अवकाशातील 1.5 अब्ज प्रकाशवर्ष दूरवरून आलेल्या लहरींची नोंद

    • Author, हेलन ब्रिग्ज
    • Role, बीबीसी न्यूज

कॅनडातील दुर्बिणीद्वारे एका दूरस्थ दीर्घिकेतून आलेल्या रेडिओ लहरींची नोंद झाली आहे. तिचे स्वरूप आणि तिचे उगमस्थान याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

एफआरबी या ओळखल्या जाणाऱ्या 13 संकेताची वारंवार नोंद झाली. हे सिग्नल 1.5 अब्ज प्रकाशवर्ष दूरवरून आले आहेत.

"याआधी अशा प्रकारची नोंद दुसऱ्या दुर्बिणीद्वारे एकदाच नोंद झाली आहे. या लहरीची नोंद झाल्यावर अशा प्रकारच्या अनेक लहरी तेथे असाव्यात," अशी शक्यता ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील अंतराळभौतिकतज्ज्ञ इंग्रीड स्टेअर्स यांनी सांगितले.

या अभ्यासासाठी अधिक साहित्य उपलब्ध असून विश्वासंदर्भातील अनेक कोडी यामुळे सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

CHIME ही प्रयोगशाळा ब्रिटिश कोलंबियाच्या ओकांन्गान व्हॅलीमध्ये आहे. त्यास 100 मी लांबीचे चार अँटेना असून त्याद्वारे संपूर्ण उत्तरेतील आकाशाचे निरीक्षण केले जाते. ही दुर्बिण गेल्या वर्षी बांधण्यात आली असून त्यावर या संकेतांची नोंदणी झाली आहे. नेचर या नियतकालिकामध्ये यावरील शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे.

एफआरबी या रेडिओ लहरींच्या प्रकाशमान लघू लहरी असतात.

"आम्ही या प्रकारच्या लहरींच्या संकेतांचे पुन्हा मापन केले आहे, आधीच्या संकेताप्रमाणेच तो होता," असे कॅनडातील मॅकगिल विद्यापीठातील श्रीहर्ष तेंडुलकर यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)