नरेंद्र मोदी: भारताने युद्ध नाही बुद्ध दिला, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत मोदींचं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत जनकल्याणातून जगकल्याणाचा नारा दिला आहे.

भारताची लोकसंख्या खूप आहे तरी देखील भारताचं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी आहे असं मोदी यांनी म्हटलं. अपांरपरिक ऊर्जा स्रोतांवर भारतानं अभूतपूर्व काम केलं आहे, असं मोदींनी म्हटलं.

भारताने युद्ध नाही बुद्ध दिला असं मोदी म्हणाले. भारतानं कधीही कुणावर आक्रमण केलं नाही. भारत हा शांतताप्रिय देश आहे. पण आपल्याला दहशतावादाचा कठोरपणे मुकाबला करणे आवश्यक आहे असं मोदी म्हणाले. मानवतेसाठी आपल्याला दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं.

आम्ही दहशतवादाविरोधात रणशिंग फुकलं आहे. दहशतवाद हा केवळ एका देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आव्हान ठरला आहे. तेव्हा सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे असं मोदी म्हणाले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देखील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करणार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)