पाकिस्तानच्या या खेळाडूने 27 व्या वर्षीच कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला

मोहम्मद आमिर

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, मोहम्मद आमिर

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्याने हा निर्णय घेतल्याने क्रिकेट जगतातल्या अनेक धुरिणींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाने शुक्रवारी ही माहिती दिली. वनडे आणि T-20 मॅचवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मोहम्मद आमिरने हा निर्णय घेतल्याचं बोर्डाने सांगितलं.

मात्र, पाकिस्तानातल्या काही मीडिया रिपोर्टमध्येही असंही सांगण्यात येतंय की मोहम्मद आमीर ब्रिटनचं नागरिकत्व मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे.

माजी खेळाडू आणि जाणकारांचं मत

पाकिस्तान संघाचे माजी कॅप्टन वसीम अकरम यांनी ट्वीट केलं आहे, "मोहम्मद आमीरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणं, माझ्यासाठी थोडं आश्चर्यचकित करणारं होतं. कारण वयाच्या 27-28 व्या वर्षी तुम्ही शिखरावर असता. कसोटी क्रिकेटमध्येच तुमचा खरा कस लागतो कारण तो सर्वश्रेष्ठ फॉर्मॅट आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दोन आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानला त्याची गरज असेल."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही आमीरच्या निवृत्तीवर काळजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, "पाकिस्तानच्या संघाला काय झालंय, मला कळत नाहीय. आमिर 27व्या वर्षी कसा काय निवृत्ती घेऊ शकतो. पाकिस्तानने त्याच्यावर बरीच गुंतवणूक केली आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर त्याला संघात स्थान दिलं. संधी दिली. तो चांगल्या फॉर्ममध्ये असताना त्याने संन्यास घेतला."

क्रिकेट समालोचक रमिझ राजा यांनीदेखील खेद व्यक्त केला आहे. ते लिहितात, "वयाच्या 27व्या वर्षी आमिरने पांढरा झेंडा दाखवणं निराश करणारं आहे. आपल्या कसोटी क्रिकेटला पुन्हा रुळावर आणू पाहणाऱ्या पाकिस्तानच्या क्रिकेटसाठी त्याचा हा निर्णय अजिबात हिताचा नाही. ही आपली जबाबदारी पार पाडण्याची वेळ होती. बाहेर जाण्याची नव्हे."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

मोहम्मद आमीर याने गेल्या शुक्रवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करत हा व्हिडियो पोस्ट केला होता.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

शानदार विक्रम

मोहम्मद आमिरने 36 कसोटी सामन्यांमध्ये 119 विकेट्स घेतल्या आहेत. आमिर 2009 साली पहिला कसोटी सामना खेळला होता. 2010 साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला. त्यानंतर त्याच्यावर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

मोहम्मद आमिर

फोटो स्रोत, Getty Images

यानंतर जुलै 2016 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. लॉर्ड्स मैदानावर कसोटी सामन्याच्या एका दिवसात घेतलेल्या सहा विकेट्स त्याची सर्वोच्च कामगिरी होती. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कपमध्येदेखील आमिरने उत्कृष्ट कामगिरी बजावत 8 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या.

2018 पासून तो 6 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 24 विकेट्स घेतल्या.

दरम्यान पाकिस्तानची वेबसाईट 'क्रिकेट पाकिस्तान डॉट पीके'चं म्हणणं आहे की इंग्लंडमध्ये स्थायिक होऊन लिग क्रिकेट खेळण्याची आमिरची मनिषा आहे.

या वेबसाईटच्या बातमीनुसार, "आमीरने 2016 साली ब्रिटिश नागरिक असलेल्या नरगिस मलिकशी विवाह केला होता. त्याने ''स्पाउज व्हिसा'साठी अर्ज केला होता. हा व्हिसा मंजूर झाल्यास तो 30 महिने इंग्लंडमध्ये राहू शकतो."

"लंडनमध्ये घर घेण्याचाही त्याचा विचार आहे," असंही या वेबसाईटने म्हटलं आहे.

मात्र, या दाव्यांची पुष्टी करणारे कोणतेही प्रमाण वेबसाईटने दिलेले नाही.

भारतीय क्रिकेट एक्सपर्ट हर्षा भोगले यांनी ट्वीट केलं आहे, "तुम्ही मैदानाबाहेर काय निवडता याचा तुम्ही मैदानावर काय करता, त्यावर परिणाम होत असतो, हाच यातून अमर्याद प्रतिभा लाभलेल्या मलिकसाठी धडा आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

तर भरत सिरवी लिहितात की श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा यानेदेखील 2011 साली वयाच्या 27व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 2019 साली तो एक उत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेट खेळाडू म्हणून निवृत्त होत आहे. आमिरही हे करू शकेल का?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)