सेक्स करण्याची आवड जगभरात कमी का होत आहे?

सेक्सच्या बाबतीत सध्याचा काळ मानवी समाजाच्या इतिहासातील सर्वाधिक उन्मुक्त काळ म्हणून संबोधला जाऊ शकतो.

गेल्या चार दशकांमध्ये सुलभ सुविधांमुळे लैंगिक संबंधांना उन्मुक्त बनवलं आहे. मग त्या गर्भनिरोधक गोळ्या असतील किंवा डेटिंग अॅप्स. या सगळ्या बाबींनी लैंगिक संबंधांना एक नवीन आयाम दिलं आहे.

दुसरीकडे लग्नाआधी सेक्स करणं, समलैंगिकता, घटस्फोट आणि एकाच वेळी अनेकांशी लैंगिक संबंध ठेवणं, या सगळ्या प्रक्रियांविषयी लोकांच्या दृष्टिकोनात आता पूर्वीपेक्षा अधिक मोकळेपणा जाणवत आहे.

असं असलं तरी शास्त्रज्ञांच्या मते, गेल्या दशकाशी तुलना केल्यास अमेरिका-ब्रिटन आणि इतर काही देशांतले लोक पहिल्यापेक्षा कमी सेक्स करत आहेत. त्यामुळे जगातल्या एका मोठ्या भागात सेक्सविषयीची आवड कमी का होत आहे, असं निरीक्षण बीबीसी हिंदीने 'दुनिया जहान' या पॉडकास्टमध्ये मांडलं आहे.

त्याविषयी आता आपण माहिती जाणून घेणार आहोत.

1. पॉर्नोग्राफी

"माझा संबंध एका अशा कुटुंबाशी येतो जे अत्यंत धार्मिक आहे. पदवीचं शिक्षण घेताना माझ्या लक्षात काही आकडे आले. ज्यानुसार, 50 टक्के ख्रिश्चन पुरुषांना पॉर्न बघण्याची सवय लागली आहे. पण, मला या आकड्यांवर काहीच विश्वास बसला नाही," असं जोशुआ ग्रूब्स सांगतात. ते अमेरिकेच्या बॉईलिंग ग्रीन स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये क्लिनिकल सायकोलॉजीचे प्राध्यापक आहेत.

पोर्नोग्राफीच्या आकड्यांतील तथ्य जाणून घेण्यासाठी ग्रूब्स यांनी अमेरिकेला केंद्रस्थानी ठेवून एक अभ्यास केला. ज्यांचा निष्कर्ष आश्चर्यकारक होता.

ते सांगतात, "45 ते 50 टक्के पुरुष आणि 15 ते 20 टक्के महिलांनी हे मान्य केलं की, त्यांनी गेल्या 7 दिवसांत पॉर्न पाहिलं आहे. पण ही सवय फक्त अमेरिकापुरती मर्यादित नाहीये. जिथं इंटरनेट आहे तिथं पॉर्न आहे. पॉर्नोग्राफीमुळे जगभरात सेक्शुअल बिहेविअर (लैंगिक वर्तन) बदलत आहे. पॉर्न बघणं सेक्स करण्यापेक्षा अधिक सोपं आहे."

त्यामुळे यात तुमची पसंत कशी अशाला, पॉर्न बघणं की सेक्स करणं?

ग्रूब्स यांच्या मते, "असे खूप कमी शोध झाले आहेत ज्यात हा प्रश्न विचारला गेला आहे. पण, academic literature हेच सांगतं की, कमी सेक्स करण्याचं कारण पॉर्न अजिबातच नाहीये. गेल्या काही वर्षांमधील आकड्यांचा तुम्ही अभ्यास केला तर लक्षात येईल की, जे लोक जास्त पॉर्न पाहतात, लैंगिक वर्तनाच्या प्रक्रियेत ते जास्त सक्रिय असतात. हे तर स्पष्ट आहे की, सेक्सच्या बाबतीत जे लोक जास्त सक्रिय असतात, ते लोक जास्त पॉर्न पाहतात. पॉर्नोग्राफीचा अर्थच जास्त सेक्स असा होतो."

पॉर्नोग्राफीचा आपल्या सेक्स लाईफवर काय परिणाम होत आहे, या प्रश्नावर चर्चा करणं गरजेचं आहे.

ग्रूब्स सांगतात, "पॉर्नोग्राफीमुळे कॅज्युअल सेक्समधील इंटरेस्ट वाढतो. यामुळे तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा सेक्शुअल प्लेझरही वाढतो, असे काही पुरावे आहेत. पण, काही पुरावे असंही सांगतात की, सेक्समध्ये समाधान न मिळाल्यास काही जण आपलं नैराश्य पॉर्न बघून काढतात."

