You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना रेमडेसिवियरः कोव्हिड-19 वर हे औषध उपयोगी पडेल?
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
कोरोना व्हायरसची लागण झाली असेल तर या औषधानं तुम्ही बरे होऊ शकाल असा ठोस पुरावा असल्याचं मत अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
रेमडेसिवियर या औषधाची चाचणी घेतल्यानंतर या औषधामुळे कोरोनाची लक्षणं दिसण्याचा काळ 15 दिवसांच्या ऐवजी 11 दिवसांवर आल्याचं दिसून आलं आहे.
अजूनही याची सर्व माहिती प्रसिद्ध झाली नसली तरी या औषधं कमालीच उपयोगी असल्याचं दिसून आलं आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मात्र हे काही जादूचं औषध किंवा रामबाण उपाय असल्याचं मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
या औषधामुळे लोकांचे प्राण वाचू शकतील, रुग्णालयांवरील ताण कमी होईल आणि लॉकडाऊनचा काळ कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
रेनमडेसिवियर औषध खरंतर इबोलावरील उपचारांसाठी तयार करण्यात आलं होतं. एखाद्या पेशीमध्ये विषाणू शिरल्यानंतर त्यांना जे पोषक विकर (एन्झाइम) लागतं त्यावरच हल्ला करण्याचं काम हे औषध करतं.
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अँलर्जी अँड डिसिजेस संस्थेनं या औषधाची चाचणी घेतली. त्यामध्ये 1063 लोक सहभागी झाले होते. त्यातील काही लोकांना हे औषध देण्यात आलं तर काहींना प्लॅसिबो ट्रिटमेंट म्हणजे आभासी उपचार देण्यात आले.
या संस्थेचे संचालक डॉ. अँटनी फाऊसी सांगतात, "आम्हाला मिळालेल्या डेटानुसार हे औषध अत्यंत महत्त्वाचं आणि रोगी बरा होण्यासाठी उपयोगी असल्याचं स्पष्ट दिसत आहे."
विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ते उपयोगी असल्याचं आणि लोकांवर त्याच्या मदतीने उपचार करण्यासाठी दिशा मिळाल्याचंही ते सांगतात.
रेमेडेसिवियर औषध दिलेल्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण 8 टक्के होतं तर प्लॅसिबो ट्रिटमेंट दिलेल्या लोकांमध्ये ते 11.6 टक्के होतं. हा काही इतका लक्षणीय फरक नाही त्यामुळे संशोधक या फरकाबद्दल फारसं सांगू शकत नाहीत.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
या औषधामुळे नक्की कोणाचा फायदा होईल हे सांगता येत नाहीये. लोक लवकर बरे व्हावेत यासाठी हे उपयोगी आहे की लोकांना आयसीयूमधील उपचारांची गरज लागणार नाही इतपत ते काम करणारं आहे हे लभात आलेलं नाही. हे औषध तरुणांसाठी उपयोगी आहे की व़ृद्धांसाठी. जे आधीपासून एखाद्या आजाराने ग्रस्त आहेत किंवा फक्त कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसाठी जास्त उपयोगी आहे? हे सुद्धा स्पष्ट झालेलं नाही.
कोरानाची लागण झाल्यावर तात्काळ ते वापरलं जावं की नंतर वापरता येतं हे सुद्धा अद्याप जाहीर झालेलं नाही. ही सर्व माहिती अजून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र यामुळे लोकांचे प्राण वाचतील आणि लॉकडाऊन संपेल असा दुहेरी फायदा होण्याची आशा तज्ज्ञांना आहे.
UCL मध्ये MRC क्लिनिकल ट्रायल युनिटचे संचालक प्रा. महेश परमार यांच्या मते, "हे औषध सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन देण्याआधी काही गोष्टी होणं आवश्यक आहे. उपलब्ध माहितीची छाननी रेग्युलेटर्सनी करायला हवी. त्यानंतरच त्याला लायसन्स देण्यात यावं आणि त्यानंतर जगभरातील आरोग्य संस्थांनी त्याची छाननी करावी.
हे औषध कोव्हिड-19 विरुद्ध लढण्यासाठी उपयोगी आहे का हे पाहण्यासाठी आम्हाला सर्वत्र चाचण्यांमधून आलेली माहिती पाहावी लागेल."
जर या औषधामुळे रुग्णांची आयसीयूची गरज कमी झाली आणि त्यांच्या आयुष्याला असलेला धोका कमी झाला तर सोशल डिस्ट्न्सिंगचा नियमही थोडा शिथिल करता येईल.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. पीटर हॉर्बी हे कोव्हिड19 वरील औषधाची सर्वात मोठी क्लिनिकल ट्रायल घेत आहेत. ते सांगतात, "आम्हाला सर्व परिणाम नीट पाहावे लागतील. मात्र ते सर्व योग्य असल्याचं दिसलं तर ती एक चांगली मोठी बातमी असेल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)