फायटर विमान तयार करुनही कॅनडानं ते वापरलं का नाही?

फोटो स्रोत, AVRO CANADA
कॅनडाने एकेकाळी विमान निर्मिती क्षेत्रात सुपरपॉवर होण्याचं स्वप्न बघितलं होतं. पण पुढे नेमकं काय झालं?
आज भारतासह जगातले बहुतांश देश आधुनिक लढाऊ विमानं तयार करतात. मात्र दुसऱ्या महायुद्धापर्यंत अशी परिस्थिती नव्हती. अगदीच मोजक्या देशांकडे विमानं बनवण्याचं तंत्रज्ञान आणि संसाधनं होती. विमानांची निर्मिती करणारा देश विश्वासार्ह वाटणाऱ्या देशांकडेच विमानं सुपुर्द करत असत.
दुसऱ्या महायुद्धापूर्वी तत्कालीन सुपरपॉवर असणाऱ्या ब्रिटनने लढाऊ विमानं बनवण्याचं काम कॅनडाला दिलं होतं. कॅनडा ब्रिटनसाठी हॉकर हरिकेन फायटर आणि एवरो लँकेस्टर बॉम्बर विमानं तयार करत असे. शीतयुद्ध सुरू झालं तसं जगात असुरक्षिततेची भावना वाढली. शस्त्रास्त्रांची मागणी वाढली. यामध्ये लढाऊ विमानांचाही समावेश होता.
दुसऱ्या महायुद्धाचा अनुभव लक्षात घेऊन कॅनडाने लढाऊ विमान तयार करण्याचा विचार केला. कॅनडाला ब्रिटिश किंवा अमेरिकेच्या बनावटीचं लढाऊ विमान नको होतं. कॅनडाला स्वदेशी धाटणीचं लढाऊ विमान तयार करायचं होतं.
एवरो एअरक्राफ्ट कंपनीने हे काम पूर्णत्वास नेलं. 4 ऑक्टोबर 1957 रोजी एवरो कंपनीने लढाऊ विमानाचं पहिलं उड्डाण केलं. हा सोहळा पाहण्यासाठी कॅनडातल्या टोरंटो शहरात 14 हजार नागरिक जमले होते.
एरो फायटर विमान ताशी 1500 वेगाने उडू शकत होतं. आणखी वेगाने भरारी घेण्याची या विमानाची क्षमता होती. या लढाऊ विमानाच्या निर्मितीबरोबर कॅनडाने विमाननिर्मितीत सुपरपॉवर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

मात्र 20 फेब्रुवारी 1959 रोजी अचानक एवरो कंपनी बंद होत असल्याची घोषणा करण्यात आली. लढाऊ विमानांची निर्मितीही होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. हा निर्णय कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जॉन डिफेनबेकर यांनी हा निर्णय घेतला होता. कारण अमेरिका आणि ब्रिटनच्या तुलनेत कॅनडाकडे पैसे आणि संसाधनं नव्हती.
एका रात्रीत एवरो एअरक्राफ्टच्या 15 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. एरो फायटरचे सगळे प्रोटोटाईप्स नष्ट करण्यात आलं. कॅनडाच्या विमान निर्मिती इतिहासात 20 फेब्रुवारी 1959 या दिवसाला ब्लॅक फ्रायडे म्हटलं जातं.
एरो कंपनीने कॅनडाला विमान निर्मितीत सुपरपॉवर बनवलं नाही मात्र या कंपनीने अमेरिका या बलाढ्य देशाच्या चांद्रमोहिमेचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. एवरो एअरक्राफ्टमधून काढून टाकण्यात आलेल्या 32 अभियंत्यांनी नासाच्या अपोलो स्पेस मिशनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. कॅनडाच्या या मदतीच्या बळावरच अमेरिकेने अवकाश मोहिमेच्या शर्यतीत रशियावर मात केली होती.

