इजिप्त : ४४०० वर्षं जुन्या कबरीचं रहस्य उलगडणार

इजिप्त प्रसिद्ध आहे ते पिरॅमिड आणि ममींसाठी. हजारो वर्षांपूर्वीच्या या संस्कृतीचं आजही इतिहासप्रेमी, संशोधक, पर्यटक यांना कुतुहल आहे. याच इजिप्तमध्ये शास्त्रज्ञांना ४४०० वर्षांपूर्वीची एक कबर सापडली आहे. एका पुजाऱ्याची ही कबर असल्याचं सांगितलं जात आहे. शास्त्रज्ञांमध्ये या कबरीच्या शोधामुळे उत्साहाचं वातावरण आहे.

इजिप्तच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मुस्तफा वाझिरी यांनी या शोधाला, गेल्या अनेक दशकांतलं एक महत्त्वपूर्ण संशोधन असल्याचं म्हटलं आहे.

कैरोच्या जवळ असलेल्या सक्कारा प्रांताजवळ सापडलेल्या या कबरीत रंगवलेल्या चित्रलिपी आहेत. तसंच राजाचा पुतळाही आहे.

भिंतींवर त्या कबरीचे मालकांची प्रतिमा आहे. या प्रतिमांत ते त्यांची आई, पत्नी आणि इतर नातेवाईकांसोबत बसलेले दिसतात.

या कबरीच्या उत्खननाला सुरुवात झाली असून शास्त्रज्ञांना इथे अजूनही रहस्यमय गोष्टींचा उलगडा होईल, अशी आशा आहे.

या रहस्यमय कबरीची ही झलक

All pictures subject to copyright

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)