आकाशातून अशी दिसते श्रीमंत-गरिबांमधली दरी

श्रीमंत आणि गरिबांमधली दरी वाढतच चालली आहे, अशी टीका सातत्याने होताना दिसते. पण ही दरी असते कशी आणि दिसते कुठे?

फोटोग्राफर जॉनी मिलर यांनी जगभरात फिरून ही दरी टिपली आहे. दक्षिण आफ्रिका, मेक्सिको आणि भारतातील ही दरी कशी दिसते, पाहूया.

ही दरी, ही विषमता लोक किती सहजपणे स्वीकारून जगत असतात, या तथ्याकडे लक्ष वेधण्यासाठी मिलर यांनी एप्रिल 2016मध्ये Unequal Scenes नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केला. हे फोटो याच प्रोजेक्टचा भाग आहेत.

मूळ दक्षिण आफ्रिकेचे मिलर यांनी हा प्रोजेक्ट का केला? त्यांच्या शब्दांत -

"केप टाऊनमध्ये तुम्ही पाऊल ठेवलं की अस्ताव्यस्त झोपड्या तुमचं स्वागत करतात."

"या झोपड्यांनी विमानतळाला अक्षरश: वेढलं आहे. सलग 10 मिनिट तुम्हाला झोपड्यांच्या या गराड्यातून प्रवास करावा लागतो. त्यानंतर मग तुम्ही थोड्या सुसज्ज अशा वस्तीत पोहोचता."

"केप टाऊनसारखी परिस्थिती जगातल्या इतर भागांतही आहे. पण ही परिस्थिती मला पटत नाही"

"विषमता हे या पिढीपुढचे सर्वांत मोठं आव्हान आहे, असं बराक ओबामा एकदा म्हणाले होते."

या फोटोत दिसणाऱ्या दृश्याला 'नादीर व्ह्यू' असं म्हणतात. यातल्या सीमा गरीब आणि श्रीमंतामधली दरी स्पष्टपणे उलगडतात. एका बाजूला गरीब तर दुसऱ्या बाजूला श्रीमंत लोक राहतात.

ड्रोन कॅमेरा वापरून फोटो काढण्यासाठी त्यायोग्य जागा ठरवण्यासाठी मिलर यांना खूप अभ्यास करावा लागला.

"जगगणना, नकाशे, विविध अहवाल आणि लोकांशी केलेल्या चर्चेच्या माध्यमातून मी फोटो काढण्याची ठिकाणं शोधली. एकदा ठिकाणं शोधल्यानंतर मी त्यांना गुगल अर्थवर त्यांना पाहिलं आणि त्यानुसार समोरची योजना आखली. यामध्ये हवाई वाहतुकीचे नियम, सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षा, बॅटरी लाईफ, रेंज, हवामान, वेळ आणि इतर अनेक गोष्टींचा अभ्यास केला," ते सांगतात.

सर्व छायाचित्र : जॉनी मिलर

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)