फोटो स्रोत, AVRO CANADA
कॅनडातील हवाई वाहतूक आणि स्पेस म्युझियमच्या निरीक्षक एरिन ग्रेगरी सांगतात की, जगात असे खूपच कमी देश आहेत ज्यांनी लढाऊ विमानांच्या निर्मितीकरता एवढा पैसा खर्च केला पण तयार झालेली विमानं ताफ्यात सामील केली नाहीत.
कॅनडाने त्यावेळी 158 अब्ज डॉलर खर्च करून एरो फायटर विमानांची निर्मिती केली होती. मात्र या विमानांसाठी पुढे बाजारपेठ दिसत नव्हती. या विमानांची निर्मिती करायची आणि संधी मिळेल तेव्हा विकायची हे कॅनडाला शक्य नव्हतं. कॅनडाची स्थिती म्हणजे अमेरिका किंवा ब्रिटनसारखी नव्हती.
एव्हिएशनवर ब्लॉग लिहिणारे जो कोल्स यांच्या मते अत्याधुनिक संरक्षण प्रणालीची किंमत जास्तच असते. आपल्याच देशाकडून अशा प्रणालीच्या ऑर्डरची हमी नसेल तर असा प्रकल्प चालवणं अवघड असतं.
कॅनडाने हे विमान विकसित केलं कारण दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी बॉम्बर आणि फायटर विमानं बनवण्याचा अनुभव होता. 1949 मध्ये कॅनडाच्या अभियंत्यांनी 102 नावाचं जेट लाइनर नावाचं प्रवाशांना घेऊन जाणारं विमान तयार केलं होतं.
प्रवासी वाहतूक करू शकणारं उत्तर अमेरिकेतलं ते पहिलं विमान होतं. तबकडीप्रमाणे यान तयार करून अंतराळात पाठवण्याची एवरो कंपनीची योजना होती. त्याचवेळी अटलांटिक सफरीसाठी सुपरसॉनिक जेट तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही सुरू होता.

फोटो स्रोत, AVRO CANADA
कॅनडातल्या रॉयल मिलिटरी कॉलेजचे प्राध्यापक रॅंडल वेकलम सांगतात की, एवरो कंपनी दिमाखदार पद्धतीने काम करत होती. एवरो कंपनीत कॅनडाला विमान निर्मिती क्षेत्रात सुपरपॉवर बनवण्याची ताकद होती. विमान तयार करण्याच्या कंपनीच्या माध्यमातून अमेरिका आणि ब्रिटनप्रमाणे शक्तिशाली होण्याचं कॅनडाचं स्वप्न होतं.
1950मध्ये कोरियाने युद्ध पुकारलं तेव्हा कॅनडाच्या संरक्षणमंत्र्यांनी एवरो कंपनीला जेटलायनर बनवण्याचं सोडून द्या आणि फायटर प्लेन बनवा असा आदेश दिला. 1954 मध्ये कॅनडाच्या वायूदलानेही लढाऊ विमान बनवण्यासाठी निविदा मागवल्या. एवरो एअरक्राफ्टच्या अभियंत्यांसाठी ही उत्तम संधी होती.
1957 मध्ये एरो फायटर विमान उड्डाणासाठी तयार होतं. परंतु हे विमान इतकं आधुनिक पद्धतीचं होतं की त्याच्या टेस्टिंगची सुविधा कॅनडाकडे नव्हती. या विमानाला अमेरिकेतल्या नॅशनल कमिटी फॉर एरोनॉटिक्सच्या संशोधन केंद्रात नेण्यात आलं आणि तिथे या विमानाची चाचणी घेण्यात आली.
याच अमेरिकन कमिटीचं नंतर नासात रुपांतर झालं. नासाचे वैज्ञानिक कॅनडाच्या अभियंत्यांनी निर्माण केलेला हा आविष्कार पाहून चकित झाले. त्यांनीही एरो फायटर विमानात स्वारस्य दाखवलं. मात्र 1959 मध्ये कंपनी आणि हा प्रकल्प दोन्ही कॅनडा सरकारने बंद केला.

फोटो स्रोत, AVRO CANADA
कॅनडाच्या या निर्णयाने अमेरिकेला प्रचंड फायदा झाला. एरो फायटर विमानाच्या निर्मिती प्रकल्पावर काम करणाऱ्या कॅनडाच्या बहुतांश अभियंत्यांना नासाने आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. या अभियंत्यांनीच नासाच्या मर्करी, जेमिनी, अपोलो मिशन या मोहिमा फत्ते करण्यात निर्णायक भूमिका बजावली.
एरो फायटर विमान निर्मिती प्रकल्प बंद होताच कॅनडाचं विमान निर्मिती क्षेत्रात सुपरपॉवर होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. मात्र तज्ज्ञांच्या मते कॅनडाने एरो फायटर विमानांची निर्मिती सुरू ठेवली असती तरी कॅनडाचं स्वप्न अर्धवटच राहिलं असतं. कारण मागणी नसताना प्रकल्प सुरू ठेवणं कॅनडा सरकारला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं.
मात्र कॅनडाच्या नागरिकांचं द्रष्टेपण आज उपयोगी ठरतंय. विमान निर्मिती क्षेत्रातली पाचवी मोठी कंपनी कॅनडात कार्यरत आहे. ही कंपनी कॅनडाला प्रचंड नफा मिळवून देते आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








