You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रिडिंग हल्ला: इंग्लंडमधील रिडिंगमध्ये 'दहशतवादी हल्ला', तिघांचा मृत्यू
इंग्लंडमधील रिडिंग शहरातील फॉर्बरी गार्डनमध्ये चाकू हल्ल्याची घटना घडली. यात तिघांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर आहेत. स्थानिक पोलिसांनी ही माहिती दिली.
सुरुवातीला या हल्ल्याला दहशतवादी हल्ला संबोधण्यात आलं नव्हतं. मात्र, काऊंटर टेररिझमचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळानं फॉर्बरी गार्डनमधील या हल्ल्याला 'दहशतवादी हल्ला' म्हणून घोषित करण्यात आलं.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
घटनास्थळावरून पोलिसांनी 25 वर्षे वयाच्या एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. हा संशयित आरोपी रिडिंग शहरातीलच आहे. या संशयिताचे नाव खैरी सादल्लाह असून त्याला MI5 नावाने ओळखलं जात असे.
पोलिसांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून अटक केलेली व्यक्ती लिबियाची नागरिक आहे.
शिवाय, ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी एका गुन्ह्याअंतर्गत यूकेतील तुरुंगात होती, अशी माहिती बीबीसीचे सुरक्षाविषयक प्रतिनिधी डॅनियल सँडफोर्ड यांनी दिलीय.
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पहाटेच सुरक्षारक्षकांची भेट घेऊन, त्यांच्याकडून हल्ल्यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली.
"हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांसोबत आणि जखमी झालेल्यांसोबत आम्ही आहोत. हल्ल्याची घटना कळताच तातडीनं घटनास्थळावर पोहोचलेल्या सर्व यंत्रणांचे मी आभार मानतो," असं बोरिस जॉन्सन म्हणाले.
ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी अगदी काही वेळातच एअर अॅम्ब्युलन्सला बोलावण्यात आलं होतं. दक्षिण-मध्ये अॅम्ब्युलन्स सर्व्हिसमधून पाच अॅम्ब्युलन्स क्रू सुद्धा तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते.
या हल्ल्याच्या घटनेचा तपास काऊंटर-टेरर पोलिसांनी सुरू केला आहे. रिडिंग शहरातील हल्ल्याचा घटनास्थळ पूर्णपणे सील केला आहे.
थेम्स व्हॅली पोलिसांचे मुख्य कॉन्स्टेबल जॉन कॅम्पबेल यांनी सांगितलं की, "काल रात्री घडलेल्या घटनेबद्दल आम्हाला दु:ख आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांसोबत आणि जखमींसोबत थेम्स व्हॅलीचे पोलीस आहेत."
दरम्यान, या घटनेच्या 41 प्रत्यक्षदर्शी समोर आले आहेत. मेट्रोपोलिटन पोलिसांचे सहाय्यक आयुक्त निल बसू यांनी ही माहिती दिली.
या घटनेचे कोणतेही व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करू नये, असं आवाहन स्थानिक पोलिसांनी केलं आहे. शिवाय, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही सांगण्यात आलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)