You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॅलिफोर्नियात वणव्यात 25 जण ठार
कॅलिफोर्नियामधल्या जंगलात तीन ठिकाणी लागलेल्या वणव्यात आतापर्यंत एकूण 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 250,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
लॉस एंजेलिसच्या पश्चिमेकडे लागलेला हा वणवा आता जवळचा महामार्ग ओलांडत किनाऱ्याकडे सरकत आहे. मालीबू शहराकडेही ती पसरेल ही भीती व्यक्त केली जात आहे.
सेक्रॅमेंटो शहराच्या भागात एका गाडीमध्ये पाचजणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दोन्हीकडील वणवे वेगाने पसरत आहेत. तर पॅरडाईज शहरात 14 मृतदेह सापडले. त्याचबरोबर मालीबू येथेही दोन मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्या आगीत मृत्यू झालेल्या पाचजणांची अजूनही ओळख पटलेली नाही, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
गेल्यावर्षी कॅलिफोर्नियाच्या याच भागात लागलेल्या भीषण वणव्यात 22 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आगीत दोन हजारांवर इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या.
Woolsey आग कुणीकडे पसरत आहे?
लॉस एंजेलिसच्या पश्मिम भागात ही आग लागलेली आहे. रात्रभरात या आगीचे लोट महामार्ग क्र. 101च्या पलिकडे पसरले होते.
स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळपर्यंत या आगीने तब्बल 14 हजार एकरांचा प्रदेश व्यापला होता. आता आगीचा विस्तार 70 हजार एकरांपर्यंत गेला आहे.
या वणव्याची सुरुवात लॉस एंजेलिसच्या वायव्य भागातील Thousand Oaks येथून झाली. बुधवारी याच ठिकाणी निवृत्त सैनिकाने नैराश्यातून केलेल्या गोळीबारात 12 जणांचा बळी घेतला होता. त्यावेळी खबरदारी म्हणून इथल्या 75 हजार कुटुंबांची घरे रिकामी करावी लागली होती.
मालिबूचा किनारा, लॉस एंजेलिसच्या पश्चिमकडेचा पट्टा आणि Thousand Oaksच्या पश्चिम भागातील हजारो रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कॅलाबासास आणि मालिबू या शहरात हॉलिवुडचे अनेक सिनेस्टार राहतात.
उत्तर कॅलिफोर्नियात आग कशी लागली?
गुरुवारी कॅलिफोर्नियाच्या उत्तरेकडे लागलेली आग आता 20 हजार एकरात पसरली आहे. यामध्ये पॅराडाइज शहर नष्ट झालं आणि 5 लोकांचा मृत्यू झाला आहे.
ही आग 56 किमी प्रतितास वेगाने पसरली आहे.
'आगीच्या लोटांतून गाड्या चालवल्या'
उत्तर कॅलिफोर्नियातून बीबीसीचे प्रतिनिधी जेम्स कूक यांचा रिपोर्ट
अंदाजे 80 फुटबॉलच्या मैदानाएवढं मोठ्या पॅराडाइज शहराला या वणव्याने अगदी थोड्या वेळातच गिळंकृत केलं.
या शहरातून 27 हजार कुटुंबे एकाचवेळी गाड्यातून निघाली तेव्हा सगळीकडे वाहतुक कोंडी झाली आहे. त्यावेळी रस्त्यावर आगीचे लोट येत होते. काही लोक जीव वाचवत गाडीतून बाहेर पडले आणि मुलांसहित धावू लागले.
प्रशासनाला बुलडोझरने रस्त्यावरील बंद पडलेल्या गाड्या हटवत रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं आलं.
कॅलिफोर्नियातील आतापर्यंतचा सर्वात भयानक वणवा आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)