You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टेस्ला: आधीच महाग अससेल्या कारच्या किंमती आणखी वाढणार
आधीच महाग असेलेल्या टेस्ला इलेक्ट्रिक कारच्या किंमती आणखी वाढणार आहेत. कंपनीचे शो रुम्स चालू ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
New mid-market Model या कारची किंमत सोडून इतर कारच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढणार आहेत.
कारच्या किंमती कमी ठेवण्यासाठी गेल्या काही काळात कंपनीने काही शोरुम्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यात आता बदल होत आहे.
एक महिन्यापूर्वी टेस्लाच्या Model 3 कारची किंमत USD $35,000 पर्यंत कमी करण्यासाठी कंपनीनं काही स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
आधी जितकी स्टोर्स बंद करायची होती त्यापैकी निम्मी स्टोर्स बंद होणार आहेत. पण नक्की किती स्टोर्स बंद होणार आहेत याविषयी कंपनीनं काही माहिती दिली नाही.
गाड्यांचे स्टोर्स चालू ठेवण्यासाठी कारची किंमत 3 टक्क्यांनी वाढवावी लागणार आहे, असं टेस्ला कंपनीचे संस्थापक इलोन मस्क यांचं म्हणणं आहे.
सध्या कंपनीची 378 स्टोर्स आणि सर्व्हिस सेंटर्स चालू आहेत पण त्यापैकी कोणती बंद होणार आहेत याबाबत काही माहिती दिली नाही.
"गेल्या 2 आठवड्यांपासून टेस्लाच्या प्रत्येक स्टोर्सचा अभ्यास केला जात आहे. आम्ही आधीपेक्षा कमी स्टोर्स बंद करत आहोत आणि त्यांचा आणखी काही महिने अभ्यास केला जाईल," असं कंपनीनं सांगितलं.
टेस्ला कंपनीच्या Moder 3, Model S आणि X कार यांची किंमत वाढणार आहे. पण ग्राहक 18 मार्चपर्यंत जुन्या किंमतीतच ऑर्डर करू शकतात.
या कार गाड्या ऑनलाइनच विकल्या जाणार आहेत. तर स्टोर्समध्ये ग्राहकांनी ती ऑर्डर कशी करावी याबाबत माहिती दिली जाईल असं कंपनीनं म्हटलंय. ऑनलाइन कार विकत घेणं हे काही मिनिटांचं काम आहे, असा कंपनीचा दावा आहे.
ऑनलाइन कार विकल्यानं कारची किंमत 6 टक्क्यांनी कमी करता येईल असं कंपनीनं सांगितलं आहे.
'कार आवडली नाही तर 7 दिवसांनी परत करा'
स्टोरमध्ये टेस्ट ड्राइव्हची गरज टाळण्यासाठी कंपनीनं एक रिटर्न पॉलिसी राबवली आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाइन कार मागवू शकता आणि आवडली नाही तर 7 दिवसात किंवा 1600 किमी प्रवासानंतर परत करू शकता.
काही मोक्याच्या ठिकाणी बंद केलेले स्टोर्स परत चालू केली जाणार आहेत पण त्याठिकाणी कमी कर्मचारी असणार आहेत, असं कंपनीनं सांगितलं.
ज्या ग्राहकांना ताबडतोब कार हवी आहे अशा लोकांसाठी काही कार गाड्या स्टोरमध्ये ठेवल्या जाणार आहेत.
कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच खर्चाची कपात करण्यात आली आहे. जानेवारी 45 हजार कर्मचाऱ्यांपैकी 3 हजार कर्मचारी (7%) कमी करणार असल्याची घोषणा केली होती.
टेस्लाची कार ग्राहकांना महागडी वाटत असल्याचं एलोन मस्क यांनी सांगितलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)