ऑनलाईन पॉर्नचं रुपांतर आता इंटरनेटवरील सेक्सच्या व्यसनात होत आहे. काही सर्वेक्षण असंही सांगतात की, "पॉर्न बघणारी माणसं बेडरुमध्ये प्रत्यक्षरीत्या सेक्स करण्यासाठी शारिरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार नसतात." असं असलं तरी या ठाम निष्कर्षावर पोहोचण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे. कमी सेक्स करणं किंवा सेक्सची आवड नसल्यामागे पॉर्न जबाबदार नसल्याचं शास्त्रज्ञ सांगतात.

मग कमी सेक्सच्या मागचं कारण नेमकं काय असू शकतं?

2. तंत्रज्ञान

थोडं इतिहासात डोकावून पाहूया. 1980च्या दशकात. दोघं एकमेकांच्या शेजारी बसलेत. टीव्हीवरील चॅनेलही कमी आहेत आणि त्यावर काही खास कार्यक्रमही नाहीये. ते एकमेकांकडे बघतात आणि त्यांच्या शरीरात वेगळीच उर्जा निर्माण होते. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालतात आणि मग त्यांना एकमेकांविषयी आवड निर्माण होते. पुढच्या काही क्षणात त्या दोघांचे ओठ एकमेंकांच्या ओठांमध्ये गुंततात आणि मग ते परमोच्च आनंदाच्या ध्येयाकडे वाटचाल करतात.

डॉ. नन वाईज या प्रसिद्ध सेक्स न्यूरोसायन्टिस्ट आणि सेक्स थेरपिस्ट आहेत. त्यांनी Why could sex matters? नावाचं पुस्तकंही लिहिलं आहे.

त्या सांगतात, "दोघं एकमेकांजवळ बसेल तर आहेत पण नेटफ्लिक्स सुरू आहे. दोघांचंही लक्ष आपापल्या फोनमध्ये आहे. सोशल मीडियावरील नोटिफिकेशनचा आवाज येत आहे, गुगलवर सर्चसुद्धा सुरू आहे. जवळ असूनही ते जवळ नाहीयेत, इतकंच काय बेडवर असतानाही त्यांच्या हातातला मोबाईल काही सुटत नाहीये. असं वाटतंय की ते स्मार्टफोनसोबतच डेटिंग करत आहेत."

त्या पुढे सांगतात, "सेक्सच्या विषयात स्मार्टफोन 'पॅशन किलर'चं काम करतो. याचा परिणाम सरळसरळ आपल्या डोपामाईन सिस्टिमवर होतो. डोपामाईन एखाद्या ट्रान्समिटर प्रमाणे मेसेज पाठवायचं काम करतो. आपल्याला जिथं जिथं मजा येते, त्या त्या प्रत्येक ठिकाणी तो असतो. मग ते अन्न असो की सेक्स. पण, जर तुमचं सगळं ध्यान स्मार्ट फोन, नोटिफिकेशन आणि ई-मेल्सवर असेल तर सेक्ससाठी आवश्यक असलेला डोपामाईनचा मेसेज तुमच्या मेंदूपासून शरिरापर्यंत पोहोचणारच नाही."

पण, या समस्येवर सोपा उपाय आहे. यासाठी तुम्हाला तुमचा स्मार्टफोन काही वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. समाधानकारक सेक्ससाठी ही एक चांगली सुरुवात असू शकते.

तंत्रज्ञानाचा सेक्स लाईफवर परिणाम नक्की होतो पण यामुळेच सेक्स लाईफ बिघडते, असा दावा करता येत नाही. त्यामुळे सेक्सच्या इच्छेवर परिणाम करणाऱ्या काही इतरही गोष्टी आहेत, असा काही संशोधकांचा दावा आहे.

3. लाईफस्टाईल

आम्हाला असं लक्षात आलं आहे की, जे लोक चांगलं कमावत आहेत, ज्यांना चागला पगार आहे, ज्यांना आयुष्यात काही कमतरता नाहीये, त्यांची सेक्समधील आवड कमी होत आहे. इतकंच नाही तर कमी पगार असलेले लोकही कमी सेक्स करत आहेत. तसंच मध्यम स्वरुपात कमावणाऱ्या माणसांमध्येही सेक्सविषयी खूप जास्त अशी उत्सुकता नाहीये, असं लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनमध्ये सेक्सुअल आणि रिप्रोडक्टिव हेल्थच्या प्राध्यापक के विलिंग्स सांगतात.

