचू शकणार आहेत. ती जागा मंगळाच्या अगदी जवळ असेल.
पण ही मोहीम यशस्वी झाल्याची सूचना शेवटच्या साडेसहा तासांत समजू शकणार आहे.
याबाबत एलन मस्क सांगतात, "ही कार पृथ्वीपासून 400 दशलक्ष किलोमीटर एवढा दूरचा प्रवास करणार आहे. आणि तिचा वेग 11 किमी प्रतिसेकंद असणार आहे."
कोण आहे एलन मस्क?
- 1971 साली दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांचा जन्म झाला.
- एलन मस्क यांनी वयाच्या 12व्या वर्षी पहिला व्हीडिओ गेम तयार केला. तो त्यांनी 500 डॉलरला विकला. ब्लास्ट स्टार असं त्या गेमचं नाव होतं.
- क्विन्स युनिव्हर्सिटी आणि पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्स आणि इकॉनॉमिक्सचं शिक्षण त्यांनी घेतलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
'भविष्य अंतराळात असणार'
बीबीसीच्या न्यूज नाईट या कार्यक्रमात बोलताना एलन यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले होते.
वेगवेगळ्या संशोधनाचा हवाला देत मानव हा कदाचित बहूग्रहीय प्राणी असू शकतो असं त्यांना वाटतं.
"मंगळावर आपलं एक घर असावं यापेक्षा अफलातून काय असू शकतं" असं मत सुद्धा त्यानी व्यक्त केलं होतं.
हे वाचलं का?
हे पाहिलं आहे का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









