पाकिस्तानमधून हकालपट्टी होऊन गायब झालेल्या बलूच पत्रकाराची गोष्ट

साजीद हुसेन

फोटो स्रोत, SAJID HUSSAIN/FACEBOOK

फोटो कॅप्शन, साजीद हुसेन
    • Author, मोहम्मद हनीफ
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, पाकिस्तानहून

अत्यंत बुद्धिवान माणूस. पर्वत, डोंगर चढण्याची इच्छा नाही, कोणाला खाली ढकलून देण्याची मनीषा नाही.

राजकारणही असं करत की एखादं वाद्य शिकत आहेत. पत्रकारिता एखाद्या कर्तव्याप्रमाणे करत असत.

जिथे जाण्यास सहपत्रकार उत्सुक नसत, टाळाटाळ करत तिथून तुम्ही अगदी आपुलकीने चांगल्या बातम्या आणायचात.

सुरुवातीला फिल्डवर आणि नंतर डेस्कवर काम करत नसतात तर बलुचिस्तानमधून कुठल्या गावातून कुणाला उचचलं याचा पत्ताही लागला नसता.

कुठल्या विद्यापीठातून कोण बेपत्ता आहे? पाकिस्तानचा ड्रग्सचा बादशहा कोण आहे? आणि त्याची कोणाच्या घरी उठबस असते.

बलुचिस्तानमध्ये तुम्ही तरुण असता, विद्यापीठापर्यंत पोहोचलात तर तुमचं अर्ध आयुष्यच उरतं.

हरवलेल्या व्यक्तींचे मृतदेह

तुमच्यावर कोणताही संशय घेतला जाऊ शकतो. तुम्ही कट्टरपंथीयांच्या विरोधातले असाल, तुम्हाला फुटीरतावाद्यांचे विदेशी एजंट म्हणून समजलं जाईल.

हॉस्टेलच्या खोलीत बसून बलूच शायरी म्हणत असाल तर तुम्हाला गायब केलं जाऊ शकतं.

बीएसओवाल्यांबरोबर बसून काम केलं असेल तर तुम्ही अनेक वर्षांसाठी गायब होऊ शकता.

तुम्ही स्वत:च म्हणायचात की गायब झालेल्या माणसांचे मृतदेह सापडणं त्यांच्या कुटुंबीयांसाठी नशिबाची गोष्ट आहे. पाकिस्तानात माणूस बेपत्ता होणं यापेक्षा मोठं दु:ख नाही.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

साजिद तुम्ही एक महिन्यापासून स्वीडनमध्ये बेपत्ता आहात.

निर्वासित होणं

मित्रमंडळी म्हणतात, साजीदला गायब व्हायचं होतं तर इतकं दूर जाण्याची काय गरज होती. देशातल्या देशात सगळा बंदोबस्त झाला असता.

मात्र तुमच्या आजूबाजूच्या इतक्या लोकांना गायब करण्यात आलंय की तुम्हालाही आतून माहिती होतं की तुमच्यावरही ही वेळ ओढवू शकते.

कोरोना
लाईन

म्हणूनच तुम्ही देशात कुठेतही भूमिगत होण्यापेक्षा निर्वासित होण्याचा मार्ग स्वीकारलात.

साजिद, तुम्हाला गायब होणारा पत्रकार मित्र भाई रज्जाक सरबाजी बलोच तर माहिती असेलच.

त्याचा मृतदेह इतका छिन्नविछिन्न स्थितीत होता की घरचेही त्याला ओळखू शकले नाहीत. वृत्तसंस्थेने बातमी देण्याआधीच तुम्ही रज्जाक सरबाजी बलोच मारला गेल्याची बातमी दिली होतीत.

एका मृतदेहाचा प्रवास

मग एक आनंदाची बातमी- विकृत मृतदेह रज्जाकचा नाही. नंतर बातमी सांगितलीत की तो मृतदेह तुमचा मित्र रज्जाकचाच आहे.

मग तुम्ही इंग्रजीत एक लेख लिहिला होतात- एका मृतदेहाचा प्रवास. मी इंटरनेटवर तो लेख खूप शोधला मात्र तुमच्याप्रमाणे तो लेखही मिसिंग आहे.

साजीद हुसेन

फोटो स्रोत, SAJID HUSSAIN/FACEBOOK

तो लेख हृदय पिळवटून टाकणारा होता. मात्र त्या लेखात ओघवतं आणि उपरोधिक हास्यही दडलं होतं.

उमेदीच्या काळात धुराने काळवंडलेल्या एका खोलीचा उल्लेख त्यात होता. विकृत मृतदेहात रुपांतर झालेल्या रज्जाक सरबाजी बलोचने त्या खोलीत तुम्हाला मानवी संस्कृतीच्या विकासासंदर्भातील पुस्तकाचा बलोच अनुवाद ऐकवण्यास सुरुवात केली होती.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

तेव्हा तुम्हाला हसायला आलं होतं कारण तोपर्यंत बलूचमध्ये असं बोलणं, लिहिणं तुम्ही ऐकलं नव्हतं.

स्वीडनमधल्या थंडीचा उल्लेख

आम्ही सगळे रज्जाकप्रमाणे दिवसा पत्रकारिता करत असू तेव्हा आतमध्ये एक कादंबरी, एक पुस्तक, एक गोष्ट घेऊन फिरत असू.

तुम्ही कादंबरीचा एक खर्डा लिहून मित्राला पाठवलाही होतात. मलाही पाठवाल असं प्रॉमिस केलं होतंत.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

तुम्ही शेवटच्या मेलमध्ये स्वीडनमधल्या बोचऱ्या थंडीचा आणि प्रदीर्घ रात्रीचा उल्लेख केला होतात.

आता असं ऐकतोय की तिथे आता सूर्यदर्शन होतं आहे. कोरोनाचा धोका असूनही लोक आसपासच्या बागेत उब घेण्यासाठी जात आहेत.

तुमच्याबद्दल प्रेम असणारे सरकारच्या दिशेने बोट दाखवतील. सरकार माफी मागू शकतं. सरकारची पोहोच लांब असते पण इतकीही लांब नाही.

पाकिस्तानात काय वाईट होतं?

सरकार केचमधून एखाद्याला गायब करू शकतं पण स्वीडनमधल्या विद्यापीठाच्या हॉस्टेलमधूनही एखाद्याला गायब केलं जाऊ शकतं?

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

नाही, नाही. तुम्ही एखाद्या डोंगराच्या शिखरावर गेला आहात. तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत असाल.

तुमची काही साधना सुरू असेल किंवा कादंबरीचा पुढचा भाग लिहिण्यात गर्क असाल.

घरातला व्यक्ती गायब होत असे किंवा नाराज होऊन घरातून निघून जात असे तेव्हा लहानपणी क्वेटातून प्रकाशित होणाऱ्या मशरिक नावाच्या वर्तमानपत्रात एक जाहिरात छापून येत असे.

जाहिरातीत म्हटलेलं असे, कृपा करून परत ये, घरच्यांपैकी कोणी काहीही म्हणणार नाही. नाहीतर लोक म्हणत राहतील, साजीद गायब व्हायचंच होतं तर पाकिस्तान काय वाईट होता?

हे वाचलंत का?

हे आवर्जून पाहा

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)