कालव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हेनिस शहराला पुराचा वेढा

फोटो स्रोत, Getty Images
कालव्यांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इटलीतल्या व्हेनिस शहराला पुराने वेढा दिला आहे. व्हेनिस हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या शहरातलं दळणवळण एरवी बोटीतूनच होतं. पण पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

फोटो स्रोत, Reuters
"व्हेनिसमध्ये गेल्या पन्नास वर्षांतला भीषण पूर आला असून, शहरावर कायमचा ओरखडा उठवून जाणार आहे," असं वक्तव्य व्हेनिसचे महापौर लुगी ब्रुग्नो यांनी केलं आहे.
"सरकारनं आता तरी जागं व्हावं. हा हवामान बदलाचाच परिणाम असून, याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे," असंही ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
व्हेनिसमधल्या पुराच्या पाण्यानं 1.87 मीटर्सची म्हणजेच 6 फुटांची पातळी गाठली आहे. भरती नियंत्रण केंद्राच्या मते, 1923 साली पाण्याच्या पातळीत फक्त एकदाच अशी वाढ झालेली होती. 1966 साली पाण्याची पातळी 1.94 मीटर्स इतकी झाली होती.
पर्यटनस्थळांना बसलाय पुराचा फटका
व्हेनिसच्या अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळांना वादळाचा आणि पुराचा तडाखा बसला आहे. अनेक लोकप्रिय ठिकाणी रस्त्यांवर पुराचं पाणी साचलं आहे. लोकं त्यातून वाट काढत आहेत.
सेंट मार्क्स स्क्वेअर शहरातल्या सर्वांत खालच्या पातळीवर आहे. या भागाला वादळाचा सर्वांत जास्त तडाखा बसला आहे.

फोटो स्रोत, Reuters
सेंट मार्क्सच्या बॅसिलिकाला 1200 वर्षांमध्ये सहाव्यांदा पुराला तोंड द्यावे लागले आहे, अशा नोंदी चर्चकडे आहेत. यापैकी चार पूर गेल्या वीस वर्षांमध्ये आलेले आहेत, असे सेंट मार्क्स कौन्सिलचे सदस्य पिअरपाओलो कॅम्पोस्ट्रिनी यांनी सांगितले.
सर्वांत लोकप्रिय ठिकाणांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. क्रिप्ट पूर्णपणे भरला होता आणि बॅसिलिकाच्या स्तंभांना संरचनात्मक नुकसान होण्याची भीती आहे, असे महापौरांनी सांगितले.
व्हेनिस शहर इटलीच्या ईशान्य किनाऱ्यालगतच्या खाऱ्या सरोवराच्या आतील भागात 100 पेक्षा जास्त बेटांचे बनलेले आहे.

फोटो स्रोत, Reuters
पेलिस्ट्रिना आयर्लंडवर दोन लोकं मृत्युमुखी पडले आहेत, एड्रिएट्रीक समुद्रापासून दोन खाऱ्या पाण्यातील जमिनीचा तुकडा वेगळा झाला आहे. एका व्यक्तीला घरातील पाणी काढण्यासाठी पंप चालवताना विजेचा धक्का बसला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी व्यक्तीचा मृतदेह अन्यत्र सापडला.
झालेली हानी भीषण आहे असल्याचं महापौर ब्रुग्नोनी म्हटलं आहे. त्यांनी राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळल्याचं जाहीर केलं आहे, तसंच पुरापासून व्हेनेसियन लगून वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.

फोटो स्रोत, EPA
सरकार व्हेनिसला मदत करेल. पूर ओसरेपर्यंत शहरातील शाळा बंद राहतील, असं महापौरांनी ट्वीट केलं आहे.
तसंच ब्रुग्नो यांनी स्थानिक व्यावसायिकांना झालेल्या नुकसानीचे फोटो आणि व्हिडिओ पाठवायला सांगितले आहे.
इथल्या पर्यटकांनी जितकं शक्य आहे तितकं फिरणं चालूच ठेवलं आहे. एका फ्रेंच दांपत्याने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितलं, की पूर असलेल्या भागात त्यांना काही लाकडी प्लॅटफॉर्म पलटलेले दिसले, त्यावर त्यांनी पोहून सुरक्षित ठिकाण गाठलं.
व्हेनिसचा पूर हवामान बदलामुळे आला आहे का?
बीबीसीचे हवामानतज्ज्ञ निक्की बेरी यांच्याकडून विश्लेषण.
व्हेनिसमध्ये नुकताच महापूर आला. उच्चतम लाटा आणि समुद्राच्या पूर्वेला एड्रिएटिक समुद्राकडून जोरदार सिरोको वारा वाहून वादळ यांचा एकत्रित परिणाम म्हणून हा पूर आला आहे. या दोन्ही घटना जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्याला अॅक्वा अल्टा म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Reuters
व्हेनिसला सध्या अॅक्वा अल्टाचा तडाखा बसला असून, असा प्रकार इतिहासात दुसऱ्यांदा होत आहे. या वर्षी लाटांचे जे दहा थर उसळले आहेत, त्यापैकी पाच थर गेल्या वीस वर्षांमध्ये येऊन गेले आहेत. वरील पाच थर आत्ता पहिल्यांदाच येऊन आदळले आहेत.

फोटो स्रोत, AFP
आपण एकाच घटनेचे परिणाम लक्षात घेता हवामान बदल टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु या समुद्राची अपवादात्मक वारंवारता वाढते आहे आणि ही मोठी चिंतेची बाब आहे. आपल्या बदलत्या हवामानामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. त्याचा परिणाम व्हेनिससारख्या शहरांवर होत आहे.

फोटो स्रोत, Reuters
उत्तरी गोलार्ध ओलांडून जोरदार मेरिडियनल (वेव्हिंग) जेट प्रवाह मध्य भागात थडकले आहेत, यामुळे एड्रिएटिक वादळाची लाट उत्पन्न झाली आहे. आणि मध्य भूभागात कमी दाबाच्या यंत्रणेचा वाहक पट्टा तयार झाला आहे.

फोटो स्रोत, AFP
हवामान बदलामुळे जेट प्रवाहाची वारंवारता वाढेल आणि अशा प्रकारचे वातावरण वारंवार तयार होईल. यामुळे उंच लाटांची शक्यता वाढून व्हेनिसवर वारंवार पुराचं संकट ओढावेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








