इजिप्त कॉलिंग : फोटोशॉप नाही ही तर निर्सगाची रंग उधळण

इजिप्त म्हटले की डोळ्या पुढं येतात ती म्हणजे पिरॅमिड आणि ममी. पण या देशावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. इजिप्तमधील असाच एक नितांत सुंदर प्रदेश म्हणजे सिनाय होय. इजिप्तने हा प्रदेश 3 वर्षांपूर्वी भटकंतीसाठी खुला केला आहे.

सिनाय ट्रेल पूर्ण करण्यासाठी एकूण 12 दिवस लागतात. 220 किलोमीटरचा हा प्रवास असतो. हा प्रदेश अकाबाच्या आखातातून सुरू होत इजिप्तचं सर्वोच्च शिखर असलेल्या जेबेल कॅथरिनापर्यंत जातो.

सिनाय प्रदेशात भटकंती करताना जेबेल कॅथरिना नजरेस पडतं. ख्रिश्चन परंपरेप्रमाणे सेंट कॅथरिनचा रोमन साम्राज्यात मृत्यू झाल्यानंतर काही परग्रहवासियांनी तिला या पर्वतावर नेलं होतं. तिथल्या शिखरावर एक प्रार्थनास्थळ बांधण्यात आलं आहे.

सुएझच्या आखातात सूर्य मावळतीला जातो. सिनाय हा दोन भूप्रदेशांना जोडणारा दुवा आहे. या प्रवासात एका विशिष्ट जागेवरून पश्चिमेकडे बघितलं तर आफ्रिकेकडे सूर्य मावळताना दिसतो. सकाळी हाच सूर्य आशिया खंडातून उगवलेला बघायला मिळतो.

यावर्षी हा प्रवास 550 किमीपर्यंत वाढला आहे. हा प्रवास पूर्ण करायला आता 42 दिवस लागतात. हे पर्यटन इथल्या बिडोईन जमातीसाठी उत्पन्नाचं साधन ठरत आहे.

सिनायचा 550 किमीचा परिसर

आणखी पुढे गेलं तर सिनायचा आणखी सुंदर भाग बघायला मिळतो. त्यामुळे या भागात फक्त कट्टरवाद्यांचं वर्चस्व आहे, हा दृष्टिकोन बदलण्यास मदत होते. उत्तर सिनायमध्ये अनेक हल्ले झाले आहेत. हा एक बंदिस्त लष्करी परिसर आहे.

मुझईना आणि अल्गात जमातीचे लोक उन्हापासून संरक्षणासाठी गुहेत बसले आहेत. आज सुमारे आठ जमातीतील 50 बेडोईन लोक सिनाय भागात स्वयंपाकी, गाईड, व्यापारी किंवा यजमानाचं काम करतात.

लहान वयाचे बेडोईन लोक प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतात. जुन्या पिढीकडून नव्या पिढीला ज्ञान मिळावं अशी वातावरणनिर्मिती करावी, असा या प्रदेशाचा एक उद्देश आहे. त्यामुळे उज्ज्वल भविष्याची आशा अजूनही टिकून आहे.

लहान बेडोईन मुलं त्यांच्या वडिलांबरोबर किंवा त्यांच्या भावांबरोबर येतात. उंटावर वजन पेलण्यासारख्या गोष्टी शिकतात. अनेक नवीन मार्ग, पाण्याचे विविध स्रोत, जागांची नावं, काही जागांच्या गोष्टी आणि लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या शिकतात.

तीन वर्षांपूर्वी हा प्रदेश खुला झाल्यानंतर इजिप्त आणि इतर देशातील लोकांनी या प्रदेशातून प्रवास केला. हा गट फिरत असताना त्यांना वाटेत एक प्रार्थनास्थळ लागतं. हे प्रार्थनास्थळ सिनायच्या एका भागात लपलं आहे. या प्रार्थनास्थळाला ज्यू, ख्रिश्चन, आणि इस्लाम या तिन्ही धर्मांचं अधिष्ठान लाभलं आहे.

उंचावर उभा असलेला गाईड नासिर मन्सूर इथल्या परिसरातील खडकांच्या आणि झाडांच्या रचनेची माहिती देत आहे.

दक्षिण सिनाय भागातील गराशा आणि अलागात हे दोन बेडोईन समाज सिनाय भटकंतीच्या कामात एकत्रितपणे काम करतात. हे अंतर पार करताना हडबेट एल टिह नावाचं एक पठार लागतं तिथे असलेल्या एका बेडोईन समुदायाचा हा एक भाग आहे.

बेडोईन समुदायाचं उंटांशी एक वेगळंच नातं आहे. ते त्यांच्याबरोबर चालतात, त्यांना खाऊ घालतात आणि जेव्हा ते आजारी असतात तेव्हा त्यांची काळजीही घेतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

हेही वाचलंत का?