सेक्स ड्राईव्हमुळे कासवांची 'ही' जात नामशेष होण्यापासून वाचली

इक्वेडोरमधील गॅलापागोस बेटावरील कासवानं त्याची प्रजाती नष्ट होण्यापासून वाचवली. डिएगो आणि इतर 14 नर कासव हे त्यांचं मूळ ठिकाण इक्वेडोरच्या गॅलापागोस बेटांपैकी एक असलेल्या इस्पानोलाला परतले आहेत.

अनेक दशकांपासून ठेवण्यात आलेल्या या कासवांना सोमवारी सँटा क्रूझ बेटावरील कुरणात टाकण्यात आलं होतं. त्यांची प्रजनन प्रक्रिया पूर्ण झाली होती.

1960 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाल्यापासून त्यांनी 2000 हून अधिक कासवांना जन्म दिला.

100 वर्षे वय असलेल्या डिएगोची शेकडो संतती असल्याचं समजतं, तर या 2 हजार कासवांपैकी जवळपास 40% कासव आजही जिवंत असल्याचं आहेत.

इक्वेडोरचे पर्यावरण मंत्री पाऊलो प्रोआनो अँड्राडे यांनी म्हटलं की, डिएगोच्या आयुष्यातील 'महत्त्वाचा अध्याय' आता बंद होत आहे.

"डिएगो आणि इतर कासव हे 'प्रजाती नामशेष होण्यापासून वाचवल्यानंतर' घरी परतत होते," असं पाऊलो यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.

इस्पानोलानं 'मोकळ्या मनानं' त्यांचं स्वागत केलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

गॅलापागोसच्या सर्वांत जुन्या भागापैकी एक बेट इस्पानोला इथं परत जाण्यापूर्वी कासवांना क्वारंटाईन करणं आवश्यक होतं. कारण ते राहत असलेल्या बेटाला अपरिचित अशा वनस्पतींशी संबंधित बियाणं त्यांनी सोबत आणू नये, असा यामागचा उद्देश होता.

सुमारे 50 वर्षांपूर्वी इस्पानोलावरील डिएगोच्या प्रजातीतील फक्त 2 नर आणि 12 मादी जिवंत होते.

आपली प्रजाती चेलोनोयडिस हूडेन्सिस वाचवण्यासाठी प्रजनन प्रक्रियेत भाग घेण्यासाठी डिएगोला कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगो प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आलं होतं.

गॅलापागोस नॅशनल पार्क्स सर्व्हिसने (पीएनजी)च्या मते, 20व्या शतकाच्या सुरुवातीला इस्पानोला येथून डिएगोला वैज्ञानिक मोहिमेद्वारे नेण्यात आलं होतं.

या कासवाचे वजन सुमारे 80 किलो आहे, लांबी 90 सेमी आहे, तर उंची 1.5 मीटर आहे.

गॅलापागोस बेट हे इक्वाडोरच्या पश्चिमेस 906 किमी अंतरावर आहे. हे बेट युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साइट आहे. ते वनस्पती आणि वन्यजीवांच्या वैविध्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.

गॅलापागोस आढळलेल्या प्रजातींनी चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

या बेटावरील जैवविविधता अनुभवण्यासाठी जगभरातील पर्यटक इथं येत असतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)