चीनमधला हा परिसर भुताटकीसारखा वाटू लागलाय, कारण...

पूर्वचीनमधल्या शेंगशान बेटावर झेजियांग नावाचा एक प्रदेश आहे. या बेटावर हुटोवान नावाचं एक गाव आहे, जिथे फारच कमी लोक राहतात. इतके कमी की इथल्या घरांवर फुलझाडं आणि वेलींनी कब्जा केला आहे.

आता हा पूर्ण परिसर भुताटकीसारखी वाटू लागला आहे, जणू काही हॅरी पॉटर किंवा लॉर्ड ऑफ द रिंग्ससारख्या हॉलीवुडपटातला हा एखादा सेट असो.

न्यूज एजंसी AFPचे फोटो जर्नलिस्ट जोहान्स एजेल यांनी या परिसराला भेट दिली आणि इथली काही चित्ताकर्षक छायाचित्रं आपल्या कॅमेरात कैद केली. बीबीसीनं काही दिवसांपूर्वी केलेली स्टोरी पुन्हा शेयर करत आहोत.

500 घरांची वस्ती असलेल्या या गावात एकेकाळी चांगलीच वर्दळ असायची. जवळपास दोन हजार मच्छिमारांचं कुटुंबं इथे रहायची, मासेमारी करायची.

पण मुख्य शहरापासून हा बेट फारच लांब आहे. त्यामुळे इथे शाळा नव्हत्या, दवाखाने नव्हते, सामान आणायला किंवा पोहोचवायला खूप उडचणी यायच्या.

मग 1990च्या दशकात इथल्या रहिवाशांनी अधिक चांगल्या संधीच्या शोधात गावातून स्थलांतर करायला सुरुवात केली. 1994मध्ये गावातील जवळपास सगळीच कुटुंबं इथून दुसरीकडे स्थलांतरित झाले होते. आता त्या गावात मुठभर लोकं राहतात.

आता लोक गेली म्हटल्यावर इथे जगणाऱ्या निसर्गाने घरांवर कब्जा करण्यास सुरुवात केली, आणि बघता बघता गावातील प्रत्येक घरावर, काना कोपऱ्यात झाडंझुडुपं, वेली गवतं उगवली आहेत. आणि जरी हे दिसायला थोडं भुताटकी वाटत असेल, पण हे एक मस्त पर्यटन स्थळ झालं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)