कोरोना व्हायरस : साथीच्या रोगाच्या काळात आपण कसं वागलं पाहिजे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मार्क ईस्टन
- Role, होम एडिटर
कोरोना व्हायरस आपल्या मानवतेचं शोषण करत आहे. माणूस सामाजिक प्राणी आहे, पण कोरोना व्हायरस आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीला कमकुवत करत आहे.
यामुळे आपल्या जुन्या सवयी बदलून नवीन पद्धतींचा अंगीकार करण्याची वेळ आली आहे.. साथीच्या शिष्टाचाराशी जुळवून घ्यावं लागणार आहे.
मग आता आपण कसं वागायला हवं? सांत्वन व्यक्त करणारा हात असो किंवा आलिंगन, काहीही करायला लोक कचरत असतील, अशा कृती समाजविरोधी ठरत असेल, तर आपण कसं वागावं?, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
सामान्य परिस्थितीत चिंता असेल किंवा कामाचा ताण आसेल, तर त्याकडे शांतपणे पाहिलं जातं. पण, ही सामान्य परिस्थिती नाही. या परिस्थितीत मानवी स्पर्शदेखील शत्रू ठरू शकतो.
आपण संपर्कात येत असलेली कोणतीही वस्तू ही कोरोना व्हायरसच्या विषाणूची वाहक असू शकते. या साथीचा प्रसार रोखणं हेच आपलं कर्तव्य आहे.


"हा तुमच्या आयुष्यातील असा काळ आहे, ज्यात तुमची कृती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं आयुष्य वाचवू शकते," NHS इंग्लंडमधील डॉक्टर स्टीफन पोवीस सांगतात.
तुमच्या साध्या हात धुण्यातून कदाचित 1, 2, 50 किंवा 10 हजार जीव वाचू शकतात, हे तुम्हाला माहितीही नसेल, असा हा काळ आहे. त्यामुळे प्रत्येक कृती करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
आता एखाद्याला कठोर वाटल्या तरी चालेल, तरी पण या नवीन गोष्टी करायला आपण शिकायला पाहिजे. आता सोशल डिस्टसिंग, समोरच्याशी बोलताना 2 मीटर अंतर ठेवणं, हस्तांदोलन न करणं अथवा मिठी न मारणं हे नवीन मॅनर्स आत्मसात करायला हवेत. आपण ते लवकरात लवकर शिकणं गरजेचं आहे.
या साथीच्या काळात आपण जसे वागणार आहोत, त्यावर कोट्यवधी लोकांचं भविष्य अवलंबून असेल. त्यामुळे Behavioural Science युके सरकारच्या केंद्रस्थानी आहे.
सध्या अनेकांना तीच कृती करायची आहे, जी बहुसंख्य लोकांच्या कल्याणाची असेल, ही त्यातल्या त्यात सुखद बाब आहे. यामुळे परोपकारी कृत्यं प्रबळ होत जातील. यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार होणार नाही, अशी प्रकरणं क्वचितच कुठे दिसून येतील, Behavioural Science उपसमितीनं युकेतल्या मंत्र्यांना या सूचना केल्या आहेत.
सामाजिक विघटन कधीकधी भीतीमुळे, तर कधीकधी विचारहीनपणा आणि लोभामुळे होत असतं. जेव्हा जगाला वाढत्या धोकादायक परिस्थितीची जाणीव होते, तेव्हा लोक त्यांच्या गरजांनुसार जीवन संतुलित ठेवण्यासाठी संघर्ष करतात. यामुळे मग लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होतं.
यामुळेच मग लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करू लागतात, पोलीस सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"सामूहिकतेच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करा," असं वर्तणूक शास्त्रज्ञ सरकारला सांगत आहेत.
या संकटाच्या काळात आपण सर्व एकत्र आहोत, ही भावना निर्माण होणं गरजेचं आहे, असंही शास्त्रज्ञ सांगतात.
चीन, जपान, दक्षिण कोरिया यांसारखे सामूहिक संस्कृती असलेले देश एकटेपणानं राहण्याची संस्कृती असलेल्या पाश्चिमात्य देशांपेक्षा कोरोना व्हायरसला प्रभावीपणे रोखू लागले आहेत.
"हे ब्रिटिश लोकांच्या स्वातंत्र्यप्रेमी प्रवृत्तीच्या विरोधात असल्यामुळे किती कठीण आहे, याची मला कल्पना आहे," असं ब्रिटनच्या पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना म्हटलं.
शुक्रवारी त्यांनी देशातील पब आणि रेस्टॉरंट्स बंद केले आहेत.
