You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबान्यांना ठार करून 16 वर्षाच्या मुलीने घेतला आई-वडिलांच्या मृत्यूचा बदला
अफगाणिस्तानमधील एका तरुणीच्या आई-वडिलांचा तालिबानी कट्टरवाद्यांनी गेल्या आठवड्यात खून केला होता.
सदर तरुणीने एका आठवड्यानंतर या खूनाचा बदला घेत आपल्या आई-वडिलांना मारणाऱ्या दोन कट्टरवाद्यांना ठार केल्याची घटना समोर आली आहे.
आपल्या आई-वडिलांच्या खूनाचा बदला घेणाऱ्या या तरुणीच्या धाडसाचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होताना दिसत आहे.
अफगाणिस्तानमधील घोर प्रांतच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरूणीने आपल्या घरातील एके-47 बंदुकीचा यावेळी वापर केला. त्याच्या मदतीने तिने दोन कट्टरवाद्यांना संपवलं. तसेच तरुणीच्या गोळीबारात इतर काही कट्टरवादी जखमी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
मुलीचे वडील सरकारचे समर्थक असल्यामुळे हे कट्टरवादी त्यांच्या घरी आले होते. त्यानंतर हा पूर्ण घटनाक्रम घडला आहे.
सदर घटनेनंतर मुलीचा एके-47 बंदूक पकडलेला फोटोही गेल्या काही दिवसांत व्हायरल झाला होता.
यानंतर आणखी काही कट्टरवादी तिच्या घरावर हल्ला करण्यासाठी ग्रीवा गावात दाखल झाले. पण गावकरी आणि लष्कराने त्यांचा प्रतिकार करत त्यांना हुसकावून लावलं.
मुलीचं वय 14 ते 16 दरम्यान असून तिला आणि तिच्या लहान भावाला आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं प्रशासनाने कळवलं.
सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. नेटकरी या मुलीचं प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत.
"मुलीच्या धाडसाला सलाम!" अशी प्रतिक्रिया नजीबा रहमी नामक एका फेसबुक वापरकर्त्याने दिली.
'आपल्या आईवडिलांची जागा इतर कुणी घेऊ शकत नाहीत. पण तू घेतलेल्या बदल्याने तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना मनःशांती लाभेल,' असं फेसबुकवरच्याच मोहम्मद सालेह यांनी म्हटलं.
अफगाणिस्तानमध्ये घोर प्रांत हे देशाच्या पश्चिम भागात आहे.
स्थानिक माध्यमांमधील बातम्यांनुसार, "अफगाणिस्तानातील हा परिसर अविकसित आहे. इथं महिलांविरुद्धच्या हिंसाचाराचे प्रमाण खूप जास्त आहे."
तालिबानने यावर्षीच फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या लष्करासोबत शांती करार केला होता. पण तरीसुद्धा अनेक तालिबानी सदस्य अजूनही सरकारविरोधी भूमिका सातत्याने घेताना दिसतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)