You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्टीफन हॉकिंग यांचा प्रबंध तुमचा होऊ शकतो
दुर्धर आजाराशी टक्कर देत मानव प्रजातीसाठी मूलभूत संशोधन करणाऱ्या स्टीफन हॉकिंग यांच्या पीएचडी प्रबंधाचा लिलाव करण्यात येणार आहे. या प्रबंधावर हॉकिंग यांची स्वाक्षरी आहे. या प्रबंधाच्या लिलावातून 95 लाख रुपये (£100,000) मिळण्याचा अंदाज आहे.. या महिन्यात लिलाव प्रक्रिया होणार आहे.
1965मधील हा प्रबंध केंब्रिज विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑनलाईन प्रसिद्ध झाल्यानंतर जोरदार प्रतिसादामुळे वेबसाईट क्रॅश झाली होती.
हॉकिंग यांच्या प्रबंधासह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील 22 वस्तूंचाही लिलाव christiesकडून करण्यात येणार आहे. हा प्रबंध त्याचाच एक भाग आहे.
यात हॉकिंग यांची व्हीलचेअर आणि अंगठ्यांचा ठसा असणाऱ्या एका पुस्तकाचा समावेश असेल.
"या लिलावामुळे लोकांना आमच्या वडिलांच्या विलक्षण आयुष्याचे स्मरण होत राहील," असं हॉकिंग यांची मुलगी ल्यूसीनं म्हटलं आहे.
हॉकिंग यांच्याशी संबंधित पदकं, पुरस्कार, शास्त्रीय निबंध आणि The Simpsons या मालिकेतील हॉकिंग यांच्या उपस्थितीविषयीच्या स्क्रीप्ट यांचा या 22 वस्तूंत समावेश असेल. 'Shoulders of Giants' या नावानं हा लिलाव होणार आहे.
हॉकिंग यांची व्हीलचेअर या लिलावातील सर्वांत शेवटची वस्तू असेल आणि या लिलावातून मिळालेली सर्व रक्कम Stephen Hawking Foundation आणि Motor Neurone Disease Associationकडे जमा करण्यात येणार आहे.
31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान या 22 वस्तूंसाठी ऑनलाईन बोली लागण्याची शक्यता आहे.
"आमच्या वडिलांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वस्तूंच्या मौल्यवान संग्रहाचं व्यवस्थापन करण्यासाठी Christies आम्हाला मदत करत आहे," असं Ms Hawking यांनी म्हटलं आहे.
"Acceptance in Lieu या प्रक्रियेद्वारे वडिलांचा संग्रह आम्ही देशाला अर्पण करू, हा त्यांच्या परंपरेचा आणि या देशाच्या वैज्ञानिक इतिहासाचा मोठा भाग आहे," असं आम्हाला वाटतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
स्टीफन यांचं मार्च महिन्यात वयाच्या 76व्या वर्षी निधन झालं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)