ब्रेक्झिट : कोणत्याही वाटाघाटींशिवाय EUमधून बाहेर पडण्याचा प्रस्तावही अमान्य

कोणत्याही वाटाघाटींशिवाय युरोपीय युनियनमधून बाहेर पडण्याचा प्रस्ताव ब्रिटनच्या खासदारांनी फेटाळला आहे. 308 विरुद्ध 312 मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

यूके युरोपीय युनियनमधून बाहेर पडणार नाही, असा याचा अर्थ होत नाही. पण आता ब्रेक्झिटला टाळायला हवं की नाही, या बाबीवर संसदेत मतदान होऊ शकतं.

यावर गुरुवारी मतदान होईल. ब्रेक्झिटला टाळण्याचा प्रस्ताव पारित झाला आणि युरोपीय युनियनंही यासाठी तयार असेल, तर यूके 29 मार्चपूर्वी युरोपीय युनियनमधून बाहेर पडणार नाही.

सरकारनं कोणत्याही वाटाघाटींशिवाय 29 मार्चला युरोपीय युनियनमधून बाहेर पडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण वाटाघाटी केल्याशिवाय यावर मतदान करणार नाही, असं खासदारांनी म्हटलं आहे.

युरोपीय युनियनमधून यूके बाहेर पडण्याचा प्रस्ताव 22 मे 2019पर्यंत टाळण्यात यावा, या प्रस्तावालाही खासदारांनी विरोध केला आहे. 164 विरुद्ध 374 मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

याचा अर्थ असा की कोणत्याही वाटाघाटींशिवाय ब्रेक्झिट घडून येईल.

या प्रस्तावाला थेरेसा मे यांचे सहकारी डेमियन ग्रीन यांनी सादर केलं होतं. ब्रेक्झिटचं समर्थन आणि विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)