इराणमध्ये युक्रेनचं विमान इंजिनातील बिघाडामुळे पडल्याचा प्राथमिक अंदाज

युक्रेनचं बोईंग-737 हे प्रवासी विमान इंजिनात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पडल्याचं इराणमधल्या युक्रेनच्या दुतावासानं सांगितलंय. त्यामागे कुठलही दहशतवादी कारण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

या विमानात 170 पेक्षा जास्त लोक होते. त्या सर्वांचा त्यात मृत्यू झाला आहे.

युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचं हे विमान होतं. इराणची राजधानी तेहरानमधल्या इमाम खोमेनी विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते कोसळल्याचं वृत्त Fars State या इराणच्या वृत्तसंस्थेने दिलं. हे विमान युक्रेनची राजधानी किव्हला जात होतं.

प्राथमिक माहिती नुसार विमानाचं इंजिन निकामी झाल्यामुळे ते पडल्याचं कळतंय, दहशतवादी हल्ल्याची शक्यता तुर्तास तरी वाटत नाही, असं युक्रेनच्या परराष्ट्र विभागाच्या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे.

या घटनेनंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा ओमनचा दौरा मध्येच सोडून राजधानी किव्हला प्रयाण केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)