You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'ट्रंप यांचा जॉर्जिया निवडणुकीचा दावा साफ चुकीचा'
जॉर्जियामध्ये निवडणूक जिंकल्याचा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा दावा साफ चुकीचा आहे असं जॉर्जियाचे मुख्य निवडणूक अधिकारी ब्रॅड राफेनस्पर्जर यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे एक फोन रेकॉर्डिंग समोर आलं होतं. या रेकॉर्डिंगमध्ये ते जॉर्जिया प्रांताच्या वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याला म्हणजेच ब्रॅड यांना विजयासाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव करण्यास सांगत आहेत.
या कॉलसाठी ट्रंप यांच्यावर जोरदार टीका होते आहे. बेकायदेशीर पद्धतीने मतं बळकावण्याचा हा प्रकार असल्याचं अनेकजण म्हणत आहेत.
रिपब्लिकने पक्षाने जॉर्जियातील दोन जागांवर विजय मिळवला तर त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात नियंत्रण राखता येईल. त्यांच्या उमेदवार हरला तर डेमोक्रॅट्स, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, व्हाईट हाऊसवर सिनेटवर वर्चस्व असेल.
तेच प्रामुख्याने बोलत होतो, आम्ही ऐकण्याचं काम केलं. मात्र मला हेच सांगायचं आहे की त्यांचा दावा साफ चुकीचा आहे असं ब्रॅड यांनी स्पष्ट केलं. ट्रंप यांनी सुमारे तासभर संवाद साधला होता.
कॉल रेकॉर्ड होत आहे हे मला माहिती नव्हतं आणि घरून ट्रंप यांच्याशी संवाद साधला असं ब्रॅड यांनी सांगितलं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे एक फोन रेकॉर्डिंग समोर आले आहे. या रेकॉर्डिंगमध्ये ते जॉर्जिया प्रांताच्या वरिष्ठ निवडणूक अधिका-याला विजयासाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव करण्यास सांगत आहेत.
'वॉशिंग्टन पोस्ट'ने हे रेकॉर्डिंग प्रसिद्ध केले आहे. यात राष्ट्राध्यक्ष ट्रंप रिपब्लिकन स्टेट सचिव ब्रेड रेफेनस्पर्जर यांना सांगत आहेत, "मला फक्त 11,780 मतं मिळवायची आहेत." रेफेनस्पर्जर ट्रंप यांना सांगत आहेत की जॉर्जियाचा निकाल योग्य आहे.
डेमोक्रॅटचे उमेदवार जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जॉर्जिया प्रांतात विजय मिळवला. त्यांना एकूण 306 मतं मिळाली, तर ट्रम्प यांना 232 मतं मिळाली.
मतदानानंतर डोनाल्ड ट्रंप निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप करत आहेत. पण अद्याप त्यांनी एकही पुरावा सादर केलेला नाही.
अमेरिकेतील सर्व 50 प्रांतांनी आता निवडणुकीचे निकाल प्रमाणित केले आहेत. काही ठिकाणी पुनर्मोजणी आणि आवाहन केल्यानंतर निकाल निश्चित करण्यात आले.
अमेरिकेतील न्यायालयांनी आतापर्यंत जो बायडन यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या 60 याचिका रद्द केल्या आहेत.
अमेरिकेतील काँग्रेस 6 जानेवारीला निवडणुकीचे निकाल स्वीकारेल. जो बायडन 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील.
जॉर्जियामध्ये सिनेटच्या दोन जागांसाठी 5 जानेवारीला मतदान होणार आहे. या जागेच्या निकालाचा राज्यातील सत्तेच्या समीकरणांवर प्रभाव पडू शकतो.
या दोन जागांवर डेमोक्रॅट पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयी झाले तर सिनेटमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट पक्षाचे संख्याबळ समान असेल. अशावेळी निर्णायक मत उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याकडे असेल.
काँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे.
कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमके काय आहे?
वॉशिंग्टन पोस्टने कॉल रेकॉर्डिंग्ज प्रसिद्ध केले असून यात राष्ट्राध्यक्ष ट्रंप जॉर्जियाच्या सचिवांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.
जॉर्जियाचा निकाल मी जिंकलो असून पुन्हा एकदा मतमोजणी केली आहे असे सांगणे गैर ठरणार नाही असे भाष्य ते जोर देऊन करत आहेत.
रेफेनस्पर्जर उत्तर देताना सांगतात, 'राष्ट्राध्यक्ष महोदय तुमच्यासमोर आव्हान हे आहे की जो डाटा तुम्ही दाखवत आहात तो चुकीचा आहे.'
ट्रम्प यांनी संबंधित अधिकाऱ्याला संभाव्य कायदेशीर परिणामांची धमकीही देतात.
ते सांगतात, 'तुम्हाला कल्पना आहे की त्यांनी काय केले आहे आणि यासंदर्भातील माहिती लपवणे गुन्हा आहे. तू असे होऊ देऊ शकत नाही. हे तुझ्यासाठी आणि तुझे वकील रियानसाठी धोकादायक ठरू शकते.'
राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी रेफेनस्पर्जर यांना सांगितले की, त्यांनी तिन्ही राज्यांच्या निकालाचा पुन्हा एकदा आढावा घ्यावा.
कॉल रेकॉर्डिंग समोर आणल्यानंतर व्हाईट हाऊसने अद्याप यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
माजी संरक्षण मंत्र्यांचे ट्रंप यांना आवाहन
अमेरिकेच्या दहा माजी संरक्षणमंत्र्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना निवडणूक निकालावर शंक न घेण्याचे आणि या वादात लष्कराला सहभागी न करण्याचे आवाहन केले आहे.
वॉशिंग्टन पोस्टसाठी लिहिलेल्या एका लेखात माजी मंत्र्यांनी म्हटले की, निवडणुकीच्या निकालांचा वाद सोडवण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराला त्यात ओढण्याचा प्रयत्न देशासाठी धोकादायक, बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरेल.
संरक्षण विभागात सत्तांतर पारदर्शी पद्धतीने होणं अत्यंत गरजेचे आहे असंही त्यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.
ही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)