वरिष्ठ सरकारी मंत्र्यांना माहिती देणारी वैज्ञानिक समितीच्या सदस्यानं सांगितलं की, "हा विषाणू जगातील प्रत्येक देशासाठी सामाजिक भांडवलावरील एक उपाय असेल, ज्यामुळे समाज म्हणून लोक एकसंध राहतील."
आपण आजूबाजूचा परिसर आणि सोशल मीडियावर परोपकार आणि दानशूरपणाची लाट पाहत आहोत, लोक एकटेपणा आणि त्रासातून इतरांना आधार देण्याचे मार्ग शोधत आहेत.
सोशल डिस्टन्सिंगच्या काळात "एकत्र येणे" म्हणजे काय याचा देशानं वेगळा विचार करायला हवा.

फोटो स्रोत, Getty Images
पण, आपल्यातील बहुतेक जण अचूक माहिती आणि सल्ला देऊन, असुरक्षित व्यक्तींना अन्न किंवा इतर आवश्यक वस्तू पुरवून, तसंच फोन कॉलद्वारे एकटं राहणाऱ्यांशी मैत्री करत आहेत, त्यांना धीर देत आहेत.
घरात अडकलेल्या लोकांमध्ये आपला सामाजिक भांडवलाचा साठा वाढवण्याची, शेजाऱ्यांना मदत करण्याची, आधार देण्याची, योग्य गोष्टी करण्याची संधी आहे.
"आतापर्यंतच्या इतिहासात सध्या आपण किती दया दाखवतो, त्यानुसार आपलं मूल्यमापन केलं जाईल," असं चॅन्सेलर ऋषी सनक यांनी शुक्रवारी देशाला सांगितलं.
जेव्हा हे संपेल आणि याकडे आपण मागे वळून बघू तेव्हा आपण दाखवलेल्या दयेची आठवण होईल, असंही त्यांनी म्हटलं.
Action for Happiness या संस्थेनं लोकांना शांत राहण्यास, शहाणे राहण्यास आणि दयाळूपणे वागण्यास मदत करण्यासाठी "कोपिंग कॅलेंडर" तयार केले आहे.
"इतरांना मदत करण्यासाठी दयाळूपणे 3 गोष्टी करा, त्या लहान असतील तरी चालतील," असं हे कॅलेंडर सुचवते.
एखाद्या प्रिय व्यक्तीला कॉल करणं आणि त्यांचं ऐकणं, ज्यांचे आपण आभारी आहोत अशा तीन व्यक्तींना फोनद्वारे ते सांगणं आणि बातम्यांमध्ये सकारात्मक गोष्टी शोधणे आणि त्या इतरांपर्यंत पोहोचवणं, असे सल्ले यात देण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
वर्तणूक विज्ञानानुसार, आपला नेत्यांवरील विश्वास हा चिंता आणि संभाव्य सामाजिक विघटनाचा नाश करणारे औषध आहे.
जनतेची काळजी घेण्यात सरकारची प्रतिसादात्मक रणनीती प्रभावी नाही, याची जाणीव जनतेमध्ये झाल्यास तणाव वाढू शकतो, असंही हे विज्ञान सांगतं.
आता सांसारिक कार्यांसाठी आपल्याला नवीन पद्धतीची दिनचर्या शोधावी लागणार आहे. यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला संसर्ग होणार नाही.
ज्यांना कामावर जाणं आवश्यक आहे त्यांच्यासाठी आपण स्पर्श करत असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे: हँडल्स, रेल, कळा, खिशातील नाणी, पर्समधील क्रेडिट कार्ड, सुपरमार्केटमधील शेल्फ, स्टीयरिंग व्हील आणि एक गीअर स्टिक, संगणक कीबोर्ड आणि माऊस, चहाचा मग... अशा सगळ्या गोष्टींकडे !
स्वत: साठी, कुटुंबासाठी आणि विस्तीर्ण समुदायासाठी होणारी जोखीम कमी करणं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
हा साथीचा आरोग आपल्या मानवतेचं शोषण करत असला, तरी आपलं एकमेकांबदद्लचं प्रेम आणि दया याला पराभूत करू शकेल.
पुढील काही महिने आपण जिवंतपणी अनुभवत असलेल्या आपल्या समुदायिक सामर्थ्याची चाचणी घेईल.
सध्या युद्धकाळापेक्षाही कठीण काळ आपल्यासमोर उभा ठाकला आहे आणि अशा काळात आपण कसं वागतो, त्यावरून भविष्यातील पिढी आपल्याबद्दचं मत ठरवणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








