You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुरुषांवर जादा कर लावणारं सिडनीतलं कॅफे चौफेर टीकेनंतर होणार बंद
ऑस्ट्रेलियातल्या एका व्हिगन कॅफेनं पुरुष ग्राहकांवर कर लावण्याचा निर्णय घेतला होता. सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला.
Handsome Her नावाचा हा कॅफे 2017मध्ये मेलबर्नमध्ये सुरू करण्यात आल्यानंतर त्यावर लिंगभेदाचा आरोप झाला होता.
या कॅफेनं महिलांना आसनांसाठी प्राथमिकता दिली होती. शिवाय पुरुष ग्राहकांकडून दरमहा एका आठवड्याला 18 टक्के अतिरिक्त चार्ज घ्यायचं ठरवलं होतं. त्यामुळे या कॅफेविषयी चर्चा सुरू झाली होती.
अनिवार्य नसलं तरी पुरुषांवरील कर जेंडर पे गॅप दर्शवण्याचं एक माध्यम होतं, असं कॅफेच्या मालकांनी सांगितलं.
दोन वर्षांनंतर मालकांनी जाहीर केलं की, 28 एप्रिल 2019ला हा कॅफे बंद करण्यात येईल.
कामकाजाच्या शेवटच्या दिवशीची जाहिरात करण्यासाठी आयोजित केलेल्या फेसबुक इव्हेंटमध्ये त्यांनी हे जाहीर केलं.
"पुरुषांवर कर लादण्याच्या निर्णयानं आम्हाला दाखवून दिलं की, पौरुषत्व किती नाजूक आहे आणि पित्तृसत्तेविरोधात लढा देणं किती गरजेचं आहे," असं त्यांनी लिहिलं आहे.
"महिला आणि महिलांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्याचं प्रयत्न करणारं आमचं सिडनी रोडवरील एक छोटसं दुकान होतं. पण अचानक मेलबर्न आणि सोशल मीडियावरल्या लोकांसाठी आम्ही टीकेचा विषय बनलो," असं त्यांनी म्हटलं आहे.
पुरुष अधिकार कार्यकर्त्यांची कटुता अथवा पुरेसा पैसे मिळत नसल्यानं आम्ही कॅफे बंद करत नसल्याचं त्यांनी दुसऱ्या एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुरुषांवर कर लादण्याच्या निर्णयामुळे व्यवसाय बुडाला, ही बाब त्यांनी नाकारली आहे.
"खरं तर आम्ही तरुण आहोत, शिक्षित आहोत आणि काही धाडसी पाऊल आम्हाला घ्यावंसं वाटतंय," असं त्यांनी लिहिलं आहे.
कॅफेने घेतलेल्या निर्णयानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. यात काही जण त्यांच्या बाजूनं, तर काही त्यांच्याविरोधात बोलत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)