You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : ऑक्सफर्डची लस रोगप्रतिकार शक्तीला कोरोनाविरोधात लढायला शिकवणार
ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना लस सुरक्षित असल्याचं आणि शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीला कोरोनाविरोधात लढायला सज्ज करत असल्याचं स्पष्ट होतं आहे.
या लशीची चाचणी 1,077 माणसांवर इंजेक्शनद्वारे घेण्यात आली. लस देण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडीज निर्माण होत असल्याचं तसंच कोरोनाविरोधात लढण्यासाठी शरीरात पांढऱ्या पेशी तयार होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
या चाचण्यांचे निष्कर्ष आश्वासक आहेत मात्र कोरोना विषाणूचं शरीरातून समूळ उच्चाटन करण्यासाठी ही लस सर्वसमावेशकदृष्ट्या परिपक्व आहे का हे आताच सांगणं कठीण आहे.
लशीची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेतल्या जात आहेत. युकेने ऑक्सफर्ड विद्यापीठाकडे लसीचे 100 दशलक्ष डोस पुरवण्याची मागणी केली आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
लस तयार व्हायला मात्र साधारण वर्षभराचा अवधी लागू शकतो असतं WHO चं म्हणणं आहे. जगातील कुठल्या लशीचं संशोधन आणि चाचणी कुठपर्यंत आली आहे हे जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा - कोरोना लसीची यशस्वी चाचणी घेतल्याचा रशियाचा दावा
लस कशी काम करेल?
ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू असलेल्या प्रयोगाला युकेच्या सरकारनेही पाठिंबा दिलाय. पण ब्रिटीश सरकारने हा प्रयोग यशस्वी होईलच याची खात्री नाही असं स्पष्ट केलंय. पण ही लस नेमकी काम कशी करते?
शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या पृष्ठभागावर असलेल्या टोकदार भागातली गुणसूत्रं काढून ती दुसऱ्या निरुपद्रवी विषाणूमध्ये सोडली आहेत. यातून ही लस तयार होतेय. ही लस शरीरात टोचली की ती पेशींमध्ये जाते. आणि मग शरीरात कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटिनची निर्मिती सुरू होते.
या प्रक्रियेत शरीरातली प्रतिकारशक्ती वाढते आणि मग रुग्णाच्या शरीरात अँडीबॉडीजची निर्मिती सुरू होते. या प्रक्रियेदरम्यान T सेलही कार्यरत होतात. थोडक्यात काय तर आपल्या शरीरातल्या पेशी कोरोना व्हायरसला ओळखतात आणि मग त्या व्हायरसचा नायनाट करतात.
लस कशी बनते?
मानवी शरीरातील पांढऱ्या पेशींचा रोग प्रतिकारकशक्तीमध्ये सहभाग असतो. शरीरात अत्यंत कमी प्रमाणात व्हायरस किंवा बॅक्टेरिया सोडण्यात येतो. शरीरातील संरक्षण यंत्रणा या व्हायरसला किंवा बॅक्टेरियाला ओळखते, तेव्हा त्याच्याशी कसं लढायचं हे शरीराला कळतं.
पुढच्या वेळी शरीरात पुन्हा अशा प्रकारचा व्हायरस आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपल्या शरीराची तयारी असते.
गेल्या अनेक दशकांपासून एखाद्या विषाणूवर तयार करण्यात आलेल्या लसीकरणात त्याच विषाणूचा वापर होत आलेला आहे.
गोवर, देवी, कावीळ अशा रोगांसाठी अशाच प्रकारच्या लसींचा वापर केला जातो. तसंच फ्लूवरच्या लसीकरणातही याचा वापर होतो.
पण कोरोना व्हायरसवर लस बनवण्यासाठी नव्या पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. याचे जेनेटीक कोड उपलब्ध असून याचं परीक्षण होणं बाकी आहे. जेनेटीक कोडचा काही भाग घेऊन लस बनवण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञ आहेत.
कोरोनावरच्या लशीची आवश्यकता का आहे?
कोरोना व्हायरसचा प्रसार सध्या जगभरात वेगाने होतोय आणि सध्या जगातली बहुतांश लोकसंख्या या व्हायरसच्या विळख्यात येण्याची भीती आहे. लशीमुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे शरीरात आलेल्या व्हायरसचा नायनाट होतो.
ज्याला लस टोचली आहे तो कधी आजारीच पडत नाही. यामुळे सध्या लशीचा शोध लागणं अत्यावश्यक आहे.
किती लोकांना कोरोनावरच्या लशीची गरज आहे?
या वर्षांतला आणि कदाचित या शतकातला हा खूप गंभीर प्रश्न आहे. सध्याची जगाची कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली अवस्था पाहता जगातल्या 60 ते 70 टक्के लोकांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लशीची गरज आहे.
जर, कोरोनावर लस उपलब्ध झाली आणि ती परिणामकारक ठरली तर जगातल्या काहीशे अब्ज लोकांना ही लस टोचावी लागेल.
प्रथम लस कोणाला टोचली जाईल?
कोरोनावर जरी लस उपलब्ध झाली तरी ती सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात उपलब्ध असेल. कारण, सध्या जगातल्या बहुतांश देशात लॉकडाऊनअसल्यामुळे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे लस शोधली गेली तरी तिची उपलब्धता कमी प्रमाणात असले.
त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यांत ही लस कोणाला टोचावी याची आखणी करावी लागेल. यात प्रथम कोव्हिड-19 रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस टोचावी लागेल. तसंच, ही लस जर सर्व वयोगटातल्या लोकांवर परिणामकारक ठरणारी असेल तर तिचा दुसऱ्या टप्प्यांत वापर वृद्ध किंवा 50 वर्षांच्यावरील लोकांवर करावा लागेल.
कारण, या वयोगटातील लोकांचं कोव्हिड-19 मुळे आजारी पडण्याचं मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण मोठं आहे. तसंच, वृद्धांची काळजी घेणाऱ्या त्यांच्या निकटवर्तियांनाही ही लस यावेळी टोचावी लागेल. त्यानंतर जसं लशीचं उत्पादन वाढेल तशी ती सगळ्यांसाठी उपलब्ध होईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)