त्या सांगतात, "सध्या मला सगळ्याच देशांत नोकरीच्या सुरक्षिततेविषयीची चिंता दिसून येते. याचा प्रत्यक्ष परिणाम विशेष करून पुरुषांवर झाला आहे. असे अनेक पुरावे आहेत, जे सांगतात की बेरोजगारी आणि सेक्समध्ये कमी आवड असण्याचा प्रत्यक्ष संबंध आहे. दुसरी गोष्ट अशी की, तुमच्याकडे रोजगार असेल आणि तुम्हाला शिफ्टमध्ये काम करावं लागत असेल आणि दुसरीकडे नोकरीची शक्यता दिसत नसेल, तर पार्टनरसोबत सेक्स करणं ही तुमची पहिली प्राथमिकता नसू शकते."

त्या पुढे सांगतात, "सेक्स करण्यासाठी एकतर त्यांच्याकडे वेळ नाही आणि तितकी क्षमताही नाही की ते सेक्सचा आनंद घेऊ शकतील. पण यामागे अनेक कारणं आहेत. जपानचं उदाहरण पाहूया. 1990च्या दशकात जपानमध्ये खूप जास्त डिप्रेशन होतं. त्याकाळात जपानमध्ये सेक्सचं प्रमाण कमी नव्हतं. उलट त्याच काळात लोकांनी मोठ्या प्रमाणावर सेक्स केला. पण, 2002-2003 नंतर सेक्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर खालावलं. आधुनिक समाजात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे लोकांच्या सेक्स लाईफवर परिणाम पडला आहे.

4. सामाजिक बदल

महिलांच्या नोकरी करण्यामुळे एका संपूर्ण साखळीवर बदल झाला आहे. यात सेक्सचाही समावेश आहे. नोकरीसाठी अधिक अभ्यासाची गरज आहे आणि संघर्षही खूप आहे. यामुळे लग्नही उशिरा होतं. शिक्षित महिला सेक्सच्या बाबतीत आपल्या पार्टनरला कंट्रोल करतात, असं बायोलॉजिकल अँथ्रपॉलॉजिस्ट डॉ. हेलन फिशर यांचं मत आहे.

"मी याला 'स्लो लव्ह' असं म्हणते. आज जगभरातील तरूण काळजी घेताना दिसून येत आहेत. योग्य जोडीदार निवडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे लग्न उशिरा होत आहे. पुरुष आणि महिला दोघांनाही ही बाब लागू होते. शंभर वर्षांपूर्वी मुलीचं काही करिअर नसायचं. त्यांच्या समोर फक्त लग्न एवढंच उद्दिष्ट असायचं."

पूर्वी कमी वयात लग्न होत असे. आता लग्नाचं वय वाढत चाललं आहे. सध्या अनक वर्ष सिंगल राहिल्यानंतर अनेक लोक लग्न करण्याचं पसंत करत आहेत.

लग्न उशिरा झाल्यामुळे सेक्समधील आवड कमी होत की त्यामुळे सेक्सचं प्रमाण वाढलं पाहिजे?

फिशर यांच्या मते, "Academic literature मध्ये ही बाब स्पष्ट आहे की, तुम्ही सिंगल असाल तर कमी सेक्स करता. लग्न झालेली माणसं जास्त सेक्स करतात. पण, इथं प्रश्न हा आहे की, लग्नानंतरही लोक कमी सेक्स का करत आहेत? कदाचित त्यांना मूल जन्माला घालायची घाई नाही, असंही यामागचं एक कारण असू शकतं."

दुसरीकडे असे अनेक शोध आहेत जे सांगतात की "वाढत्या वयानुसार सेक्स करण्याची इच्छा कमी होत जाते. मुलं मोठी व्हायला लागली की महिलांची सेक्समधील आवड कमी व्हायला लागते. मुलं शाळेत जायला लागली की महिलांचं प्राधान्य बदलतं."

फिशर सांगतात, "मला ही बाब आश्चर्यकारक वाटते की, लोक कमी सेक्स करत आहेत आणि त्याबाबत चिंताही व्यक्त करत आहेत. योग्य वेळी योग्य पार्टनरसोबत सेक्स करणं चांगलं असतं. यामुळे ऑक्सिटोसिन हार्मोन रिलिज होतात, यामुळे तुम्हाला शांतता आणि सुरक्षिततेची जाणीव होते. तसंच रोगप्रतिकार शक्तीही वाढते. इतकंच नाही तर चांगला सेक्स करणारे दीर्घ आयुष्य जगतात."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता..)